पुढील बातमी

...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला महत्त्व

...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला महत्त्व

राज्यातील सत्तास्थापनेचा तेढ सोडवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने एक समन्वय समितीची निवड केली आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यापूर्वी ही समिती एकसूत्री कार्यक्रमावर चर्चा करणार आहे. या बैठकीत सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील आणि नवाब मलिक या सगळ्यांची उपस्थिती आहे.

उद्धव ठाकरेंकडून आमदारांना मतदार संघात जाण्याचे आदेश

मुंबईत राष्ट्रवादीची बैठक सुरु असताना राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार बारामतीला जात असल्याचे सांगत निघून गेल्यामुले तडकाफडकी निघून गेल्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कोणत्याही अफवा पसरु नये. अजित पवार मुंबईतच असल्याचे सांगितले.  

अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या देहबोलीमुळे राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाला असताना अजित पवार समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित असल्याचे वृत्त आले. ही बैठक शिवसेनेसाठीच नव्हे तर राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात ही बैठक महत्त्वपूर्ण अशीच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील चर्चेनंतर शिवसेनेसोबत पुढील वाटचालीसाठी चर्चा अपेक्षित आहे. पहिल्या भेटीनंतर पुन्हा काय घडामोडी घडणार? काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या किती बैठकानंतर शिवसेनेसोबत बैठक होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन

राज्यातील अस्थिर राजकारणीची दखल घेत मंगळवारी महाराष्ट्रात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील  राजकारणात वेगवान हालचाली घडत आहेत. राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेल्या वेळेच्या आधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयावर टीका केली जात आहे.

सेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील : पृथ्वीराज

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणूगोपाल यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेकडून सोमवारी अधिकृत प्रस्ताव आला असून त्यावर आता विविध अंगाने चर्चा करु आणि पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेनेही राज्यपालांच्या भूमिकेवर टीका करत लवकरच सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी भाजपला संख्याबळ वाढवण्यास मदत करु असे माध्यमांसमोर सांगितले होते.  

Wed, 13 Nov 2019 09:38 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची खास बैठीला, अजित पवारही उपस्थित

हॉटेल ओबेरॉयमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस समन्वय समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नबाव मलिक, जयंत पाटील तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित आहेत. 

Wed, 13 Nov 2019 08:32 PM IST

अजित पवार माझ्यासोबतच आहेत : जयंत पाटील

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे. अजित पवार माझ्यासोबत असून काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे, अशोकराव चव्हाण आणि माणिकराव ठाकरे इत्यादी नेते या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती जयंत पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. 

Wed, 13 Nov 2019 08:17 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक उद्या होईल : बाळासाहेब थोरात

काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक उद्या होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 

Wed, 13 Nov 2019 08:15 PM IST

अजित पवारांच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार बारामतीमध्ये जातो म्हणून निघून गेल्याच्या वृत्तावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे मुंबईतच आहेत. उद्या तुम्हाला ते दिसतील असे शरद पवार यांनी म्हटले आहे. बैठक रद्द झाल्याचे त्यांनी चेष्ठेने म्हटले असेल, असेही पवार यांनी सांगितले. 

Wed, 13 Nov 2019 07:35 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अचानक रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अचानक रद्द झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. बारामतीला जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

Wed, 13 Nov 2019 07:28 PM IST

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे भाजपचे मोठे नुकसान - अमित शहा

पुढचे मुख्यमंत्री फडणवीस होणार असे मोदी बोलले होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाबद्दल कोणच काही बोलले नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेच्या काही गोष्टी मान्य न करण्यासासारख्या आहेत. राष्ट्रपती राजवटीवरुन राजाकराण सुरु आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

 

 

Wed, 13 Nov 2019 07:27 PM IST

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवून दाखवा - अमित शहा

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरुन फक्त राजकारण केले जात आहे बाकी काही नाही. राज्यपालांनी १८ दिवस वाट पाहिली. आजही सर्वांकडे संधी आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवून दाखवा, असे अमित शहांनी सांगितले.

 

 

Wed, 13 Nov 2019 07:18 PM IST

राष्ट्रपती राजवटीवरुन विरोधक राजकारण करत आहे - अमित शहा

सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी दोन दिवस मागितला त्यांना ६ महिन्याचा वेळ दिला आहे. राष्ट्रपती राजवटीवरुन विरोधक राजकारण करत आहे. राज्यपालांनी ६ महिन्यांचा वेळ दिला आहे करा सरकार स्थापन, असे अमित शहांनी सांगितली आहे. 

