श्रीलंकेचा डाव १२३ धावांत संपुष्टात
टीम इंडियाने दिलेले २०२ धावांचे आव्हान लंकेला पेलता आले नाही. त्यांचा डाव १५.५ षटकांत १२३ धावांवर संपुष्टात आला. डिसिल्व्हा (५७) आणि अँजेलो मॅथ्यूज (३१) यांच्याशिवाय लंकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकून खेळता आले नाही. ७८ धावांनी त्यांचा पराभव झाला. टीम इंडियाकडून नवदीप सैनीने ३, शार्दूल ठाकूरने २ वॉशिंग्टन सुंदरने २ आणि जसप्रित बुमराहने १ बळी घेतला.
श्रीलंकेचे चार गडी तंबूत
भारताने सुरुवातीलाच श्रीलंकेला धक्के दिले. बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात गुणथलिकाला १ धावसंख्येवर बाद केले. त्याच्याच पुढच्याच षटकात शार्दूल ठाकूरने फर्नांडोला ९ धावेवर बाद केले. अय्यरने त्याचा झेल टिपला. सैनीने परेराचा ७ धावांवर त्रिफळा उडवला. श्रीलंकेने ९.५ षटकांत ४ बाद ७७ धावा केल्या आहेत.
श्रीलंकेला २०२ धावांचे आव्हान
मनीष पांडे-शार्दूल ठाकूरने अखेरच्या षटकांमध्ये धुवांधार फलंदाजी करत भारताचे द्विशतक फलकावर लावले.
India vs Sri Lanka 3rd T20I: India scores 201/6 in 20 overs, in Pune
— ANI (@ANI) January 10, 2020
संदकनची भेदक गोलंदाजी, टीम इंडियाचे ४ गडी तंबूत
श्रीलंकेचा फिरकीपटू संदकनने भेदक गोलंदाजी केली. त्याने तीन बळी घेतले. संजू सॅमसननंतर आलेला श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाला.
राहुलही ५४ धावांवर बाद
फॉर्मात असलेला के एल राहुलही यष्टिचित झाला. तो ५४ धावांवर बाद झाला. त्यालाही संदकनने बाद केले
संजू सॅमसन आल्यापावली परत
षटकार मारुन सुरुवात करणारा संजू सॅमसन आल्या पावली परतला. डिसिल्वाने त्याला ६ धावांवर पायचित केले.
संजू सॅमसनचा पहिल्याच चेंडूवर षटकार
ऋषभ पंतच्या जागेवर संघात आलेल्या संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. के एल राहूल ४३ धावांवर खेळत असून टीम इंडियाच्या ११ षटकात १ बाद १०६ धावा
धवन ५२ धावांवर बाद
आक्रमक फलंदाजी करणारा शिखर धवन अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. संदकनच्या गोलंदाजीवर गुणाथिलिकाने धवनचा झेल टिपला. धवन ५२ धावांवर बाद झाला.
पाच षटकांत टीम इंडियाचे अर्धशतक
सलामीची जोडी शिखर धवन आणि के एल राहूल यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. पहिल्या पाच षटकातंच टीम इंडियाने अर्धशतक पूर्ण केले आहे. राहुल २९ तर धवन ३० धावांवर खेळत आहे.
मलिंगाचा गोलंदाजीचा निर्णय
Sri Lanka win the toss and bowl first.
— ICC (@ICC) January 10, 2020
Angelo Mathews is set to return to T20I action after 16 months!
India make three changes with Chahal, Samson and Pandey getting a game.#INDvSL pic.twitter.com/T7XG2qAPZR