पुढील बातमी

INDvsSA Day 2 Stumps : आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!

INDvsSA Day 2 Stumps :  आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!

शर्मा आणि आजिंक्य रहाणेच्या दमदार खेळीनंतर शमी आणि उमेश यादवने आफ्रिकेला सुरवातीलाच दोन धक्के देत आफ्रिकेची अवस्था बिकट केली. अंधूक प्रकाशामुळे पुन्हा एकदा खेळ लवकर थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था २ बाद ९ अशी बिकट होती. एल्गर आणि क्विंटन डी कॉकने आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. शमीने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर एल्गरला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर उमेश यादवने क्विंटन डी. कॉकला ४ धावांवर माघारी धाडले. 

INDvsSA Day 1 Stumps : भारत ३ बाद २२४ धावा (५८)

आघाडीची फळी बारगळल्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने केलेले कसोटी कार्दितील पहिले द्विशतक (२१२) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (११५) संयमी शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ५०० धावा केल्या आहेत. पहिल्या दिवअसाखेर ३ बाद २२४ धावांवरुन रोहित आणि अंजिक्यने दुसऱ्या दिवासाच्या खेळाला सुरुवात केली. अजिंक्य रहाणेने कसोटी कारकिर्दीतील  ११ वे शतक साजरे केले. जॉर्ज लिंडेने त्याला ११५ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्माने आपल्या खेळातील लय कामय ठेवत कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले. तो २१२ धावांवर खेळत असताना कगिसो रबाडाने त्याला पायचित केले. 

रोहितच्या विक्रमाचा धडाका सुुरुच, आता थेट सनी पाजींच्या पंक्तीत

ही जोडी परतल्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने ५१ धावांची तर उमेश यादवने अवघ्या १० चेंडूत ३१ धावांची खेळी करत भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोघांना जॉर्ज लिंडेने बाद केले. याशिवाय त्याने साहा (२४) धावांवर तंबूत धाडले. नदीम १ आणि  आणि मोहम्मद शमी १० धावांवर खेळत असताना चहापानाच्या ब्रेकमध्ये विराटने भारताचा पहिला डाव ९बाद ४९७ धावांवर घोषित केला. आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडेने सर्वाधिक ४ तर तर रबाडाने ३ तर नॉर्किआ आणि डेन यांनी प्रत्येकी एक -एक बळी टीपला. 

Sun, 20 Oct 2019 03:19 PM IST

एल्गर पाठोपाठ, डी कॉकही माघारी, भारताला दुसरे यश

उमेश यादवने क्विंटन डी कॉकला अवघ्या ४ धावांवर तंबूत धाडले

Sun, 20 Oct 2019 03:18 PM IST

आफ्रिकेला पहिला धक्का! एल्गर शून्यावर बाद

शमीने एल्गरला खातेही उघडू दिले नाही. आफ्रिकेचा सलामीवीर पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर साहाच्या हाती झेल घेऊन माघारी फिरला.

Sun, 20 Oct 2019 02:54 PM IST

भारताचा पहिला डाव ९ बाद ४९७ धावा (घोषित)

 भारताचा कर्णधार विराट कोहलीने चहापानाच्या ब्रेकमध्ये ९ बाद ४९७ धावांवर डाव घोषित केला. 

Sun, 20 Oct 2019 02:38 PM IST

षटकारांची बरसात करुन उमेश यादव परतला, भारताला नववा धक्का

उमेश यादवने १० चेंडूत ५ षटकारांच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली. त्याला जॉर्ज लिंडेने माघारी धाडले 

Sun, 20 Oct 2019 02:38 PM IST

अश्विनच्या रुपात भारताचा आठवा गडी तंबूत

डेनच्या गोलंदाजीवर क्लासेनची यष्टिमागे क्लासिक कामगिरी, अश्विन १४ धावांची भर घालून माघारी

Sun, 20 Oct 2019 02:38 PM IST

रविंद्र जडेजाही अर्धशतकी खेळी करुन माघाली, भारताला सातवा धक्का

अर्धशतकानंतर रविंद्र जडेजाही जॉर्ज लिंडेच्या जाळ्यात अडकला. त्याने ११९ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Sun, 20 Oct 2019 02:37 PM IST

वृद्धिमान साहाच्या रुपात भारताला सहावा धक्का

जॉर्ज लिंडेनं यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ४२ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २४ धावा केल्या.

Sun, 20 Oct 2019 02:27 PM IST

दि्वशतकवीर रोहित शर्मा बाद

भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा २१२ धावांची शानदार खेळी करत बाद झाला. कगिसो रबाडाने त्याला बाद केले. यावेळी भारताची धावसंख्या ही ३७१/५ अशी आहे. 

Sun, 20 Oct 2019 02:25 PM IST

रोहित शर्माने १९९ धावा पूर्ण

रोहित शर्माने १९९ धावा पूर्ण केल्या आहेत. तर सध्या लंच टाईम झाला असून भारताने ४ बाद ३५७ धावा पूर्ण केल्या आहेत. 

Sun, 20 Oct 2019 02:03 PM IST

हिटमॅन रोहित शर्माचे द्विशतक पूर्ण केले. 

हिटमॅन रोहित शर्माचे द्विशतक पूर्ण केले.

 

Sun, 20 Oct 2019 11:12 AM IST

अजिंक्य रहाणे ११५ धावांवर बाद

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ११५ धावांवर बाद झाला आहे.

Sun, 20 Oct 2019 11:10 AM IST

रोहित शर्माने दीडशतक केले पूर्ण

हिटमॅन रोहित शर्माने दीडशतक केले पूर्ण.  

Sun, 20 Oct 2019 11:07 AM IST

अजिंक्य रहाणेने शतक केले पूर्ण

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतक पूर्ण केले.

Sun, 20 Oct 2019 11:05 AM IST

अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा मैदानात उतरले

अजिंक्य रहाणे आणि हिटमॅन रोहित शर्मा मैदानात उतरले.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvsSA Day 2 Stumps : आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!