पुढील बातमी

INDvsBAN: पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया फ्रंटफूटवर

INDvsBAN: पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया फ्रंटफूटवर

इंदुरच्या मैदानात सुरु असलेल्या भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिला दिवस भारतीय संघाने गाजवला. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात भारतीय संघाने आपली क्षमता दाखवून दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला १५० धावांत आटोपल्यानंतर भारताने पहिल्या दिवसाअखेर १ बाद ८६ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर मयंक अग्रवाल ३७ (८१) आणि चेतेश्वर पुजारा ४३ (६१) खेळत होते.  

पाकची दहा वर्षांची प्रतिक्षा संपली, मायदेशात कसोटी मालिका ठरली

मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माने भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १४ धावा असताना रोहित शर्मा लिटन आबू जायदच्या षटकातील एका चेंडूवर लिटन दासकडे झेल देऊन माघारी फिरला. त्याने १४ चेंडूत ६ धावा केल्या. यात १ चौकाराचा समावेश होता. त्यानंतर अग्रवाल-पुजारा जोडीने कोणतीही पडझड न होऊ देता भारताचा धावफलक हलता ठेवला. भारतीय संघ ६४ धावांनी पिछाडीवर असून दुसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय माऱ्यासमोर बांगलादेश फलंदाज हतबल ठरले. मुशफकिर रहिम (४३) कर्णधार मोमिनुल हक (३७), लिटन दास (२१), मोहम्मद मिथुन (१३) आणि महमदुल्ला (१०) हे फलंदाज सोडले तर अन्य कोणालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. परिणामी पहिल्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या १५० धावांत आटोपला आहे. 

'बॉल टॅम्परिंग'मुळे या खेळाडूवर निलंबनाची कारवाई

नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याच निर्णय घेतलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. ईशांत शर्मा आणि उमेश यादवने सलामी जोडीला स्वस्तात माघारी धाडले. शमीने मोहमद मिथूनला माघारी धाडत बांगलादेशच्या अडचणी वाढवल्या. कर्णधार मोमिनुल हक अश्विनच्या जाळ्यात अडकला. स्थिरावलेल्या मुशफकिर रहिला शमीने माघारी धाडले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन तर ईशांत शर्मा, उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.

Thu, 14 Nov 2019 04:11 PM IST

रोहितच्या रुपात भारताला पहिला धक्का!

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला आबू जायदने अवघ्या ६ धावांवर माघारी धाडले.

Thu, 14 Nov 2019 03:00 PM IST

बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत आटोपला

मुशफिकर रहिम ४३ (१०५)
मोमिनुल हक      ३७ (८०)
-----------------------------
मोहम्मद शमी ३/२७

Thu, 14 Nov 2019 02:59 PM IST

बांगलादेशचा नववा गडी धावबाद होऊन तंबूत

तैजुल इस्लाम धावबाद होऊन परतला आहे. त्याने संघाच्या धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घातली

Thu, 14 Nov 2019 02:37 PM IST

ईशांत शर्माने बांगलादेशला दिला आठवा धक्का

लिटन दास ३१ चेंडूत २१ धावा करुन माघारी, कोहलीने त्याचा सुरेख झेल टिपला

Thu, 14 Nov 2019 02:36 PM IST

बांगलादेशचा सातवा गडी माघारी

मेहंदी हसनला शमीने खातेही उघडू दिले नाही. तो आल्या पावली पायचित होऊन माघारी फिरला

Thu, 14 Nov 2019 02:35 PM IST

बांगलादेशला सहावा धक्का

मुशफिकर रहिम १०५ चेंडूत ४३ धावा करुन माघारी, शमीने भारताला मिळवून दिले यश

Thu, 14 Nov 2019 01:40 PM IST

बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत

अश्विनने महमदुल्ला याला १० धावांवर बाद करत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. 

Thu, 14 Nov 2019 01:38 PM IST

बांगलादेशला चौथा धक्का

मोमीनुल हक ८० चेंडूत ३७ धावा करुन माघारी, अश्विनला मिळाले यश 

Thu, 14 Nov 2019 12:40 PM IST

बांगलादेशने ३ बाद ६३ धावा केल्या

पहिल्या सत्रापर्यंत बांगलादेशने ३ बाद ६३ धावा केल्या आहेत.

Thu, 14 Nov 2019 11:38 AM IST

बांगलादेशला तिसरा धक्का

बांगलादेशला तिसरा धक्का बसला आहे. मोहम्मद शमीने बांगलादेशची तिसरी विकेट घेतली आहे. मोहम्मद मिथून १२ धावांवर बाद झाला आहे. 

Thu, 14 Nov 2019 10:38 AM IST

शादमान इस्लाम ६ धावांवर बाद

बांगलादेशला दुसरा धक्का बसला आहे. शादमान इस्लाम ६ धावांवर बाद झाला आहे. इशांत शर्माने इस्लामची विकेट घेतली.  

Thu, 14 Nov 2019 10:12 AM IST

बांगलादेशला पहिला धक्का

बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. उमेश यादवने इम्रुल कायेसची विकेट घेतली आहे. इम्रुस कायेस ६ धावांवर बाद झाला आहे.

 

 

Thu, 14 Nov 2019 10:08 AM IST

असा आहे बांगलादेशचा संघ

बांगलादेशचा संघ - इमरुल कायेस, शादमान इस्लाम, मोहम्मद मिथून, मोमिनुल हक (कर्णधार), मुशफिकुर रहमान, महमूदुल्लाह, लिटन दास, मेहिदी हसन, तैजुल इस्लाम, अबु जायेद, इबादत हुसैन. 

Thu, 14 Nov 2019 10:00 AM IST

असा आहे भारताचा संघ

भारताचा संघ: मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, रिद्धिमान साहा, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा. 

Thu, 14 Nov 2019 09:58 AM IST

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

 
 

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvsBAN: पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया फ्रंटफूटवर