पुढील बातमी

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत १२५-१०५ अशा फरकाने मंजूर झाले आहे. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले. राज्यसभेत मोदी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण कसोटी जिंकली. शिवसेनेच्या खासदारांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला मात्र मतदानाच्या वेळी त्यांनी सभात्याग करत विधेयकाला विरोध केला. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला काँग्रेसचा आधीपासून विरोधच आहे. लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. तसंच जनता दलने देखील लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र आता या पक्षात नारीजाचा सूर असल्यामुळे जनता दल देखील या विधेयकाला राज्यसभेत विरोध करेल अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे राज्यसभेत विधेयक मांडतांना तीव्र आक्षेप, गोंधळ होण्याची शक्यता आहे. 

Wed, 11 Dec 2019 08:20 PM IST

शिवसेनेचा सभात्याग

मकतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांकडून सभात्याग

Wed, 11 Dec 2019 07:01 PM IST

सभागृहात गदारोळ

अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्या लोकसभेतील दाखला दिल्यानंतर सभागृहात गदारोळ 

Wed, 11 Dec 2019 06:30 PM IST

अमित शहा राज्यसभेत संबोधन करत आहेत

Wed, 11 Dec 2019 03:27 PM IST

निर्वासितांना नागरिकत्व दिल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क देण्यात येणार का? - राऊत

अन्य देशातील निर्वासितांना नागरिकत्व दिल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क देण्यात येणार का? असा सवाल संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानातील आपल्या अल्पसंख्यंक समाजाच्या अधिकाराचे हनन होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत वक्तव्य केले आहे. 

Wed, 11 Dec 2019 03:20 PM IST

हिंदुत्वाच्या अजेंडाला पुढे नेण्यासाठी हा कायदा आणत आहे - चिदंबरम

सरकार हिंदुत्वाच्या अजेंडाला पुढे नेण्यासाठी हा कायदा आणत असल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केला आहे. 

Wed, 11 Dec 2019 03:18 PM IST

विधेयकाला पी चिदंबरम यांनी केला विरोध

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पी चिदंबरम यांनी विरोध केला आहे. देशात पूर्वीपासून नागरिकत्व कायदा आहे. सरकार संसदेकडून एक घटनाबाह्य कायदा पारित करत आहे अशी टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची केली आहे. 

Wed, 11 Dec 2019 03:16 PM IST

टीआरएसने राज्यसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला केला विरोध

टीआरएसने राज्यसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे खासदार केशव परान यांनी सांगितले की, हे विधेयक भारताच्या विचारांना आव्हान देणारे आहे. या विधेयकाला मागे घेतले पाहिजे.

 

Wed, 11 Dec 2019 02:22 PM IST

विधेयकाला जनता दलाने दिला पाठिंबा

जनता दलाने राज्यसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. जनता दलाचे खासदार रामचंद्र प्रसाद यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. 

Wed, 11 Dec 2019 01:54 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक घटनाबाह्य आहे - टीएमसी खासदार

नागरिकत्व सुधारणा विधेयक घटनाबाह्य आहे. या विधेयकाविरोधात निदर्शने होणार असल्याचे मत टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी व्यक्त केले आहे. 

Wed, 11 Dec 2019 01:26 PM IST

विधेयकामुळे अत्याचार झालेल्या लोकांना अधिकार मिळेल - जेपी नड्डा

भाजपचे खासदार जेपी नड्डा यांनी सांगितले की, शेजारच्या देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. या विधेयकामुळे अत्याचार झालेल्या लोकांना आपला अधिकार मिळेल. या विधेयकाचे सूत्रधार अमित शहा आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. 

Wed, 11 Dec 2019 01:21 PM IST

पाकिस्तानतून आलेल्या लोकांना सन्मान मिळाला पाहिजे - आनंद शर्मा

पाकिस्तानवरुन आलेल्या लोकांना सन्मान मिळाला पाहिजे, असे आनंद शर्मा यांनी सांगितेल. नविन इतिहास लिहण्याचा प्रयत्न करु नका. पाकिस्तानातून भारतात आलेले दोन जण भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. एनआरसीमुळे देशात असुरक्षिततेचे वातावरण आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. 

Wed, 11 Dec 2019 01:17 PM IST

नागरिकत्वाचा अधिकार धर्माने होत नाही - आनंद शर्मा

नागरिकत्वाचा अर्थ भूगोलवरुन नाही तर जन्माने होतो. ऐवढेच नाही तर नागरिकत्वाचा अधिकार धर्माने होत नाही. 

Wed, 11 Dec 2019 12:56 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे भारतीय संविधानावर हल्ला आहे - आनंद शर्मा

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे भारतीय संविधानावर हल्ला आहे, असा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. हे विधेयक राज्यघटनेच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे.

Wed, 11 Dec 2019 12:54 PM IST

ईशान्य भारतातील भाषिक, सामाजिक संरक्षणासाठी मोदी सरकार कटिबद्ध - शहा

ईशान्य भारतातील भाषिक, सामाजिक आणि राजनैतिक संरक्षणासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.  

Wed, 11 Dec 2019 12:38 PM IST

विधेयकाचा फायदा हिंदू, जैन, शीख समुदायाला होणार - शहा

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा फायदा हिंदू, जैन, शीख आणि बौध्द समुदायला होणार आहे.  

 

Wed, 11 Dec 2019 12:32 PM IST

विधेयक मुस्लिम विरोधी नाही - अमित शहा

नागरिकत्व सुधारणा विधेयक मुस्लिम विरोधी नाही. या विधेयकामुळे कोणी भिती घालत असेल तर सावध व्हा, असे अमित शहा यांनी सांगितले. अल्पसंख्यांकांना पूर्ण संरक्षण मिळेल, असे देखील त्यांनी सांगितले. 

 

 

Wed, 11 Dec 2019 12:27 PM IST

विधेयकामुळे सन्मानाचे जीवन मिळेल - शहा

या विधेयकामुळे सन्मानाचे जीवन मिळेल. हे सरकार 'सबका साथ, सबका विकास' यावर चालणारे सरकार आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. 

Wed, 11 Dec 2019 12:26 PM IST

परदेशातून आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व का द्यायचे - शहा

भारतीय मुस्लिम देशाचे नागरिक आहे आणि राहतील. परदेशातून आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व का द्यायचे असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. 
 

Wed, 11 Dec 2019 12:24 PM IST

अल्पसंख्याकांनी कुणालाही घाबरु नये - अमित शहा

अल्पसंख्याकांनी कुणालाही घाबरु नये. या विधेयकाच्या प्रत्येक प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. त्यामुळे कुणीही उठून जाऊ नये असे, अमित शहा यांनी सांगितले. 


 

Wed, 11 Dec 2019 12:16 PM IST

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर

राज्यसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केले आहे.

 

 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर