पुढील बातमी

तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय

तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय

इंदूरच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या कसोटी सामन्यात भारताने  पाहुण्या बांगलादेशचा खेळ तिसऱ्या दिवशीच खल्लास  केला. या सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद शमीने चार फलंदाजांना बाद केले. इतर गोलंदाजांनी त्याला उत्तम साथ दिली. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. 

अयोध्यावर निर्णय देणाऱ्या सरन्यायाधीश गोगोईंना झेड प्लस

पहिल्या डावात मयांक अग्रवालने केलेली द्विशतकी कामगिरी (२४३) आणि अजिंक्य रहाणे (८६), जडेजा नाबाद (६०) आणि पुजाराच्या ५४ धावांच्या जोरावर भारताने पहिला डाव ६ बाद ४९३ धावांवर घोषित करत बांगलादेशसमोर ४९३ धावांचे लक्ष ठेवले होते. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या २१३ धावंवर अटोपला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमीन सर्वाधिक ४ बळी  टिपले. तर आर अश्विन आणि उमेश यादवने प्रत्येक दोन  आणि इशांत शर्माने एक गडी बाद केला. 

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाहीः संजय राऊत

मालिकेचा एक सामना अद्याप बाकी आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना येत्या २२ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना डे-नाईट स्वरूपात खेळला जाणार आहे. हा ऐतिहासिक कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत सलग ६ सामने जिंकल्यानंतर ३०० गुणांसह शीर्षस्थानी आहे.

पालघरमध्ये महिला डॉक्टरचे रॅगिंग; १५ डॉक्टरांविरोधात गुन्हा

Sat, 16 Nov 2019 02:44 PM IST

बांगलादेशला सातवा झटका. मेहदी हसन मिराज बाद.

बांगलादेशला सातवा धक्का बसला आहे. मेहदी हसन मिराज बाद झाला आहे. उमेश यादवने मेहदीला बाद केले आहे. मेहदीने ५५ चेंडूमध्ये ५ चौकार आणि एक षटकारासह ३८ धावा केल्या आहेत. आता मैदानावर तैजुल इस्लाम आला आहे. 

Sat, 16 Nov 2019 01:49 PM IST

बांगलादेशचा लिटन दास बाद

बांगलादेशला सहावा धक्का बसला आहे. लिटन दास बाद झाला आहे. आर अश्विनने लिटन दासला बाद केले. लिटन दासने ३९ चेंडूम्ये ६ चौकारसह ३५ धावा केल्या आहेत. आता महदी हसन मैदानात उतरला आहे. 

Sat, 16 Nov 2019 12:40 PM IST

बांगला देशला पाचवा झटका. महमुदुल्ला बाद.

बांगलादेशला पाचवा झटका बसला आहे. महमुदुल्ला बाद झाला आहे. रोहित शर्माने महमुदुल्लाचा चेंडू झेलला आहे. महमुदुल्लाने ३५ चेंडूमध्ये २ चौकारासह १५ धावा केल्या आहेत. आता मैदानावर लिटन दास आला आहे.

 

Sat, 16 Nov 2019 11:38 AM IST

लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने ४ बाद ६० धावा

भारत विरुध्द बांगलादेश सामन्यात लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने ४ बाद ६० धावा केल्या आहे. 

Sat, 16 Nov 2019 11:37 AM IST

बांगलादेशला चौथा धक्का. मोहम्मद मिथुन बाद.

बांगलादेशला चौथा धक्का बसला आहे. मोहम्मद मिथुन बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला बाद केले आहे. मिथुनने २६ चेंडूमध्ये ४ चौकारसह १८ धावा केल्या आहेत. मैदानावर आता महमुदुल्ला आला आहे.

 

Sat, 16 Nov 2019 10:54 AM IST

बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हक बाद

बांगलादेशला तिसरा धक्का बसल आहे. बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हक बाद झाला आहे. मोहम्मद शमीने मोमिनुलला बाद केले आहे. मोमिनुलने २० चेंडूमध्ये १ चौकार आणि ७ रन बनवले आहे. आता मैदानावर मुशफिकुर रहीम आला आहे.

Sat, 16 Nov 2019 10:28 AM IST

बांंगलादेशला दुसरा झटका. शादमान इस्लाम बाद.

बांगलादेशला दुसरा धक्का बसला आहे. शादमान इस्लाम बाद झाला आहे. इशांत शर्माने शादमानला बाद केले. शादमानने २४ बॉलमध्ये ६ रन बनवले आहे. मोहम्मद मिथुन मैदानात उतरला आहे.

 

Sat, 16 Nov 2019 10:08 AM IST

बांगलादेशला पहिला धक्का, इम्रुल कायस बाद

बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. इम्रुल कायस बाद झाला आहे. उमेश यादवने इम्रुलला बाद केले. इम्रुलने १३ बॉलमध्ये १ चौकारसोबत ६ धावा केल्या आहेत. बांगलादेशचा मोमिनुल हक मैदानावर आला आहे.

Sat, 16 Nov 2019 10:03 AM IST

दुसर्‍या डावात बांगलादेशने सावध सुरुवात

सामन्याच्या तिसर्‍या दिवशी दुसर्‍या डावात बांगलादेशने सावध सुरुवात झाली आहे. बांगलादेशचा सलामीवीर शादमन इस्लाम आणि इम्रुल कायस मैदानावर उतरले आहे. ईशांत शर्मा गोलंदाजी करत आहे.

Sat, 16 Nov 2019 10:00 AM IST

भारतीय संघाचा पहिला डाव ४९३ धावांवर घोषीत

भारतीय संघाचा पहिला डाव ४९३ धावांवर घोषीत झाला आहे. भारताकडे ३४३ धावांची आघाडी जमा झाली आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय