पुढील बातमी

पुढच्या वर्षी लवकर या! राज्यभरात बाप्पांना भक्तीभावात निरोप

पुढच्या वर्षी लवकर या! राज्यभरात बाप्पांना भक्तीभावात निरोप

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! असे म्हणत राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.  मुंबई, पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात भक्तीभावाने बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी चौपाट्या, तलाव, नदी घाट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पुण्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाचही गणपतींचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. शहरातील काही मंडळांच्या मिरवणुका रात्रभर सुरु होत्या. शुक्रवारी सकाळी मंडईचा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. 

पुढच्या वर्षी लवकरच येणार बाप्पा!    

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू चौपाटीवरही अनेक मोठमोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन पार  पडलं आहे. मुंबईत काही मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या रात्रभराच्या जल्लोषानंतर सकाळपर्यंत चौपाटीवर विसर्जन सुरु होते. विसर्जन मिरवणुकीत भाविक लाखोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. मुंबईच्या लाडक्या लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. २२ तासाच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. राजाच्या विसर्जनावेळी मुकेश अंबांनी यांचे चिरंजीव अनंत अंबानी हे देखील उपस्थित होते.   

Fri, 13 Sep 2019 08:33 AM IST

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन

गिरगाव चौपाटीवर मुंबईकराच्या लाडक्या लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. २२ तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप देण्यात आला. 

Fri, 13 Sep 2019 08:31 AM IST

दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. 

Fri, 13 Sep 2019 08:29 AM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे कृत्रिम तलावात विसर्जन

काल मध्यरात्री मंडपातून निघालेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे डेक्कन येथील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

Fri, 13 Sep 2019 08:27 AM IST

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या! लालबागच्या राजाचे विसर्जन!

खास तराफ्यातून लालबागच्या राजाचे समुद्रात विसर्जन!

Fri, 13 Sep 2019 07:59 AM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी डेक्कन नदीपात्रात पोहचला

थोड्याच वेळात विसर्जन होणार

Fri, 13 Sep 2019 07:10 AM IST

मंडई गणपतीचे डेक्कन नदीपात्रात विसर्जन

भाऊ रंगारीच्या पाठोपाठ असलेल्या मंडई गणपतीचे डेक्कन नदीपात्रात विसर्जन करण्यात आले आहे. 

Fri, 13 Sep 2019 06:55 AM IST

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकात

मंडई गणपती विसर्जनासाठी डेक्कन नदीपात्राकडे रवाना झाला असून अलका चौकात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती सुरु आहे.

Fri, 13 Sep 2019 06:35 AM IST

लालबागच्या राजाला थो़ड्याच वेळात निरोप देण्यात येणार

तब्बल २० तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. आरती नंतर थोड्याच वेळात विसर्जन होणार

Fri, 13 Sep 2019 05:53 AM IST

भाऊ रंगारी सार्वजनिक मंडळाची मिरवणूक टिळक चौकापासून पुढे निघून गेली

मंडई आणि श्रीमंत दगडूशेठ मंडळाचा गणपती भाऊ रंगारी मंडळाच्या पाठोपाठ येत आहेत. 

Fri, 13 Sep 2019 04:10 AM IST

अखिल मंडई सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक बेलगाम चौकातून पुढे सरकली

Fri, 13 Sep 2019 04:01 AM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात

Fri, 13 Sep 2019 12:01 AM IST

पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका विक्रमी वेळ नोंदवण्याच्या दिशेने

जिलब्या मारूती आणि बाबू गेनू या मंडळात खूप अंतर पडले आहे. दगडू शेठ हलवाई गणपती अद्याप मंडपाजवळच असून यंदाच्या वर्षी पुण्याच्या मिरवणुका या विक्रमी वेळ नोंदवण्याची चिन्हे दिसत आहेत. लोक मोठ्या संख्येने मिरवणूक पाहण्यासाठी जमल्याने बाबू गेनू चौकात तुफान गर्दी झाली आहे. पोलिस फारसे सक्रीय दिसत नसल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणेही कठीण होऊन बसले आहे.

Thu, 12 Sep 2019 11:38 PM IST

बाबू गेनू आणि जिलब्या मारुती मंडळाची मिरवणूक लक्ष्मी रोड परिसरातून हळूहळू पुढे सरकत आहे.

Thu, 12 Sep 2019 11:27 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब गिरगाव चौपाटीवर उपस्थिती लावली

Thu, 12 Sep 2019 11:06 PM IST

विसर्जनावेळी राज्यभरात आतापर्यंत ९ जण बुडाल्याचे वृत्त

राज्यभर गणेश विसर्जनाच्या वेळी वेगवेगळ्या  ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ९ जण बुडाले असून नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

Thu, 12 Sep 2019 10:43 PM IST

अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीतही उत्साहाचे वातावरण

Thu, 12 Sep 2019 10:25 PM IST

पुण्यातील माती गणपती आणि गरुड गणपती

Thu, 12 Sep 2019 08:38 PM IST

महाराष्ट्रात विसर्जन करताना एकजण बुडला, तर पाचजण बेपत्ता

महाराष्ट्राच्या विविध भागात गणेश विसर्जनादरम्यान एक जण बुडाला तर पाचजण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावती, भंडारा, साताऱ्यात विसर्जनादरम्यान एकूण पाचजण  बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

Thu, 12 Sep 2019 08:16 PM IST

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील काही क्षणचित्रे

 पारंपरिक पद्धतीनं ढोल- ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीस सुरू आहेत

Thu, 12 Sep 2019 08:08 PM IST गणपती विसर्जन

मुंबईत सायंकाळपर्यंत ९ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन

मुंबईतच्या प्रमुख चौपाट्यांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत  ९ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्यात ३८३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळांच्या मूर्तींचा समावेश होता. 

