पुढील बातमी

ICC WC #INDvWI : टीम इंडिया @143 विंडीज ऑल आउट! भारताचा विजयी पंच

ICC WC #INDvWI : टीम इंडिया @143 विंडीज ऑल आउट! भारताचा विजयी पंच

मँचेस्टरच्या मैदानात वेस्ट इंडीजचा एकहाती पराभूत करत भारताने उंपात्यफेरीत स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाउल टाकले. ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने विंडीजसमोर २६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजचा संघ  ३४. २ षटकात १४३ धावांत आटोपला. पाचव्या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. 

भारताने दिलेल्या धावाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजला मोहम्मद शमीने गेलच्या रुपात पहिला धक्का दिला. गेल अवघ्या ६ धावा करुन माघारी फिरला. त्याच्या जागी मैदानात आलेल्या शायी होपलाही शमीने ५ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत पूरन-एंब्रीस जोडीने संयमी खेळी करत विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने एंब्रिसला ३१ धावांवर पायचित करत ही जोडी फोडली. कुलदीप यादवने त्याच्या फिरकीतील जादू दाखवत निकोलस पुरनचा संयमी खेळीला लगाम लावला. पूरनने ५० चेंडूत २८ धावा केल्या. चहलने  जेसन होल्डर  ६ धावांवर माघारी धाडले. बुमराहने कार्लोस ब्रेथवेट (१) आणि ऐलनला शून्यावर माघारी धाडत विंडीजला लागोपाठ धक्के दिले. कर्णधाराने पुन्हा शमीच्या हातात चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत शमीने १८ धावांवर खेळणाऱ्या हेटमायरला माघारी धाडले. चहलने कॉट्रेलला पायचित करत विंडीजला नववा धक्का दिला. सामन्या पहिली विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीनेच थॉमसला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा १८ धावांवर बाद झाल्यानंतर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना जेसन होल्डरने लोकेश राहुलला ४८ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात आलेला विजय शंकर संघाच्या धावसंख्येत १४ धावांची भर घालून माघारी फिरला. केदार जाधव अवघ्या ७ धावांवर बाद झाला. एका बाजूने गडी बाद होत असताना कर्णधार विराट कोहली मैदानात तग धरुन होता. कोहलीने ८२ चेंडूत ७२ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. होल्डरच्या एका चेंडूवर तो झेलबाद झाला. 

कोहली बाद झाल्यानंतर धोनीने हार्दिक पांड्याच्या साथीने अखेरच्या षटकात महत्त्वपूर्ण भागीदारी रचत विंडीजसमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली. हार्दिक पांड्याने ३८ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. धोनीने ६१ चेंडूत ५६ धावांची नाबाद खेळी करत भारताला निर्धारित ५० षटकात ७ बाद २६८ धावांपर्यंत पोहचवले होते.  

Thu, 27 Jun 2019 10:23 PM IST

वेस्ट इंडिज सर्वबाद १४३ (मोहम्मद शमी सर्वाधिक चार विकेट्स)

 थॉमसला बाद करत शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला

Thu, 27 Jun 2019 09:54 PM IST

विंडीजला नववा धक्का, कॉट्रेल माघारी

चहलच्या गोलंदाजीवर कॉट्रेल पायचित, त्याने १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८ चेंडूत १० धावा केल्या.

Thu, 27 Jun 2019 09:45 PM IST

हेटमायरचा खेळ खल्लास! शमीने विंडीजला आठवा धक्का

मोहम्मद शमीने हेटमायरला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. त्याने २९ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १८ धावा केल्या.

Thu, 27 Jun 2019 09:43 PM IST

बुमराने विंडीजला दिले लागोपाठ धक्के, विंडीज ७ बाद १०७ (२६.२)

जसप्रीत बुमराहने कार्लोस ब्रेथवेट (१) आणि ऐलनला खातेही न उघडता माघारी धाडले.

Thu, 27 Jun 2019 09:40 PM IST

कर्णधार जेसन होल्डर चहलच्या जाळ्यात, विंडीजचा अर्धा संघ तंबूत

चहलच्या गोलंदाजीवर कर्णधार ६ धावांवर खेळणारा केदार जाधवकडे झेल सोपवून जेसन होल्डर माघारी  

Thu, 27 Jun 2019 09:38 PM IST

निकोलस पूरन कुलदीपच्या जाळ्यात, विंडीजला चौथा धक्का

 निकोलस पूरनने ५० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २८ धावांचे योगदान दिले.