Wed, 13 Nov 2019 07:14 PM IST

शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा दावा मान्य नाही - अमित शहा

महाराष्ट्रातल्या सत्ता पेचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा दावा मान्य नाही. १४५ संख्याबळ असलेल्यांनी सरकार स्थापन करावे, असे अमित शहांनी सांगितले. 

Wed, 13 Nov 2019 06:14 PM IST

भाजप लकवरात लवकर सत्ता स्थापन करेल - नारायण राणे

सत्तास्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजप लकवरात लवकर सत्ता स्थापन करेल. त्यासाठी १४५ आमदारांची जुळवाजुळव सुरु आहे. सरकार स्थापनेसाठी भाजपला सर्वोत्तपरी मदत करणार, असे भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितले. 

Wed, 13 Nov 2019 05:20 PM IST

राष्ट्रपती राजवट लागू करण्यात घाई - खर्गे

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. यावर प्रतिक्रिया देताना राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात घाई केली असल्याचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.   

Wed, 13 Nov 2019 02:45 PM IST

बोलणी झाल्यानंतर पुढे जायचे ठरवू - बाळासाहेब थोरात

उद्धव ठाकरे यांची काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुरु असलेली बैठक संपली. 'उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे कसे जायचे यावर निर्णय घेतील. त्यानंतर शिवसेनेसोबत एकत्रित चर्चा करु. बोलणी झाल्यानंतर पुढे जायचे ठरवू. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र बैठक करुन नंतर शिवसेनेसोबत चर्चा करु,असे बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

 

 

Wed, 13 Nov 2019 02:20 PM IST

योग्य वेळी निर्णय सर्वांना कळेल - उद्धव ठाकरे

हॉटेल ट्रायडंटवर सुरु असलेली चर्चा संपली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये एका तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. 'काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतर निर्णय सर्वांसमोर येईल. योग्य वेळी निर्णय सर्वांना कळेल.', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी हॉटेल ट्रायडंटबाहेर पडताना दिली आहे. 

Wed, 13 Nov 2019 01:49 PM IST

मातोश्रीबाहेर मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स हटवले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लावले होते. ते बॅनर्स बीएमसीकडून काढून टाकणयाचे काम सुरु आहे. 

Wed, 13 Nov 2019 01:00 PM IST

संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज 

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवसांच्या उपचारानंतर संजय राऊत यांना सोडण्यात आले आहे.

 

Wed, 13 Nov 2019 12:46 PM IST

हॉटेल ट्रायडंटमध्ये शिवसेना-काँग्रेसमध्ये चर्चा सुरु

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते हॉटेल ट्रायडंटमध्ये पोहचले आहे. याठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Wed, 13 Nov 2019 12:45 PM IST

काँग्रेसचे नेत संजय राऊत त्यांच्या भेटीला

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी ते आले आहेत. त्यांच्यासोबत अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे हे देखील उपस्थित आहेत.

 

Wed, 13 Nov 2019 12:13 PM IST

वाटाघाटीसाठी योग्यवेळी योग्य बैठका होतील - बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. 'राजकीय चर्चा अशा परिस्थितीमध्ये करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी अंत्यत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ती महाराष्ट्रातील जनतेला आवडली. वाटाघाटीसाठी योग्यवेळी योग्य बैठका होतील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.  
 

Wed, 13 Nov 2019 11:46 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र बसून निर्णय घेणार - अजित पवार

आमच्या मित्र पक्षात एकवाक्यता असली पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र बसून निर्णय घेणार आहे. महत्वाच्या पदांबाबत, खाते वाटपाबाबत चर्चा होईल त्यानंतर मार्ग काढला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

Wed, 13 Nov 2019 11:04 AM IST

शिवसेना सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल करणार नाही

सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आवश्यक वेळ दिला नाही आणि यामध्ये दुजाभाव केल्याच्या मुद्दयावरून शिवसेनेकडून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात येणार नाही. शिवसेनेच्या वतीने या याचिकेवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. न्या. शरद बोबडे यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाकडे या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित आहे. दरम्यान एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात कोणतीही नवी याचिका दाखल करण्यात येणार नाही. अशी याचिका कधी दाखल करायची हे सुद्धा ठरलेले नसल्याचे पक्षाचे अन्य वकील सुनील फर्नांडिस यांनी सांगितले. 

Wed, 13 Nov 2019 11:03 AM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते अहमद पटेल यांची मुंबईत भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते अहमद पटेल यांची मुंबईत भेट घेतल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले.

Wed, 13 Nov 2019 11:01 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला महत्त्व