पुढील बातमी

ICC WC 2019 : नाद नाय करायचा! विराट ब्रिगेडचं 'मिशन फत्ते'

ICC WC 2019 : नाद नाय करायचा! विराट ब्रिगेडचं 'मिशन फत्ते'

मँचेस्टर येथील मैदानात रंगलेल्या 'हाय होल्टेज' सामन्यात भारताने पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने वर्ल्ड कपमधील पाकिस्तान विरुद्ध असलेला आपला दबदबा कायम ठेवला आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकात झालेल्या सातपैकी सात सामन्यात भारताने पाकिस्तानला हिसका दाखवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाक कर्णधार सरफराज अहमदने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर भारतीय सलामीवीरांनी केलेली शतकी भागीदारी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या. 

वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

भारत-पाक सामन्यात भारताच्या डावात एकदा तर पाकिस्तानच्या डावात एकदा पाऊस झाला. पाकिस्तानच्या डावात पावसाने हजेरी लावल्यानंतर सामना ४० षटकांचा करण्यात आला होता. परिणामी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला ३० चेंडूत १३६ धावांचे टार्गेट देण्यात आले होते. पाकिस्तानी संघाला ४० षटकात ६ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारता आली. डोंगरा ऐवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. दुखापतग्रस्त भुवीचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या अष्टपैलू विजय शंकरने इमाम उल हकला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फखर झमान (६२) आणि बाबर आझम (४८) धावा करुन पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी तंबूत परतल्यानंतर पाकची विजयाची वाट धूसर झाली. या दोघांशिवाय इमाद वासिमने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत ३९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव, विजय शंकर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Video : कुलदीपनं पाकच्या सेट जोडीला गंडवलं

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. या जोडीने सुरुवातीला संयमी खेळ करत शतकी भागीदारी रचून पाकिस्तानी गोलंदाजांना बॅफूटवर टाकले. भारताच्या धावफलकावर १३६ धावा असताना रियाझ वहाबने लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का दिला. राहुलने ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने ९८ धावांची भागीदारी रचत भारताला मजबूत स्थितीत आणले. अखेरच्या टप्प्यात धावगती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा १४० धावा करुन तंबूत परतला. त्याला हसन अलीने बाद केले. पाक विरुद्धच्या सामन्यातही हार्दिक पांड्याला बढती मिळाली. त्याने चौथ्या क्रमांकावर येऊन कर्णधार कोहलीसोबत फटकेबाजी केली. एक उंत्तुग फटका मारण्याच्या नादात तो २६ धावांवर झेलबाद झाला. महेंद्रसिंह धोनीला मोहम्मद आमिरने अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. पाकिस्तानकडून आमिरने सर्वाधिक तीन बळी टिपले. 

#IndvsPak : विराटची विकेट ही पाकचं 'फादर्स डे' चं गिफ्ट

Mon, 17 Jun 2019 12:03 AM IST

डकवर्थ लईस नियमानुसार भारताचा पाकवर ८९ धावांनी विजय

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकला सातव्यांदा पराभूत केले.

Sun, 16 Jun 2019 11:38 PM IST

डकवर्थ लुईस नियमानुसार पाकसमोर ३० चेंडूत १३६ धावांचे टार्गेट

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४० षटकांचा करण्यात आला असून पाकिस्तानाल अशक्यप्राय टार्गेट मिळाले आहे

Sun, 16 Jun 2019 10:46 PM IST

पावसामुळे खेळ दुसऱ्यांदा थांबवला

Sun, 16 Jun 2019 10:40 PM IST

पाकला सहावा धक्का, सरफराज माघारी

विजय शंकरने पाकिस्तान कर्णधाराला बाद करत सामन्यात दुसरे यश मिळवले आहे. सरफराज अहमद ३० चेंडूत १२ धावा करुन बोल्ड झाला

Sun, 16 Jun 2019 10:06 PM IST

पांड्याने शोएब मलिकच्या उडवल्या दांड्या, पाकचा अर्धा संघ तंबूत

मोहम्मद हाफिजची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला शोएब मलिकला त्रिफळाचित करत पांड्याने पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत.

Sun, 16 Jun 2019 10:03 PM IST

पाकच्या चौथ्या गड्याला पांड्याने धाडले माघारी

हार्दिक पांड्याने मोहम्मद हाफिजला बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. या विकेट्सनंतर भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली आहे.

Sun, 16 Jun 2019 09:58 PM IST

फखर झमानही कुलदीपच्या जाळ्यात, पाकला तिसरा धक्का

कुलदीप यादवने बाबर नंतर सेट झालेल्या फखरलाही तंबूचा रस्ता दाखवला. त्याला स्वीप शॉट खेळण्याच्या नादात फखरने चहलच्या हाती सोपा झेल दिला. त्याने ६२ धावांची खेळी केली.

