पुढील बातमी

महाविकास आघाडीचा आमदारांवर विश्वास नाही - विरोधक

महाविकास आघाडीचा आमदारांवर विश्वास नाही - विरोधक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज (शनिवार) विधानसभेत मांडण्यात आला. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ठाकरे सरकारची ही पहिली अग्निपरीक्षा होती. हा विश्वासदर्शक ठराव अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने जिंकला. यात महाविकास आघाडीच्या बाजूने १६९, तटस्थ ४ जण तर विरोधात ० मते पडली.

भाजपने सुरुवातीपासूनच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमावर बोट ठेवत मंत्रिमंडळाच्या शपथविधीला आणि विधानसभेच्या आजच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत सभात्याग केला. 

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारबाबत विश्वासदर्शक ठराव काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू अनुमोदन दिले. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल.

दरम्यान, महाविकास आघाडीचा आमदारांवर विश्वास नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्यावेळी विश्वासदर्शनक ठराव मांडला जात होता त्यावेळी भाजपने सभात्याग केला. आज लोकशाहीची हत्या झाली असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.  

Sat, 30 Nov 2019 07:52 PM IST

महाविकास आघाडीचा आमदारांवर विश्वास नाही - विरोधक

महाविकास आघाडीचा आमदारांवर विश्वास नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

 

 

Sat, 30 Nov 2019 03:45 PM IST

जो आपल्या दैवताला मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाहीः उद्धव ठाकरे

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाही. गुन्हा असेल तर तो पुन्हा पुन्हा करेन.जो आपल्या दैवताला मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. शपथविधी बेकायदा असल्याचा मुद्दा भाजपने उपस्थित केला. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. 

Sat, 30 Nov 2019 03:04 PM IST

महाविकास आघाडीच्या बाजूने १६९ मते

विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने १६९ मते, विरोधात ० तर ४ आमदार तटस्थ राहिले. 

Sat, 30 Nov 2019 02:45 PM IST

विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांनी घोषणा देत सभात्याग केला

Sat, 30 Nov 2019 02:35 PM IST

अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव माडंला. शिवसेनेचे सुनील प्रभु यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. आवाजी मतदानानंतर शिरगणतीचे आदेश देण्यात आले. दरम्यानच्या काळात भाजपचे आमदार घोषणाबाजी करत होते.

Sat, 30 Nov 2019 02:30 PM IST

मंत्र्यांचा परिचय करुन देताना भाजपचा गोंधळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्र्यांचा परिचय करुन देताना भाजप आमदारांनी जोरजोरात विरोधी घोषणा देत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवर आक्षेप नोंदवला.

Sat, 30 Nov 2019 02:30 PM IST

हंगामी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस यांचा आक्षेप फेटाळला

हे अधिवेशन नियमबाह्य असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नियमाचा दाखला देत फेटाळला.

Sat, 30 Nov 2019 02:27 PM IST

हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या नेमणुकीवर भाजपचा आक्षेप

हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या नेमणुकीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्षेप नोंदवला. मंत्रिमंडळाने आपल्या अधिकारात हंगामी अध्यक्ष बदलल्याचे हंगामी अध्यक्ष वळसे पाटील यांनी सांगितले. आजचे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत विश्वासदर्शक ठराव होणार असल्याचे म्हटले.

Sat, 30 Nov 2019 02:08 PM IST

अधिवेशन नियमाला धरुन नाहीः फडणवीस

अधिवेशनाच्या कामकाजावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवला आहे. अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्साची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. नवीन अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम ने का केली नाही. हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीनुसार होत नसल्याचे फडणवीस यांचे मत.

Sat, 30 Nov 2019 01:28 PM IST

बहुमताचा आकडा आणखी वाढणार - अशोच चव्हाण

बहुमताचा आकडा आणखी वाढणार आहे. आज चमत्कार होणार आहे. आम्ही आत्मविश्वासाने पुढे जात आहे, असे मत काँग्रेस नेते अशोच चव्हाण यांनी सांगितले आहे. 

Sat, 30 Nov 2019 01:16 PM IST

शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊत दाखल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते दाखल झाले आहेत. 

Sat, 30 Nov 2019 01:05 PM IST

विधानभवनात काँग्रेस आमदारांची बैठक सुरु

विधानभवनात काँग्रेस आमदारांची बैठक सुरु झाली आहे. थोड्याच वेळात काँग्रेस देखील व्हिप बजावू शकते. 

Sat, 30 Nov 2019 12:59 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले. बहुमत चाचणीपूर्वी सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांनी विधानभवन परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Sat, 30 Nov 2019 12:43 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने व्हीप बजावला

विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे

Sat, 30 Nov 2019 12:30 PM IST नाना पटोले HT Photo

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

Sat, 30 Nov 2019 12:24 PM IST

भाजपचा रडीचा डाव सुरु, एकनाथ शिंदे यांची टीका

मी आज जो काही आहे, तो बाळासाहेबांमुळे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाच मी शपथविधीत उल्लेख केला. मला अभिमान आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते असा रडीचा डाव खेळत, असे आरोप करत आहेत. त्यांना कुठे जायचे आहे तिथे जाऊ द्यात. लोकशाहीत कुठेही जाण्याचा त्यांना अधिकार आहे, असे शिवसेना नेते तथा कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. भाजपने शपथविधी बेकायदा असल्याचा आरोप केला आहे.

Sat, 30 Nov 2019 10:52 AM IST

भाजपकडून किसन कथोरे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांना भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. कथोरे हे १ लाख ७४ हजार ६०० मतांनी विजयी झालेले आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. कथोरे यांची लढत आता महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेसचे नाना पटोले यांच्या होणार आहे.

Sat, 30 Nov 2019 10:05 AM IST

विधानसभा अध्यक्षपदासाठी दुपारी १२ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत

विधानसभा अध्यक्षपदासाठी दुपारी १२ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. महाविकास आघाडीकडून या पदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे, याबाबत अजून स्पष्टता नाही. 

Sat, 30 Nov 2019 09:45 AM IST

१६५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळेलः छगन भुजबळ

आम्हाला १६५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Sat, 30 Nov 2019 09:11 AM IST

नांदेडचे भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची घेतली भेट

विधानसभेत आज महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होणार आहे. तत्पूर्वी नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रताप चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते

Sat, 30 Nov 2019 09:04 AM IST

सकाळी साडनेऊ वाजता हंगामी विधानसभा अध्यक्ष निवडले जाणार

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:महाविकास आघाडीचा आमदारांवर विश्वास नाही - विरोधक