पुढील बातमी

... म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार

... म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या विनंतीनंतर पवारांनी  निर्णय घेतला आहे. यावेळी शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवणाऱ्या शिवसेनेसह अन्य नेत्यांचे आभार मानले. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ईडीकडून कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसताना देखील शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली होती.  त्यामुळे ईडी कार्यालय परिसरासह दक्षिण मुंबईतील कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे मार्ग, एम आर ए मार्ग पोलिस स्टेशन परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती. 

Fri, 27 Sep 2019 01:47 PM IST

पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे आभार - शरद पवार  

शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पुण्याला जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहे. 

 

Fri, 27 Sep 2019 01:44 PM IST

शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाही

शरद पवार यांनी पोलिस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्या बँकेच्या संचाकपदी मी कधीच नव्हतो. माझा काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Fri, 27 Sep 2019 01:31 PM IST

पोलिस आयुक्तांकडून शरद पवार यांची मनधरणी

पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवार यांची मनधरणी केली त्यानंतर ते पवारांच्या निवासस्थानावरुन निघून गेले. दरम्यान, शरद पवार ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून येत आहे. 

Fri, 27 Sep 2019 01:24 PM IST

पोलिस आयुक्त पवारांच्या निवासस्थानी दाखल

पोलिस आयुक्त संजय बर्वे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. सकाळपासून दुसऱ्यादा पोलिस शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत.

Fri, 27 Sep 2019 01:03 PM IST

ईडीने शरद पवारांना पाठवले पत्र

ईडीने शरद पवारांना पत्र पाठवले असून चौकशीची गरज नाही असे सांगितले. तसंच, भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही असे ईडीेने स्पष्ट केले. 

Fri, 27 Sep 2019 12:48 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात निदर्शने

पक्ष कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात निदर्शने. 

Fri, 27 Sep 2019 12:32 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि संविधानिक संस्थाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्या भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.  

Fri, 27 Sep 2019 12:26 PM IST

नांदेड-हिंगोली महामार्गावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन

नांदेड-हिंगोली महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्तोरोको केला आहे. शरद पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत.

Fri, 27 Sep 2019 12:20 PM IST

मुंबई पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर

मुंबई पोलिस सुरक्षिततेच्या कारणास्तव ड्रोनद्वारे ईडी आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर करडी नजर ठेवत आहेत.  

Fri, 27 Sep 2019 10:36 AM IST

राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या घरी दाखल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड, जंयत पाटील, रोहित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 

Fri, 27 Sep 2019 10:35 AM IST

दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक

पोलिसांनी काल रात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोकं आहोत. ही दडपशाही योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसेचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.

Fri, 27 Sep 2019 10:30 AM IST

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची केली पाहणी

मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची पाहणी केली.

Fri, 27 Sep 2019 10:28 AM IST

सहपोलिस आयुक्त विनय चौबेंनी घेतली पवारांची भेट.

सहपोलिस आयुक्त विनय चौबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली.

Fri, 27 Sep 2019 09:50 AM IST

पवारांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांताता राखण्याचे आवाहन केले आहे. 

Fri, 27 Sep 2019 09:48 AM IST

दक्षिण मुंबईत जमावबंदी लागू

शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्याने दक्षिण मुंबईतल्या अनेक भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे मार्ग, एम आर ए मार्ग पोलिस स्टेशन परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे 

Fri, 27 Sep 2019 09:46 AM IST

ईडी कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्याने ईडीच्या कार्यालय परिसरामध्ये पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:... म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार