पुढील बातमी

NZvsIND : टेलरचा शतकी ट्रेलर! वनडेत किवींच्या जिवात जीव...

NZvsIND : टेलरचा शतकी ट्रेलर! वनडेत किवींच्या जिवात जीव...

टी-२० मालिकेत भारताकडून सपाटून मार खालेल्या न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. रॉस टेलरच्या नाबाद शतकी खेळीसह हेन्री निकोलस (७८) आणि टॉम लॅथम (६९) धावांच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाला ४ गडी राखून नमवले. टी-२० मालिकेतील पराभवानंतर वनडेत मिळवलेला विजय यजमान किवींच्या जिवात जीव आणणारा असाच आहे. रॉस टेलरने ८४ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद १०९ धावा केल्या. विश्वचषकानंतर भारत-न्यूझीलंड यांच्यातील हा पहिला एकदिवसीय सामना होता. विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापू्र्वी न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ३४७ धावांचे लक्ष्य पार केले होते.   

Video : कोहलीने घेतलेल्या या विकेटची चर्चा तर होणारच!

प्रथम फलंदाजी करताना युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे शतक (१०३) आणि लोकेश राहुलच्या नाबाद (८८) धावांच्या जोरावर टीम इंडियाने यजमान न्यूझीलंडसमोर ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर पृथ्वी शॉ (२०) आणि मयांक अग्रवाल (३२) धावांवर बाद झाल्यानंतर कोहली-अय्यर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहलीने (५१) धावांची खेळी केली. कोहली बाद होऊन परतल्यानंतर अय्यररने राहुलच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला.

...म्हणून पहिलं वहिलं शतक अय्यरसह संघासाठीही 'स्पेशल'

या जोडीने १३६ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात केदार जाधवनेही फटकेबाजी करत १५ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले.न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक दोन तर डी ग्रँडहोम आणि सोधी यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला. अन्य गोलंदाजांनी खादे पाडल्यामुळे टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात ४ बाद ३४७ धावांपर्यंत मजल मारता आली.  

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हेमिल्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. टी-२० मालिकेतील दिमाखदार विजयातीय सातत्य राखण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला असून दुसरीकडे केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टी-२० मालिकेची पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान यजमानांसमोर  आहे. 

Wed, 05 Feb 2020 03:51 PM IST

एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडची विजयी सलामी!

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ४ गडी राखून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Wed, 05 Feb 2020 03:34 PM IST

न्यूझीलंडचा सहावा गडी तंबूत, कॉलिन डी ग्रँडहोम धावबाद

कॉलिन डी ग्रँडहोम अवघ्या एका धावेची भर घालून चालता झाला. 

Wed, 05 Feb 2020 03:30 PM IST

जीमी नीशमच्या रुपात न्यूझीलंडला पाचवा धक्का!

शमीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात  जीम नीशम बाद, त्याने संघाच्या धावसंख्येत ९ धावांची भर घातली 

Wed, 05 Feb 2020 03:24 PM IST

रॉस टेलरचं शतक!

भारतीय संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना रॉस टेलरने शतकी खेळी करत सामना न्यूझीलंडच्या बाजूने वळवला आहे.

Wed, 05 Feb 2020 03:11 PM IST

लॅथमच्या रुपात न्यूझीलंडला चौथा धक्का!

बुमराहच्या षटकात उत्तुंग फटका मारण्याच्या नादात लॅथमने गमावली विकेट, मोहम्मद शमीने सीमारेषेवर कोणतीही चूक न करता झेल टिपला. लॅथमने ४८ चेंडूत ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Wed, 05 Feb 2020 03:00 PM IST

टेलर-लॅथम जोडीची शतकी भागीदारी

टेलर-लॅथम यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत सामना न्यूझीलंडच्या बाजूने फिरवला आहे.

Wed, 05 Feb 2020 02:31 PM IST

न्यूझीलंडची मदार टेलर-लॅथम जोडीवर

टेलरने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला आहे. दुसऱ्या बाजूला लॅथमही फटकेबाजी करत असून ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Wed, 05 Feb 2020 02:05 PM IST

कोहलीनं दिला ब्रकथ्रू! निकोलसच्या रुपात न्यूझीलंडला तिसरा धक्का...

