पुढील बातमी

डायना बेंचजवळ उभे राहून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन

डायना बेंचजवळ उभे राहून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन

भारतात येणं हा माझा सन्मान समजतो, भारतानं केलेलं आदरातिथ्य आम्ही नेहमीच स्मरणात ठेवू, असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आज भारतात आगमन झाले, ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.  

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममधून लाखो भारतीयांना संबोधित केले, या भाषणाआधी ट्रम्प यांनी मोदींचा उल्लेख 'सच्चा मित्र' म्हणूनही केला. डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावयासमवेत भारतात आले आहेत. या कार्यक्रमाआधी ट्रम्प दाम्पत्यानं  साबरमती गांधी आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर ट्रम्प आणि मोदी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी झाले. 

अमेरिकेचं भारताप्रती प्रेम आहे आणि भविष्यातही राहिल. या देशाप्रती अमेरिकेला आदर आहे आणि आम्ही या देशाप्रती नेहमीच कृतज्ञ राहू असं ट्रम्प म्हणाले. नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ट्रम्प आणि मेलानिया आग्र्याल जातील.  सायंकाळी ५.१५ वाजता ते जगप्रसिद्ध ताज महालला भेट देतील. अशी साधरण आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा असल्याचं समजत आहे. 

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा

Mon, 24 Feb 2020 05:48 PM IST

डायना बेंचवर बसून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन

ताजमहलमध्ये 'डायना बेंच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बेंचवर बसून ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले.

 

 

Mon, 24 Feb 2020 05:46 PM IST

ट्रम्प यांनी ताजमहलच्या व्हिझिटर बुकवर नोंदवला अभिप्राय

डोनाल्ड ट्रम्प यांनी ताजमहाल येथील व्हिझिटर बुकमध्ये संदेश लिहिला. 'ताजमहाल विस्मयकारक, भारतीय संस्कृतीच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सौंदर्याचा एक शाश्वत करार आहे, धन्यवाद भारत.'

Mon, 24 Feb 2020 05:29 PM IST

ट्रम्प यांची मुलगी इवांका ताजमहल येथे दाखल

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड कुशनर देखील ताजमहल येथे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ताजमहलची पाहणी सुरु आहे. 

Mon, 24 Feb 2020 05:24 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताजमहलची पाहणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प आग्र्यामध्ये दाखल झाले आहेत. ताजमहलची ते पाहणी करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ताजमहलच्या विजिट बुकमध्ये संदेश लिहिला. 
 

Mon, 24 Feb 2020 04:31 PM IST

डोनाल्ड ट्रम्प आग्रा विमानतळावर दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रा विमानतळावर दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहल या ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहेत. 

Mon, 24 Feb 2020 03:41 PM IST

ट्रम्प यांच्या मुलीसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी

 ट्रम्प यांची मुलगी इवांकासोबत सेल्फी घेण्यासाठी विमानतळावर गर्दी जमली होती.

Mon, 24 Feb 2020 03:05 PM IST

डोनाल्ड ट्रम्प आग्र्यासाठी रवाना

ट्रम्प आणि मेलानिया आग्र्यासाठी रवाना झाले आहेत. ते जगप्रसिद्ध ताजमहालला भेट देणार आहेत

Mon, 24 Feb 2020 02:27 PM IST

भारत आणि अमेरिकेत निर्माण झालेला विश्वास अधिक मजबूत- मोदी

गेल्या काही वर्षांत या दोन देशात अधिक विश्वासाचं नातं निर्माण झालं आहे, ही कौतुकाची बाब आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Mon, 24 Feb 2020 02:17 PM IST

दहशतवाद थांबवण्यासाठी भारत- अमेरिका एकत्र काम करणार - ट्रम्प

भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव  निवळण्यासाठी, शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणार.

