श्रेयस अय्यरच्या षटकाने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब!
श्रेयस अय्यरने २९ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी करत न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला ६ गडी आणि ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
शिवम दुबेही बाद, भारताला चौथा धक्का!
शिवम दुबे ९ चेंडूत १३ धावा करुन माघारी फिरला. त्याला सोधीने बाद केले.
राहुलपाठोपाठ विराटही माघारी भारताला तिसरा धक्का!
विराटने ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर फ्लिक केलेला चेंडू गप्टिलने अप्रतिमरित्या झेलमध्ये रुपातंरित केला. कोहलीने ४५ धावांचे योगदान दिले.
लोकेश राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का!
सोधीच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याचा लोकेश राहुलचा प्रयत्न फसला. राहुलने २३ चेंडूत ५६ धावांचे योगदान दिले.
लोकेश राहुलचे अर्धशतक!
लोकेश राहुलने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मागील पाच सामन्यातील लोकेश राहुलचे हे तिसरे अर्धशतक आहे.
रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का!
सँटनरने सलामीवीर रोहितला अवघ्या ७ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
भारताला २०४ धावांचे आव्हान
न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या आहेत. भारताकडून बुमराह, चहल, दुबे, जडेजा आणि ठाकूरने प्रत्येकी एक-एक बळी टिपला.
विलियम्सनचे २५ चेंडूत अर्धशतक
कर्णधार विलियम्सनने जबरदस्त फलंदाजी करत अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक केले. भारताविरुद्धचे त्याचे पहिलेच अर्धशतक होते. परंतु, अर्धशतक झाल्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर फिरकीपटू चहलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने पाॅईंटला त्याचा झेल टिपला
न्यूझीलंडचे सलग दोन गडी बाद
पहिल्या स्पेलमध्ये मार खाल्ल्यानंतरही कोहलीने शार्दुल ठाकूरला पुन्हा गोलंदाजीला आणले. यावेळीही त्याला विलियम्सनने दोन षटकार ठोकले. परंतु, स्ट्राइकवर आलेल्या अर्धशतकवीर मुन्रोचा हवेत खेळण्याचा डाव फसला आणि यजुवेंद्र चहलने त्याचा झेल टिपला. ५९ धावांवर तो बाद झाला.
त्यानंतर आलेल्या ग्रँडहोमीला भोपळाही फोडता आला नाही. रवींद्र जडेजाने त्याला शॉर्ट फाइन लेगला झेल देण्यास भाग पाडले. शिवम दुबेने झेल टिपण्यात कोणतीच कसर सोडली नाही. न्यूझीलंडने १४ षटकांत ३ बाद १३० धावा केल्या.
रोहितचा अप्रतिम झेल
जबरदस्त फलंदाजी करत असलेल्या मार्टिन गप्टिलचा सीमारेषेवर रोहित शर्माने अप्रतिम झेल टिपला. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर गप्टिलचा उडालेला झेल रोहितने घेतला. त्याने षटकाराचे रुपांतर झेलात केले. गप्टिल आणि मुन्रो या सलामीवीरांनी ७.५ षटकांत ८० धावांची आक्रमक भागिदारी केली. न्यूझीलंडने ९ षटकांत १ बाद ८४ धावा केल्या आहेत.
किवीचे सलामीवीर गप्टिल-मुन्रोची धुवांधार फलंदाजी
प्रथम फलंदाजी करत असलेल्या किवी संघाचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रोने आक्रमक सुरुवात करत ५ षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. विशेषतः मुन्रो आक्रमक दिसला. शार्दुल ठाकूरच्या दोन षटकांत दोघांनी ३० धावा कुटल्या.
भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
Captain @imVkohli wins the toss and elects to bowl first in the 1st T20I against New Zealand. pic.twitter.com/6NEIvq83w0
— BCCI (@BCCI) January 24, 2020
असा आहे टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा, लोकेश राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवीद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
असा आहे न्यूझीलंडचा संघ
केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, कोलिन मुनरो, टिम सिफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कोलिन डि ग्रँडहोम, मिशेल सँटनर, टिम साउदी, ईश सोधी, हामिश बेनेट आणि ब्लेयर टिकनर
हवामान
पावसाची कोणतीच शक्यता नाही. तापमान २२ डिग्रीच्या आसपास राहू शकते. परंतु, दवाचा परिणाम सामन्यावर दिसू शकतो.