पुढील बातमी

ऐतिहासिक!, कलम ३७० हटवण्याची शिफारस, काश्मीर केंद्रशासित प्रदेश

ऐतिहासिक!, कलम ३७० हटवण्याची शिफारस, काश्मीर केंद्रशासित प्रदेश

#Article370 गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० कलम अंशतः हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. हा प्रस्ताव सादर करताच काँग्रेस आणि पीडीपीने गदारोळ घालण्यास सुरुवात केली. एका पीडीपी खासदाराने तर आपला कुर्ताच फाडून टाकला. शहा यांनी भारताच्या संविधानाचे कलम ३७० मधील खंड १ शिवाय या कलमातील सारे खंड रद्द करण्याची शिफारस केली. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा दिला. लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करत केंद्र शासित प्रदेश केले. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सदनात मार्शल बोलावण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर सभागृहाची कारवाई स्थगित केली.

अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सरकारच्या वतीने जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक सादर केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी गृहमंत्री  शहा यांना विधेयक सादर करण्याची सूचना केली.

दुरुस्ती विधेयक सादर करताना शहा म्हणाले की, ज्या दिवशी राष्ट्रपतीद्वारे राजपत्रात अधिसूचना स्वीकारली जाईल, त्याच दिवशी संविधानाच्या कलम ३७० (१) शिवाय दुसरे कोणतेच खंड लागू होणार नाही. आम्ही जे चार संकल्प आणि विधेयक आणले आहेत, ते काश्मीरच्या मुद्द्यावरच आहेत. संकल्प सादर करतो. कलम ३७० (१) शिवाय सर्व खंड राष्ट्रपतींच्या अनुमोदनानंतर संपुष्टात येतील.

संविधानातील कलम ३७० हे अस्थायी होते. याचा अर्थ ते कधी ना कधी हटवले जाणार होते. पण आतापर्यंत कोणामध्येही राजकीय इच्छाशक्ती नव्हती. लोक मतांचे राजकारण करत होते. पण आम्ही मतांची पर्वा केलेली नाही, असेही शहा म्हणाले.

Mon, 05 Aug 2019 12:24 PM IST

पीडीपीच्या खासदारांकडून संविधान फाडण्याचा प्रयत्न

पीडीपीच्या खासदारांनी संविधान फाडण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाबाहेर काढले.

Mon, 05 Aug 2019 12:10 PM IST

भारतीय लोकशाहीचा काळा दिवसः मेहबूबा मुफ्ती

भारतीय लोकशाहीचा आज काळा दिवस आहे. जम्मू-काश्मीरच्या नेतृत्वाने द्विराष्ट्राचा सिद्धांत फेटाळून भारतात सामील होण्याचा निर्णय उलटा सिद्ध झाला आहे. भारत सरकारचा अनुच्छेद ३७० हटवण्याचा निर्णय असंवैधानिक आणि अवैध आहे.

Mon, 05 Aug 2019 12:03 PM IST

जम्मू-काश्मीर आता राज्य नाही

कलम ३७० हटवले. जम्मू-काश्मीर आता राज्य नाही. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश होईल. लडाखला विना विधेयकाचे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे.

Mon, 05 Aug 2019 11:49 AM IST

३७० कलम हटवण्याचा अमित शहांचा प्रस्ताव

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानाच्या कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यांनी प्रस्ताव सादर करताच विरोधी पक्षाच्या नेत्यांचा गोंधळ.

Mon, 05 Aug 2019 11:46 AM IST

जम्मू-काश्मीरलाही मिळाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा

जम्मू-काश्मीरलाही मिळाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा. सरकारने विधेयकाबाबत माहिती दिली नसल्याचा विरोधकांचा आरोप.

Mon, 05 Aug 2019 11:44 AM IST

विरोधकांचा गोंधळ

जम्मू-काश्मीरशी निगडीत सरकारच्या महत्वाच्या निर्णयांमुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

Mon, 05 Aug 2019 11:39 AM IST

लडाख केंद्रशासित प्रदेश

जम्मू-काश्मीरमधून लडाखला वेगळे केले गेले. लडाख आता एक केंद्रशासित प्रदेश असेल.

Mon, 05 Aug 2019 11:37 AM IST

संविधान (जम्मू-काश्मीरमध्ये लागू) आदेश २०१९ राष्ट्रपतींनी लागू केले

Mon, 05 Aug 2019 11:34 AM IST

३७० (१) शिवाय कोणताही खंड लागू नाही

ज्या दिवशी राष्ट्रपतींकडून राजपत्रात ही अधिसूचना स्वीकारली जाईल. त्या दिवसापासून संविधानाच्या कलम ३७० (१) शिवाय इतर कोणताही खंड लागू होणार नाहीः अमित शहा

Mon, 05 Aug 2019 11:27 AM IST

जम्मू-काश्मीरच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव

राज्यसभेत प्रचंड गोंधळात सरकारने जम्मू-काश्मीरच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला आहे.

Mon, 05 Aug 2019 11:23 AM IST

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची शिफारसः अमित शहा

जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यांनी कलम ३७० हटवण्याची शिफारस केली. अमित शहा यांनी याची घोषणा करताच राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरु केला. देशाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी घोषणा आहे. 

Mon, 05 Aug 2019 11:21 AM IST

काश्मीरमध्ये युद्धसदृश स्थितीः गुलामनबी आझाद

काश्मीरमध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांना घरामध्ये नजरकैद केले आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. काश्मीरमध्ये युध्दजन्य परिस्थिती आहे. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया. 

 

Mon, 05 Aug 2019 11:08 AM IST

पंतप्रधान अमित शहा संसदेत दाखल

Mon, 05 Aug 2019 10:48 AM IST

लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा जैसलमर दौरा रद्द

Mon, 05 Aug 2019 10:34 AM IST

गृहमंत्री अमित शहा संसदेत दाखल

 

Mon, 05 Aug 2019 10:31 AM IST

जम्मूमधील विक्रम चौकातील सध्याची स्थिती

 

Mon, 05 Aug 2019 10:30 AM IST

कॅबिनेट बैठक संपली

कॅबिनेटची महत्वाची बैठक संपली आहे. सुमारे ४० मिनिटे ही बैठक चालली. संसदेत ११ वाजता गृहमंत्री अमित शहा निवेदन देणार.

Mon, 05 Aug 2019 10:27 AM IST

संसद परिसरात पीडीपी खासदारांचा विरोध

पीडीपीचे राज्यसभा सदस्य नजीर अहमद आणि मीर मोहम्मद यांनी संसद परिसरात हाताला काळ्या रंगाचे कापड गुंडाळले आहे. त्यांनी काश्मीरप्रकरणी सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे.

Mon, 05 Aug 2019 10:22 AM IST

अमित शहा काश्मीरप्रकरणी संसदेत बोलणार

गृहमंत्री अमित शहा संसदेत काश्मीरप्रकरणी भूमिका मांडणार. काश्मीर मुद्द्यावर सरकारची निती स्पष्ट करणार.

Mon, 05 Aug 2019 10:19 AM IST

लोकशाहीची हत्या-गुलामनबी आझाद

भाजप सरकारला काश्मीरला ७० वर्षे मागे न्यायचे आहे. काश्मीरच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. ही लोकशाहीची हत्या आहे- गुलामनबी आझाद

Mon, 05 Aug 2019 10:16 AM IST

ओवेसींचाही स्थगन प्रस्ताव

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत काश्मीरप्रकरणी स्थगन प्रस्ताव दिला आहे.

Mon, 05 Aug 2019 09:29 AM IST

काँग्रेसचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव

काँग्रेस खासदार  अधीर रंजन चौधरी, के सुरेश आणि मनीष तिवारी यांनी लोकसभेत काश्मीर मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. 

Mon, 05 Aug 2019 08:57 AM IST

दिल्लीत आज सकाळी साडेनऊ वाजत कॅबिनेटची बैठक

 

Mon, 05 Aug 2019 08:56 AM IST

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

Mon, 05 Aug 2019 08:55 AM IST

आज सकाळी ६ पासून कलम १४४ लागू

Mon, 05 Aug 2019 08:54 AM IST

अमित शहांनी घेतली रविशंकर प्रसाद यांची भेट

आज सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यापूर्वी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी चर्चा केली.

Mon, 05 Aug 2019 08:52 AM IST

जम्मूत सोमवारी शाळा-महाविद्यालये बंद

जम्मू जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे उपायुक्त सुषमा चौहान यांनी म्हटले आहे. मोठ्याप्रमाणात जवान तैनात करण्यात आले आहेत.

Mon, 05 Aug 2019 08:49 AM IST

श्रीनगर आणि जम्मूमध्ये कलम १४४ लागू

तणावाची स्थिती पाहता सरकारने श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू केले आहे. रविवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत कलम १४४ लागू असेल. या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी हालचाली मंदावल्या आहेत. या काळात कोणतीही रॅली किंवा सभा घेता येणार नाही.

Mon, 05 Aug 2019 08:47 AM IST

अटलबिहारी वाजपेयींची आज उणीव भासत आहेः मेहबूबा मुफ्ती

अटलबिहारी वाजपेयींची आज उणीव भासत असल्याचे टि्वट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. 

Mon, 05 Aug 2019 08:45 AM IST

तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते नजरकैदेत

जम्मू-काश्मीरमध्ये अस्वस्थतेच्या वातावरणात रविवारी रात्री १२ वाजता श्रीनगरमध्ये तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ऐतिहासिक!, कलम ३७० हटवण्याची शिफारस, काश्मीर केंद्रशासित प्रदेश