पुढील बातमी

दहीहंडी : रायगडमध्ये एकाचा मृत्यू तर मुंबईत ५० हून अधिक गोविंदा जखमी

दहीहंडी : रायगडमध्ये एकाचा मृत्यू तर मुंबईत ५० हून अधिक गोविंदा जखमी

राज्यासह देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आणि दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मध्यरात्री देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्रावर आलेल्या पूर संकटाचे सावट दहीहंडी उत्सवावर पाहायला मिळाले. यावर्षी सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी मुंबईसह उपनगरामध्ये दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या महापूरामुळे काही आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याच निर्णय घेतला. दहीहंडीची रक्कम त्यांनी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत जरी दहीहंडीचा उत्साह कमी पहायला मिळत असला तरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करताना वेगवेगळ्या ठिकाणी गोविंदा पथकातील एकूण ५१ गोविंदा दहीहंडी फोडताना जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील जवळपास २४ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. काही गोविंदांना गंभीर दुखापत झालेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  रायगडमधील म्हसाळा तालुक्यातील खसराई गावात पाचव्या थरावरुन कोसळून २५ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 
मुंबईत विविध ठिकाणी दही हंडी फोडताना जखमी झाल्यानंतर गोविंदाना पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जेटलींच्या निधनाच्या वृत्तानंतर ठाण्यातील शिवसेना आमदार प्रतापराव नाईक यांच्याकडून वर्तकनगरमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रो दहीहंडी स्पर्धा रद्द स्पर्धा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

Sat, 24 Aug 2019 07:23 PM IST

दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरुन कोसळून गोविंदाचा मृत्यू

रायगड जिल्हातील म्हसाळा तालुक्यातील खसराई गावात  दहीहंडीदरम्यान पाचव्या थरावरुन कोसळून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू 

Sat, 24 Aug 2019 07:08 PM IST

ठाण्यातील प्रो दहीहंडी स्पर्धा रद्द

जेटलींच्या निधनामुळे ठाण्यातील शिवसेना आमदार प्रतापराव नाईक यांच्याकडून वर्तकनगरमध्ये आयोजित करण्यात येणारी दहीहंडी स्पर्धा रद्द स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Sat, 24 Aug 2019 03:37 PM IST

जय जवान गोविंदा पथकाने ९ थरांची दिली सलामी

ठाण्याच्या पाचपखाडी येथील भगवती मैदानात मनसेने दहीहंडीचे आजोयन केले आहे. याठिकाणी जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी दिली. 

Sat, 24 Aug 2019 03:21 PM IST

दादरमध्ये दहिहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी

दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडली जात आहे.

दादर दहिहंडी (फोटो सौजन्य: अन्शुमान पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स) 

 
Sat, 24 Aug 2019 01:12 PM IST

डोंबिवलीत ईव्हीएमविरोधात दहीहंडी

मनसेने डोंबिवलीतील चार रस्ता येथे 'ईव्हीएमवर बंदी मतपत्रिकांचा वापर करा' अशी दहीहंडी उभारली आहे.डोंबिवली दहीहंडी (फोटो सौजन्य: रिषिकेश चौधरी/ हिंदुस्थान टाइम्स)

Sat, 24 Aug 2019 12:10 PM IST

पनवेलमध्ये पारंपारिक पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा

नवी मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. पनवेल येथे पारंपारिक पध्दतीने दहीहंडी उत्सव सापनवेल दहीहंडी (फोटो सौजन्य: बच्चन कुमार/ हिंदुस्थान टाइम्स)जरा करण्यात आला. 

Sat, 24 Aug 2019 11:37 AM IST

दादरमध्ये महिला गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. दादर येथे आजोजित केलेली दहीहंडी महिला गोविंदा पथकाने पाच थर लावत फोडली. 

Sat, 24 Aug 2019 11:27 AM IST

ओडिशातील इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमीचा उत्साह

ओडिशा येथील इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमीचा उत्साह पहायला मिळाला. भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी करत जन्माष्टमी साजरी केली.  

Sat, 24 Aug 2019 11:24 AM IST

योगी आदित्यनाथ यांनी जन्माष्टमी साजरी केली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात जन्माष्टमी साजरी केली.

Sat, 24 Aug 2019 11:22 AM IST

मुंबईत देखील जन्माष्टमी उत्साहात साजरी

मुंबईतील गोरेगावमधील इस्कॉन मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Sat, 24 Aug 2019 11:20 AM IST

पॅरिसमधील इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमी साजरी

देशातच नाही तर परदेशामध्ये देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पहायला मिळत आहे. पॅरिसमधील इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी गर्दी केली. 

Sat, 24 Aug 2019 11:17 AM IST

मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराला भाविकांची गर्दी

देशातील विविध श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण 'जन्मभूमी' असलेल्या मथुरेतील मंदिराला आरती करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या मोठी गर्दी केली.

 

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:दहीहंडी : रायगडमध्ये एकाचा मृत्यू तर मुंबईत ५० हून अधिक गोविंदा जखमी