पुढील बातमी

ED कडून राज ठाकरे यांची तब्बल आठ तासांहून अधिक वेळ चौकशी

ED कडून  राज ठाकरे यांची तब्बल आठ तासांहून अधिक वेळ चौकशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून तब्बल ८ तासांहून अधिक वेळ चौकशी झाली. या चौकशीत राज ठाकरे यांनी सहकार्य केल्याचे समजते. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणात ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची राज ठाकरेंनी उत्तरे दिली. भविष्यात वेळ पडल्यास अधिकारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतात. मात्र तुर्तास राज ठाकरेंना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.

राज ठाकरेंना अडचणीत आणणारे कोहिनूर प्रकरण नेमकं काय आहे? 

राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या दादरच्या कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Thu, 22 Aug 2019 08:19 PM IST

तब्बल साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर

 सकाळी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात पोहचले होते. जवळपास साडे आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. 

Thu, 22 Aug 2019 03:48 PM IST

साडेचार तासांपासून राज ठाकरेंची चौकशी सुरु

गेल्या साडेचार तासांपासून राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Thu, 22 Aug 2019 01:51 PM IST

अडीच तासापासून राज ठाकरेंची चौकशी सुरु

गेल्या अडीच तासापासून राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Thu, 22 Aug 2019 12:31 PM IST

राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल

कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

Thu, 22 Aug 2019 11:11 AM IST

अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यसोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Thu, 22 Aug 2019 10:59 AM IST

राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहे. ११ वाजता त्यांना ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Thu, 22 Aug 2019 10:24 AM IST

सरकारकडून जाणीवपूर्वक कारवाई - संतोष धुरी

सरकारकडून जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप मनसे नेते संतोष धुरी यांनी केला आहे. दरम्यान, संतोष धुरी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Thu, 22 Aug 2019 10:24 AM IST

सरकारकडून जाणीवपूर्वक कारवाई - संतोष धुरी

सरकारकडून जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप मनसे नेते संतोष धुरी यांनी केला आहे. दरम्यान, संतोष धुरी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Thu, 22 Aug 2019 10:22 AM IST

ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राज ठाकरे ईडी कार्यालयात हजर होणार आहे. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

Thu, 22 Aug 2019 10:21 AM IST

मरीन ड्राईव्ह परिसरात कलम १४४ लागू

मरीन ड्राईव्ह, एमआरए मार्ग, दादर आणि आझाद मैदान पोलिस ठाणे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Thu, 22 Aug 2019 10:18 AM IST

रवी मोरे यांना कोपरी पोलिसांनी घेतले ताब्यात

मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Thu, 22 Aug 2019 10:15 AM IST

संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून मनसे नेत्यांनी काळ्या रंगाचं 'इडियट हिटलर' लिहिलेलं टी-शर्ट घातले.

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ED कडून राज ठाकरे यांची तब्बल आठ तासांहून अधिक वेळ चौकशी