पुढील बातमी

INDvsSA Day 3 Stumps: फिलँडर-महाराज जोडीनं दमवलं!

INDvsSA Day 3 Stumps: फिलँडर-महाराज जोडीनं दमवलं!

फिलँडर आणि केशव महाराज या तळाच्या फलंदाजांनी शतकी भागीदारी केल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या डावात २७५ धावांपर्यंत मजल मारता आली. या जोडीने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: दमवलं. या जोडीने १०९ धावांची भागीदारी रचली. केशव महाराजला बाद केल्यानंतर भारताने आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांत आटोपत दुसऱ्या कसोटी सामन्यात ३२६ धावांची आघाडी घेतली आहे.     

INDvsSA 2nd Day Stumps : 'विराट' धावसंख्येसमोर आफ्रिका ३ बाद ३६ धावा

तिसऱ्या दिवशी ३ बाद ३६ धावांवरुन थेन्यूस डी ब्रूयन (२०) आणि आनरिख नॉर्किआ (२) यांनी आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमीने आनरिख नॉर्किआच्या रुपात आफ्रिकेला चौथा धक्का दिला. आपल्या वैयक्तिक धावसंख्येत १ धावेची भर घालून तो परतला. दुसऱ्या बाजूला खेळणारा थेन्यूस डी ब्रूयन देखील वैयक्तिक धावसंख्येत १० धावांची भर घालून माघारी फिरला. त्याच्या रुपात उमेश यादवने भारताला पाचवे यश मिळवून दिले.

ND vs SA : किंग कोहलीची रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

त्यानंतर कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (६४) आणि क्विंटन डी कॉक (३१) धावा करुन आफ्रिकेचा डाव सावरला. मात्र अश्विनने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १३९ अशी बिकट केली. जडेजाने मुथूस्वामीला ७ धावांवर माघारी धाडून आफ्रिकेच्या अडचणी वाढवल्या. भारतीय संघ आफ्रिकेला थोडक्यात आटोपणार असे वाटत असताना केशव महाराज (७२) आणि फिलँडरने नाबाद ४४ धावांची खेळी करत आफ्रिकेचा अडीचशेचा टप्पा पार करण्यास मदत केली. अश्विनने तग धरलेल्या महाराजाला झेलबाद केले. त्याने १३२ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने महत्वपूर्ण ७२ धावांची खेळी केली. हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. तो बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या रबाडाला अश्विनने अवघ्या २ धावांवर बाद करत आफ्रिकेचा पहिल्या डाव २७५ धावांत आटोपला. फिलँडर ४४ धावांवर नाबाद राहिला. भारताला ३२६ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.      

Sat, 12 Oct 2019 04:17 PM IST

अश्विनने महराजला धाडले माघारी, आफ्रिकेला ९ वा धक्का!

फिरकीपटू अश्विनने तग धरुन खेळणाऱ्या केशव महाराजला झेलबाद केले. केशव महारजने ७२ धावांचे योगदान देत फिलँडरसोबत शतकी भागीदारी केली. 

Sat, 12 Oct 2019 04:02 PM IST

महाराज-फिलँडर यांच्यात शतकी भागीदारी

Sat, 12 Oct 2019 03:37 PM IST

केशव महाराजचे अर्धशतक

Sat, 12 Oct 2019 03:11 PM IST

महाराज आणि फिलँडर यांच्यात अर्धशतकी भागीदारी

Sat, 12 Oct 2019 01:35 PM IST

अर्धशतकवीर कर्णधार ड्यूप्लेसिसचा अडथळा दूर

सर्व फलंदाज एकापाठोपाठ बाद होत असताना एक बाजू लावून धरणारा कर्णधार फाफ डूप्लेसिस हा ६४ धावांवर बाद झाला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर अंजिक्य रहाणेने त्याचा झेल टिपला.

Sat, 12 Oct 2019 12:45 PM IST

आर अश्विनला सहावे यश

फिरकीपटू आर अश्विनने भारताला सहावे यश मिळवून देताना क्विंटन डीकॉकला तंबूत धाडले.

Sat, 12 Oct 2019 12:44 PM IST

सातवी विकेटही तंबूत

रवींद्र जडेजाने कर्णधार डुप्लेसिस आणि मुथूस्वामीची जोडी फोडली. मागच्या सामन्याच चांगली फलंदाजी केलेल्या मुथुस्वामीला त्याने तंबूत परत धाडले.

Sat, 12 Oct 2019 12:08 PM IST

उपहारापर्यंत द. आफ्रिकेच्या १३६/६ धावा

दक्षिण आफ्रिकेने उपहारापर्यंत सहा गड्यांच्या बदल्यात १३६ धावा केल्या. अजूनही ४६५ धावांनी द. आफ्रिका ४६५ धावांनी पिछाडीवर.

Sat, 12 Oct 2019 12:02 PM IST

द. आफ्रिकेचे शतक

द. आफ्रिकेचे शतक पूर्ण. फाफ डूप्लेसिस आणि क्विंटन डी कॉक खेळपट्टीवर आहेत.

Sat, 12 Oct 2019 12:00 PM IST

उमेश यादवचा झंझावात

हनुमा विहारीच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या उमेश यादवने द. आफ्रिकेची दमछाक करत आपली तिसरी विकेट घेतली. त्याने डि ब्रूयनला विकेटकिपर ऋदिमान साहाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. 

Sat, 12 Oct 2019 11:58 AM IST

जोडी फोडण्यात शमीला यश

जोडी फोडण्यात भारताला वेळ लागला नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एनरिज नॉर्टजेला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. 

Sat, 12 Oct 2019 11:57 AM IST

तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु

दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला. दक्षिण आफ्रिकेचे थेनिस डी ब्रूयन आणि एनरिच नॉर्टजे जोडी मैदानात आहे. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvsSA Day 3 Stumps: फिलँडर-महाराज जोडीनं दमवलं!