पुढील बातमी

INDvsWI, 1st ODI : हेटमायर-होप जोडीनं विराट सेनेचं आव्हान सहज परतवलं

INDvsWI, 1st ODI : हेटमायर-होप जोडीनं विराट सेनेचं आव्हान सहज परतवलं

चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने बाजी मारली. सलामीवीर शाय होपच्या नाबाद १०२ धावा आणि हेटमायरच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पाहुण्या विंडीजने भारताला ८ गडी आणि ७ चेंडू राखून पराभूत केले. सुनील अँब्रिस ९ धावा करुन तंबूत परतल्यानंतर हेटमाय-होप जोडीने २१८ धावांची भागीदारी करत विंडीजच्या विजयाचा भक्कम पाया रचला. हेटमायर १३९ (१०६) बाद झाल्यानंतर होपने (१०२)* पूरनच्या (२९)* साथीने विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

शिवमचे वनडे पदार्पण, केदारची निवड क्रिकेट चाहत्यांना खटकली

नाणेफेक जिंकून पाहुण्या विंडीजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल अवघ्या ६ धावांवर माघारी फिरला. त्यानंतर मैदानात उतरलेला कर्णधार विराट कोहलीही अवघ्या ४ धावांवर बाद झाला. भारताच्या दोन्ही गड्यांना कॉट्रेलने माघारी धाडले. सलामीवीर रोहित शर्माने युवा श्रेयस अय्यरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संयमी खेळीनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न करण्याच्या रोहितच्या इराद्याला अल्झारी जोसेफने सुरुंग लावला. त्याने रोहितच्या रुपात भारताला तिसरा धक्का दिला.  

माजी विकेटकीपर मार्क बाऊचर द. आफ्रिकेचे नवे कोच

रोहित माघारी फिरल्यानंतर श्रेयस अय्यरने पंतच्या साथीने डावाला आकार दिला. अय्यरने एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे तर पंतने पहिले अर्धशतक झळकावले. श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकाची आस निर्माण झाली असताना जोसेफच्या गोलंदाजीवर पोलार्डने एक सोपा झेल टिपत त्याचा खेळ खल्लास केला. त्याच्या रुपात भारताने चौथा गडी गमावला. त्यानंतर केदार जाधवच्या साथीने पंतने सूत्रे आपल्या हाती घेतली. केदार-ऋषभ यांच्यात १६ धावांची भागीदारी झाली असताना पोलार्डच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत ७१ धावांवर बाद झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद २८८ धावा केल्या होत्या. आघाडी फलंदाजी कोलमडल्यानंतर मध्यफळीतील श्रेयस अय्यर (७०), ऋषभ पंत (७१), केदार जाधव (४०) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत भारताचा डाव सावरला होता. मात्र विंडीजच्या सलामीवीरांनी धडाकेबाज खेळ दाखवत भारताचे मनसुबे उधळून लावले. 

Sun, 15 Dec 2019 10:06 PM IST

विंडीजने विराट सेनेला ८ गडी अन् ७ चेंडू राखून नमवले

शिम्रॉन हेटमायर : १३९(१०६)

शाय होप : १०२(१५१)

Sun, 15 Dec 2019 09:08 PM IST

विंडीजने गमावली दुसरी विकेट

शतकी खेळी करुन शिम्रॉन हेटमायर माघारी, शमीला मिळाले यश. हेटमायरने १०६ चेंडूत १३९ धावांची खेळी केली. यात त्याने ११ चौकार आणि ७ षटकार खेटले.

Sun, 15 Dec 2019 08:52 PM IST

हेटमायर-होप जोडी जमली, विंडीज विजयाच्या दिशेने

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला गडी माघारी फिरल्यानंतर विंडीजच्या हेटमायर आणि होपने संघाचा डाव सावरला असून विंडीजची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरु आहे.

Sun, 15 Dec 2019 07:35 PM IST

दीपक चाहरने विंडीजला दिला पहिला धक्का!

