पुढील बातमी

INDvWI 3rd T20I: कोहली ब्रिगेडचा विंडीजला व्हाइट व्हॉश

INDvWI 3rd T20I: कोहली ब्रिगेडचा विंडीजला व्हाइट व्हॉश

India vs West Indies 3rd T20 International Match Guyana Weather Forecast:

टीम इंडियाने टी-२० सामन्याच्या मालिकेतील तिन्ही सामने जिंकून वेस्ट इंडिजला व्हाइट व्हॉश दिला. कर्णधार विराट कोहली (५९ धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (नाबाद ६५ धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचा पराभव केला. विंडीजने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात पार केले. पंतने ब्रेथवेटला षटकार ठोकून भारताचा विजय साकार केला. भारताकडून केएल राहुलने २० धावा, शिखर धवनला केवळ ३ धावा करता आल्या. मनीष पांडे २ धावांवर नाबाद राहिला. विंडीजकडून थॉमसने २ तर एलेनने १ गडी टिपला. 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजकडून कायरन पोलार्डच्या (५८) अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ६ विकेटच्या बदल्यात १४६ धावा केल्या. पोलार्डने ४५ चेंडूंवर ६ षटकार आणि १ चौकारच्या जोरावर ५८ धावा केल्या. भारताचा मध्यमगती गोलंदाज दिपक चहरने केवळ ४ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. नवदीप सैनीने २ विकेट घेतल्या. तर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या राहुल चहरने १ बळी घेतला. 

हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. पावसामुळे खेळ उशिराने सुरु झाला होता. 

Tue, 06 Aug 2019 10:54 PM IST

भारताला १४७ धावांचे आव्हान

विंडीजने निर्धारित २० षटकांत ६ बाद १४६ धावा केल्या. पोलार्ड आणि पॉवेलच्या आक्रमक फलंदाजीमुळे विंडीजने सन्मानजनक धावा केल्या. एकवेळ ३ बाद १४ धावा झाल्या होत्या. पोलार्डने पूरनच्या मदतीने धावफलक हलता ठेवला. पूरनने १७ धावा केल्या. पॉवेलने २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. 

भारताकडून दिपक चहरने ३ गडी टिपले. त्याला नवदीप सैनीने २ गडी आणि राहुल चहरने १ टिपत साथ दिली. 

Tue, 06 Aug 2019 10:38 PM IST

राहुल चहरने घेतला पहिला आंतरराष्ट्रीय बळी

आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या फिरकीपटू राहुल चहरने आपला पहिला बळी ब्रेथवेटच्या रुपाने घेतला. लाँग ऑनला वाशिंग्टन सुंदरने त्याचा उंच उडालेला झेल टिपला. या चेंडूच्या आधी ब्रेथवेटने राहुलला षटकार ठोकला होता. ब्रेथवेटने १० धावा केल्या.

Tue, 06 Aug 2019 10:31 PM IST

अर्धशतकवीर पोलार्डचा अडसर सैनीने केला दूर

आक्रमक फलंदाजी करत अर्धशकत केेलेले पोलार्डचा अडसर नवदीप सैनीने बाद केले. स्लोवर डिलिव्हरीवर ५८ धावांवर पोलार्डचा त्रिफळा उडाला. त्याने ४५ चेंडून ५८ धावा केल्या. त्यात ६ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे.

Tue, 06 Aug 2019 10:27 PM IST

पोलार्डचे धुवांधार अर्धशतक

एकाबाजूने विकेट पडत असतानाही पोलार्डने आपला आक्रमकपणा कायम ठेवला. त्याने पूरनच्या मदतीने डाव सावरत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने खराब चेंडूचा समाचार घेतला. त्याने षटकारांचा पाऊस पाडला. 

Tue, 06 Aug 2019 10:23 PM IST

सैनीने टिपला टीमचा चौथा बळी

नवदीप सैनीने जम बसवू पाहत असलेल्या पूरनला यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी बाद केले. बाहेर जाणारा चेंडू पूरनच्या बॅटची कड घेऊन पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पूरनने २३ चेंडूत १७ धावा केल्या. पूरनने पोलार्डच्या मदतीने संघाचा डाव सावरला.

Tue, 06 Aug 2019 10:10 PM IST

विंडीजच्या १२ षटकांत ३ बाद ७३ धावा

पोलार्ड ४० धावा (३३ चेंडू)

पूरन १४ धावा (१९ चेंडू)

दिपक चहर ३ षटकांत ४ धावा ३ बळी

Tue, 06 Aug 2019 09:48 PM IST

विंडीजच्या ६ षटकांत ३ बाद २२ धावा

पोलार्ड ८ धावांवर तर पूरन ० धावावर खेळत आहे. दिपक चहरने ३ गडी टिपले.

Tue, 06 Aug 2019 09:46 PM IST

हेटमायर दिपक चहरचा तिसरा बळी

सलामीची जोडी परतल्यानंतर मैदानात आलेल्या हेटमायरलाही चहरने खेळपट्टीवर टिकू दिले नाही. डावखुऱ्या हेटमायरलाही चहरने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जाळ्यात ओढले. हेटमायर १ धावेवर पायचित झाला.

Tue, 06 Aug 2019 09:38 PM IST

दिपकने लेविसला पायचितच्या जाळ्यात ओढले

दीपक चहरने आपल्या दुसऱ्या षटकात पुन्हा एक धक्का दिला. त्याने डावखुऱ्या एव्हिन लेविसला पायचीतच्या जाळ्यात ओढले. लेव्हिसने रिव्ह्यू घेतला. पण त्यातही त्याला बाद देण्यात आले. त्याने १० (११ चेंडू) धावा केला

Tue, 06 Aug 2019 09:27 PM IST

दिपक चहरने दिला विंडीजला पहिला धक्का

दिपक चहरच्या बाहेर जाणारा चेंडू खेळणे सलामीवीर सुनील नरेनला महागात पडले. मिड ऑनला उडालेला त्याचा झेल नवदीप सैनीने टिपला. नरेनने ६ चेंडूत २ धावा केल्या. 

Tue, 06 Aug 2019 09:03 PM IST

वेस्ट इंडिजचा संघ असा

कार्लोस ब्रेथवेल, इव्हिन लेव्हिस, जॉन कॅम्पबेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, सुनील नरेन, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस,फॅबियन अलेन.

Tue, 06 Aug 2019 08:59 PM IST

रोहित शर्माला विश्रांती.

टीम इंडियात बदल. रोहित शर्माला विश्रांती. त्याच्या जागी केएल राहुल संघात. त्याचबरोबर रवींद्र जडेजा ऐवजी राहुल चहर, खलील अहमद ऐवजी दिपक चहरचा संघात समावेश


टीम इंडियाः केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, मनीश पांडे, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर आणि नवदीप सैनी.

Tue, 06 Aug 2019 08:52 PM IST

नाणेफेक जिंकून भारतचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

Tue, 06 Aug 2019 08:02 PM IST

बीसीसीआयचेही टि्वट

काही वेळापूर्वी बीसीसीआयने टि्वट करुन गयाना येथे मोठ्याप्रमाणात ढग आल्याचे सांगितले. सामना पावसामुळे वाया जाण्याची शक्यता.

Tue, 06 Aug 2019 07:59 PM IST

पाऊस पडल्यामुळे स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.४५ वाजता खेळपट्टीची पाहणी

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvWI 3rd T20I: कोहली ब्रिगेडचा विंडीजला व्हाइट व्हॉश