विराट कोहलीने क्षेत्ररक्षणातील चपळाई दाखवत हेन्री निकोलसला धावबाद केले. त्याने ८२ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली. 

Wed, 05 Feb 2020 01:33 PM IST

टॉम ब्लुडेंलच्या रुपात न्यूझीलंडला दुसरा धक्का!

कुलदीप यादवने गप्टिलची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या टॉमला चकवा दिला. यष्टिमागे लोकेश राहुलने सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत त्याला तंबूत धाडले. टॉमने ९ धावा केल्या.

Wed, 05 Feb 2020 01:30 PM IST

शार्दूल ठाकूरने न्यूझीलंडची सलामी जोडी फोडली!

मार्टिन गप्टिलच्या रुपात न्यूझीलंडला पहिला धक्का, शार्दूलच्या गोलंदाजीवर केदार जाधवने घेतला झेल. गप्टिलने ३२ धावांचे योगदान दिले.

Wed, 05 Feb 2020 12:53 PM IST

न्यूझीलंडची सलामी जोडी जमली!

न्यूझीलंडचे सलामीवीर हेन्री निकालस आणि मार्टिन गप्टिल यांनी संयमी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली असून भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण केले आहे. 

Wed, 05 Feb 2020 11:40 AM IST

भारत निर्धारित ५० षटकात ४ बाद ३४७ धावा!

श्रेयस अय्यर- १०३

लोकेश राहुल-८८

विराट कोहली-५१

-------------------------------

टिम साऊदी- सर्वाधिक दोन विकेट्स

 

Wed, 05 Feb 2020 11:03 AM IST

साऊदीनं श्रेयस अय्यरच्या इनिंगला लावला ब्रेक

श्रेयस अय्यरने १०७ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०३ धावांची जबरदस्त खेळी केली.
 

Wed, 05 Feb 2020 10:43 AM IST

श्रेयस अय्यरचं शतक तर लोकेश राहुलचे अर्धशतक!

न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या जीवनदानाचा फायदा उठवत युवा फलंदाज श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील आपले पहिले शतक साजरे केले. त्याच्यासोबत लोकेश राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले आहे. 

Wed, 05 Feb 2020 10:05 AM IST

श्रेयस अय्यरचे अर्धशतक!

सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मध्ये फळीतील युवा फलंदाज श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले आहे. 

Wed, 05 Feb 2020 09:45 AM IST

विराट कोहलीच्या रुपात भारताला तिसरा धक्का!

कर्णधार विराट कोहलीच्या रुपात  ईश सोधीने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने ६३ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. 

Wed, 05 Feb 2020 09:00 AM IST विराट-श्रेयस

विराट- श्रेयसवर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी

सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आले असून भारताचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी या जोडीवर आहे. 

Wed, 05 Feb 2020 08:17 AM IST

वनडे पदार्पणात मयांकचाही फ्लॉप शो, भारताला दुसरा धक्का!

टिम साऊदीने टीम इंडियाला दिला दुसरा धक्का, वनडे पदार्पणात मयांक अग्रवालला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश, तो ३२ धावा करुन माघारी फिरला आहे.

Wed, 05 Feb 2020 08:15 AM IST

भारताला पहिला धक्का!

पृथ्वी शॉ अवघ्या २१ धावा करुन माघारी, कॉलिन डी ग्रँडहोमने भारताला दिला पहिला धक्का

Wed, 05 Feb 2020 07:32 AM IST

पृथ्वी अन् मयांकचं वनडेत पदार्पण!

पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांना टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. पदार्पणाच्या सामन्यात ही जोडी कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Wed, 05 Feb 2020 07:26 AM IST

न्यूझीलंडने नाणफेक जिंकली!

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NZvsIND : टेलरचा शतकी ट्रेलर! वनडेत किवींच्या जिवात जीव...