पुढील बातमी

Karanataka : CM कुमारस्वामींचा राजीनामा व्हायरल!

Karanataka : CM कुमारस्वामींचा राजीनामा व्हायरल!

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कायम राहणार की सत्तेतून हद्दपार होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सोमवारी कर्नाटकातील राजकीय नाटक पुढे सरकण्याचे कोणती चिन्हे दिसली नाहीत. सभागृहातील गोंधळानंतर सभापतींनी रात्री १२ पर्यंत थांबण्याची तयारी दर्शवली. येदियुरप्पा यांनीही सभापतींच्या सूरात सूर मिसळत विश्वासदर्शक ठरावावर फैसला झालाच पाहिजे अशी भूमिका मांडली. या दरम्यान मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवल्याचा फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कुमारस्वामींनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.  

दुसरीकडे बंडखोर आमदार अजूनही आपल्या मतावर ठाम आहेत. कुमारस्वामी यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी अखेरच्या प्रयत्नाअंतर्गत रविवारी आघाडीच्या आमदारांची बंगळुरुतील ताज हॉटेलमध्ये बैठक घेतली होती.  

Mon, 22 Jul 2019 10:39 PM IST

कुमारस्वामींनी राजीनामा होतोय व्हायरल!

Mon, 22 Jul 2019 09:44 PM IST

येदियुरप्पा यांचा सभापतींच्या सूरात सूर

Mon, 22 Jul 2019 08:36 PM IST

विधानसभा अध्यक्षांनी बोलावली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

कर्नाटक विधासभा अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा, सा रा महेश (जीडीएस), क्रिशना गौडा (काँग्रेस) आणि सिध्दरमय्या (काँग्रेस) यांची बैठक बोलालवली आहे.

Mon, 22 Jul 2019 08:33 PM IST

विधानसभा अध्यक्षांनी भाजप नेत्यांसोबत बोलावली बैठक

कर्नाटक विधासभा अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक बोलावली आहे. भाजपचे नेते सुनिलकुमार, बसवराज बोम्माई, सी टी रवी आणि जेडीएस नेते सा रा महेश, एच डी रेवान्ना, बंडीप्पा काशेमपूर यांच्यासोबत होणार बैठक.

Mon, 22 Jul 2019 07:47 PM IST

कर्नाटक प्रकरणावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

सुप्रीम कोर्टात उद्या कर्नाटक प्रकरणाची सुनावणी होणार आहे. बंडखोर आमदारांच्या अयोग्यतेबाबत सुप्रीम कोर्ट सुनावणी करणार आहे. 

Mon, 22 Jul 2019 06:41 PM IST

विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

जेडी (एस) आमदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केल्यानंतर कर्नाटक विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब.

 

Mon, 22 Jul 2019 06:35 PM IST

आमदार एटी रामास्वामी सभागृहातून बाहेर पडले

जेडी (एस) आमदार ए टी रामास्वामी सभागृहातून बाहेर पडले. बंडखोर आमदारांना झिरो ट्राफिक उपलब्ध करुन दिल्याच्या मुद्द्यावर राज्याचे गृहमंत्री एम बी पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले. रामास्वामी यांनी सांगितले की, जर गृहमंत्री सभागृहामध्ये खोटं बोलत असतील तर मी कसा थांबू शकतो?

 

Mon, 22 Jul 2019 06:33 PM IST

गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांसोबत बोलावली बैठक

कर्नाटकचे गृहमंत्री एम बी पाटील यांनी पोलीस आयुक्तांसोबत बैठक बोलावली आहे. बंडखोर आमदारांनी बंगळुरुमध्ये परत येऊन स्पीकरची भेट घेतली. त्यावेळी त्यांना झिरो ट्राफिक दिले गेले होते असा आरोप करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन त्यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान, जेडी (एस) आमदार एटी रामास्वामी यांनी हा मुद्दा आज अधिवेशनात उपस्थित केला होता. 

