पुढील बातमी

Chandrayaan-2 : चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेनं झेपावलं

Chandrayaan-2 : चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेनं झेपावलं

जगभरासह सर्वच भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते 'चांद्रयान-२' सोमवारी अखेर अंतराळात झेपावलं. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 'चांद्रायन २' हे २३ दिवस पृथ्वीच्या कक्षेत असणार आहे. त्यानंतर २० ऑगस्टच्या दरम्यान चांद्रायान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.     

यापूर्वी इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. १५ जुलै रोजी क्रायोजेनिक इंजिनमध्ये लिकेज असल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही वेळ आधी ते स्थगित करण्यात आले होते. 

Mon, 22 Jul 2019 03:33 PM IST

हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mon, 22 Jul 2019 03:31 PM IST

राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडूंकडून इस्त्रोचे अभिनंदन

Mon, 22 Jul 2019 03:04 PM IST

११० इगनिट आणि एस २०० रॉकेट मुख्य रॉकेटपासून वेगळे

Mon, 22 Jul 2019 02:46 PM IST

चांद्रायन चंद्राच्या दिशेने झेपावलं

Mon, 22 Jul 2019 01:53 PM IST

लिक्विड हायड्रोजेनिक भरण्याचं काम संपलं

क्रायोनेजिक इंजिनमध्ये लिक्विड हायड्रोजेनिक भरण्याचं काम संपलं. 

 

Mon, 22 Jul 2019 12:57 PM IST

लिक्विड हायड्रोयजन भरण्याचे काम सुरु

चांद्रयान-२ मध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्याचे काम संपले. लिक्विड हायड्रोजनचे काम सुरु. 

Mon, 22 Jul 2019 12:39 PM IST

मोहिमेसाठी ९७८ कोटींची गुंतवणूक

या मोहिमेसाठी ९७८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-२ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याआधी ११ वर्षांपूर्वी इस्रोने आपले पहिले चांद्रयान-१ हे यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते. 

Mon, 22 Jul 2019 12:32 PM IST

लिक्विड ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु

चांद्रयान-२ च्या लाँचिंगला अवघ्या अडीच तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. इस्रोने चांद्रयान-२ मध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु असल्याचे टि्वट केले आहे.

Mon, 22 Jul 2019 12:26 PM IST

सर्व तयारी पूर्णः के सिवन

या मोहिमेच्या पूर्वसंध्येला इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी सर्व तयारी झाली असून जो समस्या होती, ती ही दुरुस्त केल्याचे ते म्हणाले.

Mon, 22 Jul 2019 12:23 PM IST

चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरु

इस्रोची चांद्रयान-२ या महत्वकांक्षी मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी २० तासांची उलट गणती रविवारी सांयकाळी सुरु झाली. इस्रोने टि्वट करत १८.४३ वाजता उलट गणती सुरु झाल्याचे सांगितले. सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्व उपकरणांचीही चाचणी झाल्याचे सांगण्यात आले.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chandrayaan-2 : चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेनं झेपावलं