पुढील बातमी

INDvsBAN:पहिला दिवस भारतीय वेगवान गोलंदाजांचा, टीम इंडिया १७४/३

INDvsBAN:पहिला दिवस भारतीय वेगवान गोलंदाजांचा, टीम इंडिया १७४/३

भारत आणि बांगलादेशदरम्यानची अखेरची कसोटी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळली जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशला अवघ्या १०६ धावांवर आटोपले. इशांत शर्माने ५, उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात तीन विकेट गमावून १७४ धावा केल्या. विराट कोहली ५९ तर अजिंक्य रहाणे २३ धावांवर खेळत आहे.

Fri, 22 Nov 2019 09:18 PM IST

६४ धावांचा आघाडी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतील २३ वे अर्धशतक ठोकले. भारताची धावसंख्या १७०/३ असून टीमकडे पहिल्या डावाच्या आधारे ६४ धावांची आघाडी आहे.

Fri, 22 Nov 2019 09:16 PM IST

पुजारा बाद

पुजाराच्या रुपात भारताला तिसरा धक्का. ५५ धावांची शानदार खेळी त्याने केली. भारत १४०/३.

Fri, 22 Nov 2019 09:15 PM IST

पुजाराचे अर्धशतक

भारताचा मधल्या फळीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरोधात अर्धशतक ठोकले. त्याने कर्णधार विराट कोहलीबरोबर ८० धावांहून अधिकची भागिदारी केली. भारताची धावसंख्या १२८/२ आहे.

Fri, 22 Nov 2019 06:33 PM IST

रोहित शर्मा २१ धावांवर बाद

भारताचा दुसरा सलामीवीर रोहित शर्मा वेगवान गोलांदाज इबादत हुसेनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. त्याने २१ धावांची खेळी केली. भारताने दोन गड्यांच्या बदल्यात ४३ धावा केल्या आहेत.

Fri, 22 Nov 2019 05:55 PM IST

मयंक १४ धावांवर बाद

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज अल अमीनने भारताला पहिला झटका देत सलामीवीर मयंक अग्रवालला पॅव्हेलियनमध्ये धाडले. संघाच्या २६ धावा असताना तो बाद झाला. त्याने १४ धावा केल्या.

Fri, 22 Nov 2019 05:44 PM IST

सुरुवात चांगली

भारताच्या सलामीच्या जोडीने सुरुवात चांगली केली. ४ षटकांत विकेट न गमावता २५ धावा केल्या.

Fri, 22 Nov 2019 04:55 PM IST

बांगलादेशचा १०६ धावांत खुर्दा, वेगवान गोलंदाजांची चमकदार कामगिरी

गुलाबी चेंडूवर पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या बांगलादेशाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी १०६ धावांत गुंडाळला गेला. इशांत शर्माने ५, उमेश यादव ३ आणि मोहम्मद शमीने २ बळी टिपले.

Fri, 22 Nov 2019 04:32 PM IST

इशांत शर्मांने घेतला आठवा बळी

भारताची बांगलादेशवर पकड मजबूत झाली आहे. बांगलादेशची अवस्था ८ गड्यांच्या बदल्यात १०३ धावा झाल्या आहेत. त्यांचा संघ अडचणीत आला आहे. इशांत शर्माने मेंहदी हसनला बाद करत आपली चौथी विकेट घेतली.

Fri, 22 Nov 2019 03:18 PM IST

लंच-ब्रेकपर्यंत बांगलादेशच्या ६ बाद ७३ धावा

लंच-ब्रेकपर्यंत बांगलादेशच्या ६ बाद ७३ धावा झाल्या आहेत. बांगलादेशच्या फलंदाजांनी आतापर्यंत अतिशय खराब कामगिरी केली आहे. 

 

Fri, 22 Nov 2019 02:39 PM IST

बांगलादेशला पाचवा धक्का

बांगलादेशला पाचवा धक्का बसला आहे. शादनाम इस्लाम बाद झाला आहे. उमेद यादवने त्याला बाद केले. बांगलादेशने ५ बाद ३८ धावा केल्या आहेत. 

 

Fri, 22 Nov 2019 02:18 PM IST

बांगलादेशला चौथा धक्का; मुशफिकुर रहीम बाद

बांगलादेशला चौथा धक्का बसला आहे. मुशफिकुर रहीम बाद झाला आहे. रहीम देखील एकही धावा न करता बाद झाला आहे. बांगलादेशने ४ बाद २६ धावा केल्या आहेत. 

Fri, 22 Nov 2019 02:16 PM IST

बांगलादेशला तिसरा धक्का; मोहम्मद मिथुन बाद

बांगलादेशला तिसरा धक्का बसला आहे. उमेश यादवने मोहम्मद मिथुनला बाद केले. मोहम्मद एकही धावा न करता बाद झाला आहे. 

Fri, 22 Nov 2019 02:15 PM IST

बांगलादेशला दुसरा धक्का; मोमीउल हक बाद 

बांगलादेशला दुसरा धक्का बसला आहे. कर्णधार मोमीउल हक बाद झाला आहे. उमेश यादवने मोमीउलला बाद केले. मोमीउल एकही धावा न करता बाद झाला आहे. 

 

Fri, 22 Nov 2019 01:41 PM IST

बांगलादेशला पहिला धक्का

भारत विरुध्द बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या डे-नाईट सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. इमरुल कायेस बाद झाला आहे. कायेसने १५ चेंडूमध्ये ४ धावा केल्या आहेत. इशांत शर्माने कायेसला बाद केले. 

 

Fri, 22 Nov 2019 01:12 PM IST

बांगलादेशच्या संघाकडून शादमान इस्लाम आणि इमरुल कायेस मैदानात

बांगलादेश फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. बांगलादेशच्या संघाकडून शादमान इस्लाम आणि इमरुल कायेस मैदानात उतरले आहेत. भारताकडून इशांत शर्मा गोलंदाजी करत आहे. 

Fri, 22 Nov 2019 01:10 PM IST

बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेतला

बांगला देशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Fri, 22 Nov 2019 01:09 PM IST

असा आहे भारताचा संघ

भारतीय संघ - मयांक अग्रवाल. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा, उमेश यादव, आर.अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

 

Fri, 22 Nov 2019 01:05 PM IST

असा आहे बांगलादेशचा संघ

बांगलादेश संघ - शादमान इस्लाम, इमरुल कायेस, मोमीउल हक (कर्णधार), मोहम्मद मिथुन, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह, लिटन दास, नईम हासन, अबू जायेद, अल अमीन हुसैन, एबादत हुसैन

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvsBAN:पहिला दिवस भारतीय वेगवान गोलंदाजांचा, टीम इंडिया १७४/३