पुढील बातमी

Dongri Building Collapses : १० जणांचा मृत्यू, ८ जखमी

 Dongri Building Collapses : १० जणांचा मृत्यू, ८ जखमी

मुंबईतल्या डोंगरी भागमध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. कांडेल मार्गावरील केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झालाय तर ८ जण जखमी आहे. बचावकार्य युध्दपातळीवर सुरु असून इमारतीमध्ये ४० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम आणि पोलिसांकडून मदतकार्य केले जात आहे.  

Tue, 16 Jul 2019 08:41 PM IST

मृतांचा आकडा १० वर

डोंगरी इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत.

Tue, 16 Jul 2019 06:32 PM IST

मृतांचा आकडा वाढला. ८ जणांचा मृत्यू

डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत. 

Tue, 16 Jul 2019 06:16 PM IST

पालिका आयुक्तांनी दिली घटनास्थळी भेट

मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी डोंगरी इमारत दुर्घटना ठिकाणी भेट दिली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. 

Tue, 16 Jul 2019 05:34 PM IST

सरकार नेमकं काय करतंय ?

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'दुर्दैवाने दरवर्षी पावसाळ्यात मुंबईमध्ये अशा घटना घडतात. भिंत कोसळते, रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो, लहान मुलं गटारात पडून त्यांचा मृत्यू होतो. सराकार नेमकं काय करतेय हे मुंबईकरांनी विचारले पाहिजे.'

 

Tue, 16 Jul 2019 05:17 PM IST

पंतप्रधानांनी ट्विट करुन व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेवर ट्विट करुन दु:ख व्यक्त केले आहे. इमारत दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. तसंच जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे.

 

 

Tue, 16 Jul 2019 05:16 PM IST

३ जणांचा मृत्यू तर ८ जखमी

डोंगरी इमारत दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांची नावे - 
साबिया शेख - 25 वर्ष ( जे. जे रुग्णालय)
अब्दुल सत्तार कालू शेख - 55 वर्ष (हाबीब रुग्णालय)
ओळख पटली नाही - 15 वर्ष ( जे. जे रुग्णालय)

जखमींची नावे - 
फिरोज नाजीर सलमानी - 45 वर्ष ( जे. जे रुग्णालय)
आएशा शेख - 3 वर्ष ( जे. जे रुग्णालय)
सलमा अब्दुल सत्तार शेख - 55 वर्ष ( जे. जे रुग्णालय)
अब्दुल रेहमान - 3 वर्ष ( जे. जे रुग्णालय)
नावेद सलमानी - 35 वर्ष ( जे जे रुग्णालय)
इमरान हुसैन कलवानिया - 30 वर्ष (जे जे रुग्णालय)
जावेद - 30 वर्ष (जे जे रुग्णालय)
जीनत - 25 वर्ष ( जे जे रुग्णालय

Tue, 16 Jul 2019 05:16 PM IST

केसरबाई इमारतीला २०१७ मध्ये पालिकेने पाठवली होती नोटीस

मुंबई महानरपालिकेने डोंगरी येथील केसरबाई इमारतीला 7 ऑगस्ट 2017 रोजी नोटीस पाठवली होती. या इमारतीला 'सी 1' म्हणून वर्गीकृत केले होते. लवकरात लवकर ही इमारत पाडण्यात यावी असे देखील या नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. कोणतिही दुर्घटना झाल्यास आम्ही जबाबदार नाही असं देखील या नोटीसमध्ये लिहिले होते.

 

 

 

Tue, 16 Jul 2019 05:14 PM IST

४ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी

डोंगरी इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Tue, 16 Jul 2019 03:34 PM IST

ढिगाऱ्याखालून महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढले

एनडीआरएफच्या टीमने ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या इमारत दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी झाले आहेत.

 

Tue, 16 Jul 2019 02:55 PM IST

पोलीस आयुक्त संजय बर्वे घटनास्थळी दाखल

डोंगरी येथील 4 मजली केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळला. घटनास्थळावर आतापर्यंत अनेक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, मुंबईचे पोलस आयुक्त संजय बर्वे आणि झोन 1 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचे मृत्यू झाले तर 6 जण जखमी झाले आहेत.

 

Tue, 16 Jul 2019 02:21 PM IST

ढिगाऱ्याखाली १५ कुटुंब अडकली

दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये १५ कुटुंब राहत होती. एनडीआरएफ, फायर ब्रिगेड आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरु.

 

 

 

Tue, 16 Jul 2019 02:17 PM IST

PHOTOS : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

डोंगरी इमारत दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या नागरिकांसाठी मुंबई महानगर पालिकेने इमामवाडा महापालिकेची शाळा आश्रयासाठी खुली करुन दिली आहे.

  PHOTOS : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

 

 

 

Tue, 16 Jul 2019 02:02 PM IST

ढिगाऱ्याखालून काढलेल्या मुलावर उपचार सुरु

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लहान मुलाला रेस्क्यू करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

 

 

Tue, 16 Jul 2019 02:00 PM IST

जखमींवर जे जे आणि हबीब रुग्णालयत उपचार सुरु

 डोंगरी इमारत दुर्घटनेमध्ये बचावकार्या दरम्यान 5 जखमींना बाहेर काढण्यात आले. यामधील 3 जखमींना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. तर दोन जखमींना हबीब रुग्णालयात नेण्यात आले. जे जे रुग्णालयात  एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला आणि लहान मुलावर उपाचर सुरु आहेत. तर हबीब रुग्णालयात एका पुरुषाचा मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरु आहेत. 

 

 

 

Tue, 16 Jul 2019 01:53 PM IST डोंगरी इमारत दुर्घटना

केसरबाई इमारत 100 वर्ष जुनी

केसरबाई इमारत 100 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीचा समावेश धोकादायक इमारतीच्या यादीत नव्हता. इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला काम दिले होते. या इमारतीत एकूण 15 कुटुंब राहत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Tue, 16 Jul 2019 01:48 PM IST डोंगरी इमारत दुर्घटना

अरुंद रस्ते असल्याने मदत कार्यात अडथळा

ज्या इमारत परिसरामध्ये कोसळली आहे. त्या परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका त्याठिकाणी पोहचवण्यात अडथळे येत आहेत. 

Tue, 16 Jul 2019 01:36 PM IST

डोंगरी इमारत दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

डोंगरी इमारत दुर्घटना ठिकाणी बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमी झालेल्या 3 जणांना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.

 

 

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Dongri Building Collapses : १० जणांचा मृत्यू, ८ जखमी