Mon, 24 Feb 2020 02:10 PM IST

ट्रम्पकडून बॉलिवूडचं कौतुक

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मनोरंजनसृष्टीचं  कौतुक केलं आहे. दरवर्षी येथे हजारो चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें' चित्रपटाचंही कौतुकही केलं. 

Mon, 24 Feb 2020 02:04 PM IST

मोदींच्या कामचं ट्रम्पकडून कौतुक

गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे ही कौतुकाची बाब आहे, असं म्हणत मोदींच्या कामचं  ट्रम्पकडून कौतुक 

Mon, 24 Feb 2020 02:00 PM IST

इथे येणं हा माझा सन्मान समजतो, मोदी हे माझे खरे मित्र - ट्रम्प

'इथे येणं हा माझा सन्मान समजतो, मोदी हे माझे खरे मित्र आहे. आम्ही इतक्या दूर हाच संदेश भारताला द्यायला आलो आहे की, अमेरिकेचं भारताप्रती प्रेम आहे आणि राहिलंही, आम्हाला भारताप्रती खूपच आदर आहे आणि नेहमीच या देशाप्रती  आम्ही कृतज्ञ राहू.' 

Mon, 24 Feb 2020 01:53 PM IST

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात तुमचं स्वागत- मोदी

'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात तुमचं स्वागत आहे, असं म्हणत मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या परिवाराचं स्वागत केलं आहे.

Mon, 24 Feb 2020 01:28 PM IST

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचं मोटेरा स्टेडियममध्ये आगमन

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचं मोटेरा स्टेडियममध्ये आगमन झालं. 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 

Mon, 24 Feb 2020 12:54 PM IST

‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाला थोड्याच वेळात होणार सुरुवात

 थो़ड्याच वेळात ट्रम्प आणि मोदी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी होतील.

Mon, 24 Feb 2020 12:41 PM IST

डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत साबरमती आश्रमाच्या भेटीला

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्नीसोबत साबरमती आश्रमाला भेट दिली

Mon, 24 Feb 2020 12:07 PM IST

राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांचे अहमदाबाद विमानतळावर जंगी स्वागत  

राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांचे अहमदाबाद विमानतळावर जंगी स्वागत  

Mon, 24 Feb 2020 11:46 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन झाले आहे.  

Mon, 24 Feb 2020 11:37 AM IST

अतिथि देवो भव:- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदी ट्विटला 'अतिथि देवो भव:' असं लिहित मोदींनी उत्तर दिलं आहे.

Mon, 24 Feb 2020 10:41 AM IST

कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे- ट्रम्प

 थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हिंदीत ट्विट करत भारतभेटीसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

Mon, 24 Feb 2020 10:27 AM IST

पंतप्रधान मोदींचं अहमदाबादमध्ये आगमन

पंतप्रधान मोदींचं अहमदाबादमध्ये आगमन झालं आहे. 

Mon, 24 Feb 2020 09:27 AM IST

मोदी थोड्याच वेळात होणार अहमदाबादमध्ये दाखल

 पंतप्रधान  नरेंद्र मोदी  अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते अहमदाबादमध्ये पोहोचतील.

Mon, 24 Feb 2020 09:03 AM IST

भारताला तुमच्या आगमनाची प्रतीक्षा- मोदी

डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात भारतात येणार आहे. तुमच्या आगमनाची भारताला प्रतीक्षा आहे असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

Mon, 24 Feb 2020 08:34 AM IST

साबरमती आश्रमात सुरक्षा व्यवस्था कडक

 ट्रम्प दाम्पत्य १२.१५ वाजता साबरमती गांधी आश्रमाला भेट देण्याची शक्यता असल्याने येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे

Mon, 24 Feb 2020 08:00 AM IST

मोटेरा स्टेडियम स्वागतासाठी सजलं

 मोटेरा स्टेडियम डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. दुपारी येथे  'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे.

Mon, 24 Feb 2020 07:32 AM IST

मोटेरा स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोटेरा स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:डायना बेंचजवळ उभे राहून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन