पुढील बातमी

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी आज सायंकाळी ६ वाजता मतदान संपुष्टात आला. उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. आता सर्वांच्या नजरा या २४ तारखेकडे म्हणजेच मतमोजणीच्या दिवसाकडे लागले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना महायुतीला काँग्रेस-राष्ट्रवादी टक्कर देत आहे. एक्झिट पोल विषयीचे सर्व अपडेट्स खालीलप्रमाणे..

महाराष्ट्र

संस्था भाजप-शिवसेना कांग्रेस-राष्ट्रवादी  अन्य
एबीपी-सी व्होटर+ 204 69 15
टाइम्स नाऊ+ 230 48 10
इंडिया टुडे+ 166-194 72-90 22-34

हरियाणा

संस्था भाजप कांग्रेस अन्य
सीएनएन-न्यूज १८ 75 10 5
टाइम्स नाऊ 71 11 8
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट 75-80 9-12 1-4
Thu, 24 Oct 2019 10:00 AM IST

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या तिसऱ्या फेरी अखेर पिछाडीवर आहेत. आश्चर्यकारकरित्या या मतदारसंघात एमआयएमचे फारुख शाब्दी यांनी आघाडी घेतली आहे. 
तिसऱ्या फेरीअखेर मिळालेली मतं
1) प्रणिती शिंदे- ७१६४ (काँग्रेस)
2) महेश कोठे- ४८३२ (शिवसेना बंडखोर)
3) फारुख शाब्दी- १३६८४ (एमआयएम)
4) दिलीप माने- ४८८६ (शिवसेना)
६५२० मतांनी शाब्दी आघाडीवर

Thu, 24 Oct 2019 09:57 AM IST

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला असून सहापैकी केवळ एका जागी आघाडी. काँग्रेसची मोठी मुसंडी. भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हेच एकमेव आघाडीवर

Thu, 24 Oct 2019 09:56 AM IST

राजापूरमधून शिवसेनेचे राजा साळवी आघाडीवर

राजापूरमधून शिवसेनेचे राजा साळवी आघाडीवर

Thu, 24 Oct 2019 09:36 AM IST

कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष कोल्हे आघाडीवर

कोपरगाव मतदारसंघातील भाजपच्या स्नेहलता कोल्हे पिछाडीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष कोल्हे एक हजार मतांनी आघाडीवर.

Mon, 21 Oct 2019 07:59 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट

बहुतांश सर्वच एक्झिट पोलनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रिपब्लिक जन की बातनुसार आघाडीला ५२-५९ तर इंडिया टुडे-एक्सिसनुसार ७२-९० जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज १८-आयपीएसओएसनुसार आघाडी फक्त ४१ ठिकाणी विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी-सी व्होटरनुसार ५५-८१ जागा तर टाइम्स नाऊनुसार ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Mon, 21 Oct 2019 07:42 PM IST

रिपब्लिक-जन की बात नुसार महायुतीला २१६ ते २३० जागा

रिपब्लिक-जन की बात नुसार महायुतीला २१६ ते २३० जागा, काँग्रेस-राष्ट्रवादीला ५२ ते ५९ तर इतरांना ८ ते १२ जागा मिळण्याची शक्यता

Mon, 21 Oct 2019 07:01 PM IST

सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार १९२-२१६ जागा महायुतीला

एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार १९२-२१६ जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ५५-८१ जागा मिळण्याचा अंदाज.

Mon, 21 Oct 2019 06:58 PM IST

इंडिया टुडे-माय एक्सिस एक़्झिट पोलनुसार भाजप-सेना महायुतीला १८१ जागा

इंडिया टुडे-माय एक्सिस एक़्झिट पोलनुसार भाजप-सेना महायुती १८१ जागांवर विजयी होण्याची शक्यता. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीला ८१ जागा मिळू शकतात. तर इतरांना २६ जागा मिळण्याची शक्यता.

Mon, 21 Oct 2019 06:52 PM IST

सीएनएन न्यूज १८-आयपीएसओएस एक्झिट पोलनुसार महायुतीला २४३ जागा

सीएनएन न्यूज १८-आयपीएसओएस एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना महायुती २४३ जागांवर विजयी होऊ शकतात. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ४१ तर इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Mon, 21 Oct 2019 06:50 PM IST

महायुतीला २३० जागा मिळण्याचा अंदाज

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना २३० जागांवर विजयी होण्याची शक्यता. तर काँग्रस-राष्ट्रवादीला ४८ जागा मिळू शकतात. इतरांना १० जागा मिळण्याचा अंदाज

Mon, 21 Oct 2019 06:48 PM IST

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार विभागनिहाय अंदाज

ठाणे, कोकण- भाजप+शिवसेना २९, काँग्रेस+राष्ट्रवादी ५, मुंबई- भाजप+शिवसेना ३३, काँग्रेस+राष्ट्रवादी ३

Mon, 21 Oct 2019 06:34 PM IST

२०१४ मधील राज्यातील स्थिती

२०१४ मध्ये भाजपने सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना ६३, काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी ४१ जागी विजयी झाले होते. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज