पुढील बातमी

#INDvWI : वर्षाअखेरच्या मालिकेचा विजयी शेवट!

#INDvWI : वर्षाअखेरच्या मालिकेचा विजयी शेवट!

सलामीवीर रोहित शर्मा (६३) आणि लोकेश राहुलच्या ७७ धावांच्या दमदार सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेच्या विश्वासक खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी राखून पाहुण्या विंडीजला पराभूत केले. या सामन्यासह टीम इंडियाने वर्षातील शेवटची मालिका विजयाने संपवली. सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर मध्यफळीतील श्रेयस अय्यर (७), ऋषभ पंत (७) आणि केदार जाधव (९) धावा करुन परतले. मध्यफळीतील फलंदाजांनी निराश केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी केली. रविंद्र जडेजा आणि कोहली विजय खेचून आणतील असे वाटत असताना कोहलीच्या रुपात विंडीजने भारताला सहावा धक्का दिला. त्यानंतर शार्दूल ठाकूरने रविंद्र जडेजाला उत्तम साथ देत सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

INDvsWI : हिटमॅन रोहितनं मोडला जयसूर्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम

कर्णधार किरॉन पोलार्ड नाबाद (७४) धावा आणि निकोलस पूरनची ६४ चेंडूत ८९ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर निर्णायक एकदिवसीय सामन्यात विंडीजने भारतासमोर ३१६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर एव्हिस लेविस (२१) आणि शाय होप (४२) धावा करत संघाला संयमी सुरुवात करुन दिली. लेविसच्या रुपात विंडीजला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ शाय होपही माघारी फिरला.

विक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा

हेटमायर संघाच्या धावसंख्येत ३७ धावांची भर घातली. तर रोस्टन चेस ३८ धावा करुन बाद झाला. निकोलस पूरनने महत्त्वपूर्ण खेळी करत विंडीजचा डाव सावरला. त्याने ६४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८९ धावा केल्या. पोलार्डने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने नाबाद ७४ धावा करत विंडीज संघाला निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१५ धावांपर्यंत पोहचवले होते. 

Sun, 22 Dec 2019 10:14 PM IST

टीम इंडियाने चार गडी राखून सामन्यासह मालिकाही जिंकली

विंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना चार गडी राखून जिंकत भारताने वर्षाचा शेवट विजयाने केला आहे.

Sun, 22 Dec 2019 09:24 PM IST

किमो पॉलने विराटच्या रुपात भारताला सहावा धक्का दिला

विराट कोहली ८१ चेंडूत ८५ धावा करुन माघारी फिरला आहे.

Sun, 22 Dec 2019 08:49 PM IST

केदार जाधव माघारी, भारताचा अर्धा संघ तंबूत

कॉट्रिएलने केदार जाधवच्या रुपात भारताला पाचवा आणि मोठा धक्का दिला. जाधवने ९ धावा केल्या

Sun, 22 Dec 2019 08:34 PM IST

विराट कोहलीचे अर्धशतक

कर्णधार विराट कोहलीने ५१ चेंडूत अर्धशतक साजरे केले

Sun, 22 Dec 2019 08:27 PM IST

ऋषभ पंत बोल्ड, किमो पॉलने भारताला दिला चौथा धक्का

विशाखापट्टणमच्या मैदानात दमदार खेळी केलेला ऋषभ पंत निर्णयाक सामन्यात अपयशी ठरला. किमो पॉलने त्याला ७ धावांवर माघारी धाडले.

Sun, 22 Dec 2019 08:14 PM IST

किमो पॉल भारताला दिला तिसरा झटका

श्रेयस अय्यर अवघ्या ७ धावा करुन माघारी

Sun, 22 Dec 2019 08:09 PM IST

लोकेश राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का

अल्झारी जोसेफने ७७ धावांवर खेळणाऱ्या लोकेश राहुलला तंबूचा रस्ता दाखवला

Sun, 22 Dec 2019 07:29 PM IST

रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का

जेसन होल्डरने भारताला दिला पहिला धक्का, रोहित शर्मा ६३ चेंडूत ६३ धावा करुन माघारी

Sun, 22 Dec 2019 07:19 PM IST

रोहित शर्माचंही अर्धशतक

सलामीवीर रोहित शर्मानं देखील पूर्ण केलं अर्धशतक

Sun, 22 Dec 2019 07:18 PM IST

लोकेश राहुलनं साजर केलं वनडेतील पाचवे अर्धशतक

Sun, 22 Dec 2019 07:02 PM IST

रोहित-लोकेश राहुल यांच्या शतकी भागीदारी

भारताच्या सलामीच्या जोडीनं १६ व्या षटकात भारताच्या धावफलकावर १०० धावा लावल्या आहेत.

Sun, 22 Dec 2019 06:31 PM IST

रोहित-लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदार

भारताच्या सलामी जोडीने सुरेख सुरुवात करत नवव्या षटकातील पहिल्या चेंडूवर अर्धशतकाचा टप्पा पार केला.

Sun, 22 Dec 2019 05:34 PM IST

विंडीज निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१५ धावा

भारतीय संघासमोर ३१६ धावांचे लक्ष्य

Sun, 22 Dec 2019 05:26 PM IST

शार्दूल ठाकूरने पूरनच्या खेळीला लावला ब्रेक

विंडीजचा ्अर्धा संघ तंबूत, शार्दूल ठाकूरने निकोलस पूरनला ८९ धावांवर तंबूत धाडले

Sun, 22 Dec 2019 04:20 PM IST

सैनीने विंडीजला दिला चौथा धक्का

रोस्टन चेस ३८ धावा करुन माघारी, नवदीप सैनीला दुसरे यश

Sun, 22 Dec 2019 03:44 PM IST

विंडीजचा तिसरा गडी माघारी

शिम्रॉन हेटमायरला नवदीप सैनीने ३७ धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

Sun, 22 Dec 2019 03:06 PM IST

शाय होपच्या रुपात विंडीजला दुसरा धक्का

मोहम्मद शमीने शाय होपला ४२ धावांवर तंबूत धाडले. 

Sun, 22 Dec 2019 02:41 PM IST

एव्हिन लेविसच्या रुपात विंडीजला पहिला धक्का

रविंद्र जडेजाने भारताला मिळवून दिले पहिले यश, लेविसने २१ धावांची खेळी केली. 

Sun, 22 Dec 2019 01:52 PM IST

नाणेफेक जिंकून टीम इंडियाने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणा करण्याचा निर्णय घेतला आहे,

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:#INDvWI : वर्षाअखेरच्या मालिकेचा विजयी शेवट!