पुढील बातमी

IND vs SA, 2nd Test : रोहितचा हा अनोखा विक्रम लांबणीवर!

IND vs SA, 2nd Test : रोहितचा हा अनोखा विक्रम लांबणीवर!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोश शतकाच्या मदतीने तब्बल ३०३ धावा करणारा रोहित शर्मा पुण्याच्या मैदानात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यावेळी त्याला रबाडाने इन स्विंग आउट स्विंगने चांगले हैराण केल्याचे पाहायला मिळाले. 

IND vs SA :... म्हणून या पिच क्यूरेटरची असेल खरी 'कसोटी'

रोहित शर्मा पुण्याच्या मैदानातील पहिल्या डावात ३५ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १४ धावा करुन माघारी फिरला. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारुन रोहितला एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यामुळे या विक्रमाला गवसणी घालणे आता आणखी आव्हानात्मक झाले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात १९७ धावा करुन सलामीवीर म्हणून सर्वात जलद ५०० धावा करण्याचा विक्रम करण्याची त्याच्याकडे होती. अर्थात पहिल्या डावात तो हा पराक्रम करु शकला नसला तरी दुसऱ्या डावातही त्याच्याकडे ही संधी आहे. पण आता त्याला दुसऱ्या डावात १८३ धावांची खेळी करावी लागेल.  

धोनीच्या निवृत्तीवर शास्त्रींनी केली 'मन की बात'

याशिवाय कसोटी क्रिकेटमध्य ५० षटकार खेचण्याच्याही तो जवळ आहे. आतापर्यंत रोहितने ४५ षटकार लगावले आहेत. या सर्व विक्रमासाठी रोहितला आता दुसऱ्या डावाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. ५ षटकारांसह मोठी खेळी करुन तो नवा विक्रम प्रस्थापित करतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Thu, 10 Oct 2019 11:54 AM IST

मयंक-पुजारा खेळपट्टीवर

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवालला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर आला आहे. भारताने २५ षटकांत एक बाद ७७ धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल ३४ तर पुजारा १९ धावांवर खेळत आहे.

Thu, 10 Oct 2019 11:50 AM IST

रोहित स्वस्तात बाद

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने मागील सामन्याती शतकवीर रोहित शर्माला तंबूत परत पाठवले. रोहितला अवघ्या १४ धावा करता आल्या.

Thu, 10 Oct 2019 11:48 AM IST

भारताची सावध सुरुवात

रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने सुरुवातीची षटके सांभाळून खेळली. दोघांनी ६ षटकांनंतर बिनबाद १४ धावा केल्या.

Thu, 10 Oct 2019 11:46 AM IST

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IND vs SA, 2nd Test : रोहितचा हा अनोखा विक्रम लांबणीवर!