Thu, 27 Jun 2019 09:35 PM IST

हार्दिक पांड्याला पहिले यश , विंडीजचा तिसरा गडी तंबूत

सुनील एंब्रिस ४० चेंडूत ३१ धावा करुन माघारी, हार्दिक पांड्याने त्याला पायचित केले. 

Thu, 27 Jun 2019 08:04 PM IST

शमीने होपच्या दांड्या केल्या गुल, विंडीजला दुसरा धक्का

मोहम्मद शमीने एका अप्रतिम इनस्विंगवर होपच्या दांड्या उडवल्या, होप ५ धावा करुन तंबूत परतला. 

Thu, 27 Jun 2019 07:55 PM IST

स्फोटक गेल माघारी, भारताला पहिले यश

मोहम्मद शमीने ख्रिस गेलला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. केदार जाधवने ६ धावांवर खेळणाऱ्या गेलचा कोणतीही चूक न करता झेल टिपला.

Thu, 27 Jun 2019 07:03 PM IST

निर्धारित ५० षटकात भारत ७ बाद २६८ धावा

भारतीय फंलदाजी
विराट कोहली    ७२
महेंद्रसिंह धोनी  ५६
लोकेश राहुल :   ४८
हार्दिक पांड्या     ४६

---------------------------
विंडीज गोलंदाज
केमार रोच        ३/३६
शेल्डन कॉट्रेल  २/५०
जेसन होल्डर   २/३३

Thu, 27 Jun 2019 06:57 PM IST

धोनीचं अर्धशतक

अखेरच्या षटकात फटकेबी करत धोनीने ७२ वे अर्धशतक साजरे केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. 

Thu, 27 Jun 2019 06:55 PM IST

भारताचा सातवा गडी माघारी, शमी शून्यावर बाद

 कॉट्रेलने शमीला खातेही उघडू दिले नाही, कॉट्रेलला दुसरे यश

Thu, 27 Jun 2019 06:53 PM IST

हार्दिक पांड्याच्या रुपात भारताला सहावा धक्का

कॉट्रेलने हार्दिक पांड्याची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. पांड्याने ५ चौकाराच्या मदतीने ३८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली

Thu, 27 Jun 2019 06:03 PM IST

विराट माघारी, भारताला पाचवा धक्का

लयीत खेळणाऱ्या भारताच्या कर्णधार विराट कोहलीला विंडीज कर्णधार जेसन होल्डरने डीएम ब्रावोकरवी झेलबाद केले. कोहलीने ८ चौकाराच्या मदतीने ८२ चेंडूत ७२ धावा केल्या. 

Thu, 27 Jun 2019 05:36 PM IST

रोचची तिसरी विकेट, भारताला चौथा धक्का

 केदार जाधव १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ ७ धावांचे योगदान देवू शकला.

Thu, 27 Jun 2019 05:34 PM IST

विजय शंकरच्या रुपात भारताला तिसरा धक्का

रोचच्या षटकात विजय शंकर शायी होपच्या हाती झेल देवून परतला. त्याने १९ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १४ धावा केल्या
 

Thu, 27 Jun 2019 04:53 PM IST

भारताला दुसरा धक्का, लोकेश राहुल माघारी

भारताचा सलामीवीर लोकेश राहुल ४८ धावा करुन बाद झाला. विंडीज कर्णधार जेसन होल्डरने त्याला माघारी धाडले

Thu, 27 Jun 2019 03:30 PM IST

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

रोचनं रोहित शर्माला १८ धावांवर माघारी धाडले आहे. कर्णधार विराट कोहली मैदानात

Thu, 27 Jun 2019 02:46 PM IST

भारतीय संघात कोणताही बदल नाही

भारतीय संघ : लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

वेस्ट इंडिज संघ : क्रिस गेल, सुनील अंब्रिस, शायी होप (यष्टिरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, फेबिन अॅलन, के. रोच, शेल्डॉन कॉट्रेल, ओ. थॉमस 

Thu, 27 Jun 2019 02:44 PM IST

नाणेफेक जिंकून भारताने स्वीकारली फलंदाजी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC WC #INDvWI : टीम इंडिया @143 विंडीज ऑल आउट! भारताचा विजयी पंच