Sun, 16 Jun 2019 09:51 PM IST

पाकला दुसरा धक्का, कुलदीपनं बाबरला धाडले माघारी

फिरकीपटू कुलदीप यादवने पाकिस्तानची जमलेली जोडी फोडत भारताला दुसरे यश मिळवून दिले. बाबर आझम ४८ धावा करुन तंबूत परतला

Sun, 16 Jun 2019 09:44 PM IST

फखर झमानने अर्धशतक

कुलदीपच्या षटकात षटकार खेचून फखर झमानने पूर्ण केले अर्धशतक, भारतीय संघासमोर फखर झमान- बाबर आझम जोडी फोडण्याचे आव्हान

Sun, 16 Jun 2019 09:06 PM IST

पाकचे अर्धशतक

बाबर आझम आणि फखर झमान ही जोडी पाकिस्तानच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. १३ व्या षटकात संघाने ५० धावांचा टप्पा ओलंडला

Sun, 16 Jun 2019 08:28 PM IST

पाकला पहिला झटका, इमाम उल हक पायचित

भुवनेश्वरचं षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरनं पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट. इमाम उल हक ७ धावा करुन तंबूत

Sun, 16 Jun 2019 08:06 PM IST

भुवीच्या माऱ्याने डावाला सुरुवात

भुवनेश्वरने पहिल्या षटकात दिल्या केवळ दोन धावा

Sun, 16 Jun 2019 07:33 PM IST

पाकसमोर ३३७ धावांचे लक्ष्य

निर्धारित ५० षटकात भारत ५ बाद ३३६ धावा केल्या आहेत. विजय शंकर (१५) आणि केदार जाधल (९) धावांवर नाबाद राहिले

Sun, 16 Jun 2019 07:23 PM IST

भारताला पाचवा धक्का, कोहली बाद

मोहम्मद आमिरच्या उसळत्या चेंडूवर कोहली ७७ धावा करुन परतला

Sun, 16 Jun 2019 07:22 PM IST

पावसाच्या व्यत्ययानंतर खेळाला सुरुवात

पावसामुळे ब्रेक कमी षटके नाहीत.

Sun, 16 Jun 2019 06:24 PM IST

भारत : ४ बाद ३०५ (४६.४), खेळात पावसाचा व्यत्यय

पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून कर्णधार विराट कोहली ७१ तर विजय शंकर ३ धावांवर नाबाद आहेत.

 

Sun, 16 Jun 2019 06:08 PM IST

धोनी रुपात भारताला चौथा धक्का

मोहम्मद आमिरने धोनीला यष्टिरक्षक सरफराजकरवी झेलबाद केले. धोनी संघाच्या धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घालून तंबूत 

Sun, 16 Jun 2019 06:06 PM IST

कोहलीनं सर केला आणखी एक पल्ला

रनमशीन कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पाही ओलांडला

Sun, 16 Jun 2019 06:02 PM IST

हार्दिक पांड्या बाद, भारताला तिसरा धक्का

आमिरने फटकेबाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला धाडले माघारी, पांड्याने १९ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले.

Sun, 16 Jun 2019 06:01 PM IST

कर्णधार कोहलीचे अर्धशतक

Sun, 16 Jun 2019 05:53 PM IST

कोहली-पांड्या मैदानात

धावगती वाढवण्याची जबाबदारी कोहली-पांड्या जोडीवर
Sun, 16 Jun 2019 05:45 PM IST

रोहितची विकेट

झटपट धावा करण्याच्या नादात रोहित शर्मा बाद, हसन अलीच्या गोलंदाजीवर रियाझने टिपला झेल 

Sun, 16 Jun 2019 05:04 PM IST

रोहित शर्माचे शतक

Sun, 16 Jun 2019 04:52 PM IST

कोहली मैदानात

 कोहलीने मैदानात एन्ट्री मारताचा प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले 

Sun, 16 Jun 2019 04:41 PM IST लोकेश राहुल

भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद

वहाब रियाझने लोकेश राहुलला बाद करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. लोकेश राहुलने ७८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या. 

 

Sun, 16 Jun 2019 04:26 PM IST

लोकश राहुलने षटकार खेचत पूर्ण केलं अर्धशतक

शोएब मलिकच्या गोलंदाजीवर षटकार खेचत लोकेश राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 

Sun, 16 Jun 2019 03:44 PM IST

रोहित शर्माला जीवनदान

दहाव्या षटकात पाकिस्तानने रोहित शर्माला धावबाद करण्याची संधी दवडली

Sun, 16 Jun 2019 03:05 PM IST

केएल. राहुल-रोहित जो़डी मैदानात

भारताकडून के एल राहुलं-रोहित जोडी मैदानात,  आमिरनं पहिले षटक निर्धाव

Sun, 16 Jun 2019 03:00 PM IST

मैदानात भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह

Sun, 16 Jun 2019 02:41 PM IST

भारत-पाक टीम इलेव्हन

भारतीय संघ : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह पाकिस्तान संघ : इमाम उल हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, सरफराज अहमद (यष्टिरक्षक/कर्णधार), शोएब मलिक, इमाद वासिम, शदाब खान, हसन अली, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर
Sun, 16 Jun 2019 02:33 PM IST

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC WC 2019 : नाद नाय करायचा! विराट ब्रिगेडचं 'मिशन फत्ते'