पुढील बातमी

INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत बरोबरी

INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत बरोबरी

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजकोटच्या मैदानात भारतीय संघाने बांगलादेशला एकतर्फी मात देत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना शिखर धवन ३१ (२७) आणि रोहित शर्मा ८५ (४३) धावा केल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्यानंतर लोकेश राहुल ८ (११) आणि श्रेयस २४ (१३) धावांवर नाबाद राहत भारताला ८ गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशकडून अमिनूल इस्लामने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. मात्र यापूर्वीच रोहितच्या वादळी खेळीमुळे बांगलादेशचा खेळ खल्लास केला होता. राजकोटच्या मैदानात महा चक्रीवादळाने अडथळा आणला नाही मात्र बांगलादेशच्या विजयी रथ रोहितच्या वादळी खेळीने थांबला आहे.  

किंग कोहलीला जमलं नाही ते स्मृतीनं करुन दाखवलं

राजकोटच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने पाहुण्या बांगलादेशला १५३ धावांवर रोखले होते. लिटन दास आणि मोहम्मद नैमने बांगलादेशच्या डावाला सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. पंतने लिटन दासला धावबाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर वाशिंग्टन सुंदरने नैमला ३६ धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. सलामीवीर माघारी परतल्यानंतर सौम्य सरकारने मोर्चा आपल्या हाती घेतला त्याने २० चेंडूत ३० धावा करत संघाचा डाव सावरला.   

INDvsBAN : बांगलादेशला रोहितच्या वादळी खेळीचा तडाखा

दुसऱ्या बाजूने चहलने मुशफकिर रहिमला अवघ्या ४ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर चहलने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या सरकारला तंबूत धाडले. कर्णधार महमदुल्लाने २१ चेंडूत केलेल्या ३० धावंच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित २० षटकात १५३ धावांपर्यंत मजल मारली होती. 

Thu, 07 Nov 2019 10:43 PM IST

दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयासह भारताची मालिकेत १-१ अशी बरोबरी

राजकोटच्या मैदानातील विजयासह भारताने बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. 

रोहित शर्मा ८५ (४३)
शिखर धवन ३१ (२७)
श्रेयस अय्यर २४ (१३)*
लोकेश राहुल ८ (११)

----------------------------------

अमिनूल इस्लाम २/२९

 

 

Thu, 07 Nov 2019 10:19 PM IST

सलामीवीर रोहित शर्माचे पाचवे शतक हुकले

रोहित शर्मा ४३ चेंडूत ८५ धांवाची खेळी करुन माघारी, अमिनुल इस्लामने त्याला झेलबाद केले.

Thu, 07 Nov 2019 09:57 PM IST

धवनच्या रुपात भारताला पहिला धक्का

सलामीवीर धवनने २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३१ धावांचे योगदान दिले. अमिनुल इस्लामने त्याला बोल्ड केले. 

Thu, 07 Nov 2019 09:42 PM IST

रोहितने षटकाराने साजरे केले अर्धशतक

रोहित शर्माने २३ चेंडूत अर्धशतक साजरे केले. हुसेनच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत त्याने अर्धशतक पूर्ण केले.

Thu, 07 Nov 2019 09:41 PM IST

रोहित धवन यांच्यात अर्धशतकी भागीदारी

 रोहित-धवन यांच्यात अर्धशतकी भागीदारी

Thu, 07 Nov 2019 09:19 PM IST

रोहित-धवन जोडीने केली भारताच्या डावाला सुरुवात

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. रोहित शर्माचा हा १०० वा टी-२० सामना आहे. 

Thu, 07 Nov 2019 08:51 PM IST

निर्धारित २० षटकात बांगलादेश ६ बाद १५३ धावा

मोहम्मद नैम ३६ (३१)
सौम्य सरकार ३० (२०)
महमदुल्ला  ३० (२१)

---------------------
युजवेंद्र चहल २/२८

Thu, 07 Nov 2019 08:41 PM IST

चाहरने महमदुल्लाला धाडले माघारी, भारताला सहावे यश

बांगलादेशचा कर्णधार महमुल्लाने २० चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Thu, 07 Nov 2019 08:32 PM IST

भारताला पाचवे यश,

खलील अहमदच्या षटकात अफिफ हुसेन रोहित शर्माच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याने संघाच्या धावसंख्येत अवघ्या ६ धावांची भर घातली.

Thu, 07 Nov 2019 08:16 PM IST

बांगलादेशचा चौथा गडी माघारी

चहलच्या गोलंदाजीवर यष्टिमागे पंतची उत्कृष्ट कामगिरी, सौम्य सरकारच्या रुपात भारताला चौथे यश  

Thu, 07 Nov 2019 08:07 PM IST

भारताला तिसरे यश, मुशफिकर रहिम माघारी

धोकादायक मुशफिकर चहलच्या जाळ्यात, अवघ्या चार धाव करुन तंबूत. उल्लेखनिय आहे पहिल्या सामन्यात त्याने ६० धावांची खेळी केली होती. या सामन्यात क्रुणालने त्याचा झेल सोडला होता. आजच्या सामन्यात क्रुणालने आपली चूक सुधारत त्याचा झेल टिपला.

Thu, 07 Nov 2019 08:04 PM IST

वाशिंग्टनने भारताला मिळवून दिले दुसरे यश

नैमच्या रुपात युवा फिरकीपटू वाशिंग्टनने बांगलादेशला दुसरा धक्का दिला. नैमने ३१ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ३६ धावांचे योगदान दिले.

mohammad naim photo ht

Thu, 07 Nov 2019 07:44 PM IST

भारताला पहिले यश, लिटन दास माघारी

पंतचे चपळ क्षेत्ररक्षण, चोरटी धाव घेण्याच्या नादात लिटन दासने फेकली विकेट. त्याने मोहम्मद नैमसोबत ६० धावांची भागीदारी रचली. त्याने २९ धावांचे योगदान दिले.

liton das photo ht

Thu, 07 Nov 2019 07:30 PM IST

बांगलादेशची दमदार सुरुवात

मोहम्मद नैम आणि लिटन दास यांनी पहिल्या पाच षटकात 41 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

Thu, 07 Nov 2019 06:34 PM IST

नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

राजकोटच्या मैदानात भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माचा हा १०० वा सामना आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत बरोबरी