Thu, 12 Sep 2019 07:50 PM IST

पुण्यातील अखिल मार्केट यार्ड मंडळाच्या गणेशाची मिरवणूक

 

Thu, 12 Sep 2019 07:28 PM IST

पुण्यात अनेक मंडळांकडून डिजेचा सर्रास वापर

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजात डिजे वाजवण्यास परवानगी नसतानाही अनेक मंडळांकडून डिजेचा सर्रास वापर केला गेला. 

Thu, 12 Sep 2019 06:55 PM IST मुंबईचा राजा

'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर

मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर 

Thu, 12 Sep 2019 06:32 PM IST गुरुजी तालिम

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. विसर्जनाच्या दिवशी पुण्यात पावसानंही उपस्थिती लावली. 

Thu, 12 Sep 2019 05:59 PM IST

पुणे मानाच्या तीन गणपतींचं विसर्जन

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गपपती,  दुसरा तांबडी जोगेश्वरी आणि  मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन पार पडले. 

Thu, 12 Sep 2019 05:13 PM IST

लालबाग परिसरात गणेशभक्तांची गर्दी

 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जात आहे. बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. 

Thu, 12 Sep 2019 04:39 PM IST

लालबागच्या राजाची मिरवणूक श्रॉफ बिल्डिंगजवळ

लालबागच्या राजाची मिरवणूक श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचली आहे. राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. 

Thu, 12 Sep 2019 04:13 PM IST

विसर्जन मिरवणुकीत कलाकारांचा सहभाग

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील ढोल- ताशा पथकात मराठी कलाकारांनीही आवर्जुन सहभाग घेतला आहे.

Thu, 12 Sep 2019 04:06 PM IST

मोठ्या मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीवर येण्यास सुरूवात

गिरगाव चौपाटीवर मोठ मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी यायला सुरूवात झाली आहे.

Thu, 12 Sep 2019 03:40 PM IST

गणपती विसर्जनसाठी गिरगाव चौपाटीवर गर्दी

गणपती विसर्जन करण्यासाठी घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गिरगाव चौपाटीवर गर्दी केली आहे. 

Thu, 12 Sep 2019 01:44 PM IST

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

लालबाग, परळ परिसरामध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.  

Thu, 12 Sep 2019 12:32 PM IST

केसरी वाडा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

पुण्याचा मानाचा पाचवा गणपती अर्थात केसरी वाडा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. आकर्षक रथातून गणपतीची मिरवणूक काढण्यात आली आहे.

Thu, 12 Sep 2019 12:11 PM IST

तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. २२ फूट उंचीच्या फुलांनी सजविलेल्या मयुरासनावरुन बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे.

Thu, 12 Sep 2019 12:06 PM IST

गुरुजी तालीम गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आकर्षक सजावट केलेल्या रथातून बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.

Thu, 12 Sep 2019 11:22 AM IST

तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. 

Thu, 12 Sep 2019 11:20 AM IST

कसबा पेठ गणपती मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाच्या कसबा पेठ गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक पध्दतीने गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली आहे. भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Thu, 12 Sep 2019 11:10 AM IST

तेजूकाया गणपती मिरवणुकीला सुरुवात

लालबागमधील तेजुकाया गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशाच्या गजरात गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तेजुकाया गणपती मिरवणूक

Thu, 12 Sep 2019 10:50 AM IST

गणेशगल्लीच्या राजावर भाविकांनी केली पुष्पवृष्टी

गणेशगल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला साडेआठ वाजता सुरुवात झाली. ढोल-ताशाच्य गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जात आहे. मिरवणुकी दरम्यान गणेशगल्लीचा राजावर भाविकांनी पुष्पवृष्टी केली.गणेशगल्लीचा राजा (फोटो सौजन्य: कुणाल पाटील/हिंदुस्थान टाइम्स)

 

 

Thu, 12 Sep 2019 10:01 AM IST

लालबागच्या राजाची आरती सुरु

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात होणार आहे. सध्या लालबागच्या राजाची आरती सुरु आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 

Thu, 12 Sep 2019 09:25 AM IST

बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि गणपती मिरवणूक पाहण्यासाठी लालबाग, परळ भागामध्ये गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. 

Thu, 12 Sep 2019 09:08 AM IST

गणेशगल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात

गणेशगल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळण करत ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त नाचत आहेत. गणेशगल्लीचा राजा

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:पुढच्या वर्षी लवकर या! राज्यभरात बाप्पांना भक्तीभावात निरोप