Mon, 22 Jul 2019 04:08 PM IST

फक्त १० मिनिटेच बोला

प्रत्येक सदस्याने फक्त १० मिनिटेच बोलावे. मला पुन्हा-पुन्हा हे सांगायला भाग पाडू नका- के आर रमेश (विधानसभा अध्यक्ष)

Mon, 22 Jul 2019 04:06 PM IST

प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित-सिद्धरामय्या

विश्वासदर्शक ठराव घेण्याचा निर्णय अध्यक्ष घेतील. आम्ही यापूर्वीच बहुमत सिद्ध करु हे यापूर्वीच सांगितलं आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आम्हीही न्यायालयात धाव घेतली आहे. कदाचित उद्या यावर निर्णय घेतला जाईल- सिद्धरामय्या (काँग्रेस नेते)

Mon, 22 Jul 2019 01:56 PM IST

व्हीपचे उल्लंघन केल्यास कारवाई

व्हीपचे उल्लंघन करणे आणि विश्वासदर्शक ठरावात भाग न घेतल्यास १४ आमदारांचे सदस्यत्व विधानसभा संपुष्टात आणू शकतात, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Mon, 22 Jul 2019 01:21 PM IST

सभागृहाची प्रतिष्ठा राखा

आज भाषण करताना सभागृहाचे प्रतिष्ठा राखा. हा वेळ वाया घालण्याचा प्रकार आहे. यामुळे सभागृह, अध्यक्ष आणि आमदार म्हणून तुमची प्रतिमा खराब होऊ शकते, असे अध्यक्ष के आर रमेश यांनी सभागृहात म्हटले.

Mon, 22 Jul 2019 01:15 PM IST

विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान

विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष के आर रमेश यांचे वक्तव्य

Mon, 22 Jul 2019 12:55 PM IST

काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे राज्यमंत्री डी के शिवकुमार विधानसौंधमध्ये पोहोचले

Mon, 22 Jul 2019 11:01 AM IST

बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी उद्या भेटीला बोलावले

Mon, 22 Jul 2019 10:58 AM IST

त्वरीत सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

विश्वासदर्शक ठरावासाठी दोन अपक्ष आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर त्वरीत सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Mon, 22 Jul 2019 10:15 AM IST

विश्वासदर्शक ठरावासाठी भाजप आमदार रामादा हॉटलेमधून विधानसौंदकडे रवाना

 

Mon, 22 Jul 2019 10:14 AM IST

विधानभवनात जाण्यापूर्वी भाजप आमदार

बंगळुरु येथील रामादा हॉटेलमध्ये योगासन करत असलेले भाजपचे आमदार

Mon, 22 Jul 2019 10:12 AM IST

अपक्ष आमदारांची न्यायालयात धाव

न अपक्ष आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कर्नाटक सरकारला कोणत्याही परिस्थितीत सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. 

Mon, 22 Jul 2019 10:11 AM IST

बंडखोर ठाम

मुंबईत असलेल्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस-जेडीएसला धडा शिकवायचा असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, आम्ही येथे पैशाच्या लालसेपोटी किंवा दुसऱ्या अमिषासाठी आलेलो नाही. आमच्या निर्णयात भाजपची काहीच भूमिका नाही. एकदा सर्व व्यवस्थितीत झाल्यानंतर आम्ही बंगळुरुला परत जाऊ.

Mon, 22 Jul 2019 10:10 AM IST

बसपा साथ देण्याची शक्यता

सपा प्रमुख मायावती यांनी टि्वट करुन आपले एकमेव आमदार एन महेश यांनी विश्वास प्रस्तावादरम्यान सरकारला मतदान करण्यास सांगितले आहे. परंतु, आमदार महेश हे विश्वासदर्शक ठरावात सामील होणार नसल्याचे बोलण्यात येत आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Karanataka : CM कुमारस्वामींचा राजीनामा व्हायरल!