पुढील बातमी

दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत, मोदींचा पाकला सूचक इशारा

दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत, मोदींचा पाकला सूचक इशारा

'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी दहशतवादाला पोसणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पुन्हा एकदा सांगितले. दहशतवादाविरोधातील लढाईत ट्रम्प आमच्यासोबत आहेत, असे सांगत त्यांनी नाव न घेता पाकला दहशतवादी कृत्ये कराल तर याद राखा, असा इशाराच दिला आहे. काही लोकांना आपला देश सांभाळता येत नाही पण ते भारताच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य करत आहेत. राजकारणासाठी ही मंडळी दहशतवाद्यांना पोसत आहेत, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर तोफ डागली. अमेरिका किंवा भारतात जे दहशतवादी हल्ले झाले त्यासाठी दहशतवाद्यांना कोणी खत पाणी घातले हे संपूर्ण जगाला माहित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.   

'पाकमधून आलेला दहशतवादी परत जाणार नाही'

तत्पूर्वी एनआरजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अमेरिकेतील रहिवासी भारतीयांना संबोधित करताना मराठीसह विविध भाषेत मोदींनी भारतात सर्व काही ठिक सुरु आहे, असे सांगितले. २०१९ च्या निवडणुकीने नवा विक्रम प्रस्थापित केला. ६० वर्षानंतर पहिल्यापेक्षा अधिक मताधिक्याने भारतात सरकार स्थापन करण्यात आले. यात भारतीय जनतेचा वाटा मोठा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. 

हे वागणं बरं नव्हं! शरद पवारांचा उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे टोला

'सबका साथ सबका विकास' हा भारताचा मंत्र असून 'नवा भारत' हा देशाचा संकल्प आहे. देश बदलत आहे पण काहींना ते दिसत नाही, असे सांगत त्यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्यामुळेच लोक आता नवी स्वप्ने पाहत आहेत, असेही मोदींनी यावेळी सांगितले. जगात सर्वात कमी किंमतीत इंटरनेट डेटा हा भारतात उपलब्ध आहे.  स्वस्त डेटा उपलब्ध केल्यानेच डिजिटल इंडियाला प्रोत्साहन मिळाले, असेही मोदी यावेळी म्हणाले. भारतामध्ये  डेटासाठी मोजावी लागणारी रक्कमही डॉलरच्या एक चतुर्थांश इतकी आहे.  भ्रष्टाचाराविरोधात देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संशयास्पद कंपन्यावर कारवाई केली, असे मोदींनी सांगितले.

'काश्मीरमध्ये तिरंगा फडकल्याचा आम्हालाही अभिमान, पण...'

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून भारताने या प्रदेशात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कलम ३७० ला आम्ही फेअरवेल दिले. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या विकासाचे दरवाजे उघडले गेले आहेत. या प्रदेशातील जनतेवर होणारा भेदभाव नष्ट करण्याचे मोठे काम सरकारने केली. राज्यसभेत बहुमत नसताना देखील कलम ३७० हद्दपार करण्यात यश मिळाले.   

 

 

Sun, 22 Sep 2019 11:23 PM IST

मोदींच्या भाषणाला सुरुवात

Sun, 22 Sep 2019 11:19 PM IST

दोन्ही देशांसाठी सीमा सुरक्षा महत्त्वाची : ट्रम्प

भारत-अमेरिका दोन्ही राष्ट्रांसाठी सीमा सुरक्षा महत्त्वाची आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. 

Sun, 22 Sep 2019 11:17 PM IST

मुस्लिम कंटपंथीयांविरोधात एकत्रितपणे लढू : ट्रम्प

मुस्लिम कट्टपंथीयांविरोधात एकत्र लढू, असे आश्वासन ट्रम्प यांनी भारताला दिले. 

Sun, 22 Sep 2019 11:14 PM IST

मुंबईत होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेला येण्यास इच्छूक : ट्रम्प

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेला येण्याची इच्छा आहे. असे ते म्हणाले.

Sun, 22 Sep 2019 11:12 PM IST

मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाच कौतुक

मोदींनी ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Sun, 22 Sep 2019 10:55 PM IST

अमेरिका भारताचा खरा मित्र : मोदी

व्हाईट हाऊसमध्ये भारताचा खरा मित्र आहे, असे उद्गार मोदींनी आपल्या भाषणात केले.    

Sun, 22 Sep 2019 09:55 PM IST

मोदींनी व्यासपीठावर उपस्थित दिग्गजांशी हस्तांदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींची भेट घेतली

Sun, 22 Sep 2019 09:52 PM IST

पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत

स्टेडियमवर उपस्थित नागरिकांनी 'मोदी..मोदी...मोदी' गजरात पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Sun, 22 Sep 2019 09:37 PM IST

अनेक देशांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत

अनेक देशाच्या प्रतिनिधींनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. आयोजकांकडून व्यासपीठावर त्यांचे स्वागत करण्यात आला. 

Sun, 22 Sep 2019 09:27 PM IST

थोड्याच वेळात ट्रम्पही याठिकाणी येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थोड्याच वेळात कार्यमाला हजेरी लावणार

Sun, 22 Sep 2019 09:26 PM IST

मोदी कार्यक्रम स्थळावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरजी स्टेडियमवर दाखल

Sun, 22 Sep 2019 08:31 PM IST

संगीत कार्यक्रमाला सुरुवात

थोड्याच वेळात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होणार आहेत. पारंपारिक वेशभूषेत गुजराती बांधवांनीही कार्यक्रमात नृत्य सादर केले.

Sun, 22 Sep 2019 07:46 PM IST

हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी

अमेरिकेतील अनिवासी भारतीयांसह अमेरिकेतील नागरिकांमध्ये 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचा उत्साह दिसून येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

Live: Stage set for PM’s mega show, people line up outside Houston stadium  

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत, मोदींचा पाकला सूचक इशारा