सुनील एंब्रिस अवघ्या ९ धावा करुन माघारी 

Sun, 15 Dec 2019 07:34 PM IST

विंडीजच्या डावाला सुरुवात

शाय होप अन् सुनील एब्रिसने केली विंडीजच्या डावाला सुरुवात

Sun, 15 Dec 2019 05:43 PM IST

निर्धारित ५० षटकात भारत ८ बाद २८८

ऋषभ पंत ७१ धावा

श्रेयस अय्यर ७० धावा

कॉट्रेल, कीमो पॉल, जोसेफ प्रत्येकी दोन-दोन विकेट्स

 

Sun, 15 Dec 2019 05:41 PM IST

भारताला आठवा धक्का!

शिवम दुबे ६ चेंडूत ९ धावा करुन माघारी

Sun, 15 Dec 2019 05:40 PM IST

भारताला सातवा धक्का!

रविंद्र जडेजा २१ चेंडूत २१ धावा करुन माघारी

Sun, 15 Dec 2019 05:24 PM IST

केदार जाधव माघारी, भारताला सहावा धक्का!

केदार जाधवच्या रुपात कीमो पॉलला मिळाले सामन्यातील पहिले यश, केदारने ४५ चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

Sun, 15 Dec 2019 04:46 PM IST

पंतही माघारी, भारताचा अर्धा संघ तंबूत

पोलार्डने घातक ठरत असलेल्या पंतला ७१ धावांवर बाद केले. 

Sun, 15 Dec 2019 04:32 PM IST

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताला चौथा धक्का!

जोसेफच्या गोलंदाजीवर पोलार्डने श्रेयस अय्यरचा सोपा झेल टिपला. अय्यरने ८८ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Sun, 15 Dec 2019 04:06 PM IST

अखेर पंतचे पहिले अर्धशतक!

संधीचं सोनं करत ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले.

Sun, 15 Dec 2019 04:02 PM IST

श्रेयस अय्यरचे अर्धशतक!

श्रेयस अय्यरचे एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे तर सातत्यपूर्ण तिसरे अर्धशतक  

Sun, 15 Dec 2019 03:32 PM IST

आता भारताची मदार दिल्लीकरांवर

श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दिल्लीकरांवर भारताच्या डावाला आकार देण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

Sun, 15 Dec 2019 03:26 PM IST

भारताच्या धावफलकावर शंभर धावा!

२५ व्या षटकातील जोसेफच्या तिसऱ्या चेंडूवर पंतने २ धावा करताच भारताने १०० धावा पूर्ण केल्या

Sun, 15 Dec 2019 03:10 PM IST

हिटमॅनही माघारी, भारताला तिसरा धक्का

रोहित शर्माच्या रुपात अल्झारी जोसेफने भारताला तिसरा धक्का दिला. रोहितने ५६ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३६ धावांची भर घातली.

Sun, 15 Dec 2019 02:42 PM IST

रोहित-श्रेयसवर भारताची मदार

सलामीवर रोहित शर्मा आणि युवा श्रेयस अय्यर यांच्यावर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी आहे.

Sun, 15 Dec 2019 02:40 PM IST

भारताला विराट धक्का, कोहली देखील माघारी

कॉट्रेलने कर्णधार विराट कोहलीला अवघ्या ४ धावांवर माघारी धाडले
 

Sun, 15 Dec 2019 02:40 PM IST

लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का

कॉट्रेलने लोकेश राहुलला हेटमायर करवी झेलबाद केले, त्याने संघाच्या धावसंख्येत ६ धावांची भर घातली
 

Sun, 15 Dec 2019 02:40 PM IST

विंडीजने नाणेफेक जिंकली

नाणेफेक जिंकून विंडीजने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvsWI, 1st ODI : हेटमायर-होप जोडीनं विराट सेनेचं आव्हान सहज परतवलं