पुढील बातमी

IND vs BAN: भारताचा विक्रम दूषित, बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

IND vs BAN: भारताचा विक्रम दूषित, बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

India vs Bangladesh, 1st T20I at Delhi Arun Jaitley Stadium: मुशफिकर रहिमच्या दमदार अर्धशकाच्या जोरावर बांगलादेशने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विजयी सलामी दिली. भारताने दिलेल्या १४९ धावांचा लक्ष्य बांगलादेशने अखेरच्या षटकात पार केले. तीन सामन्यांतील पहिला सामना ७ गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे. टी-२० च्या मैदानात बांगलादेशचा भारताविरुद्ध हा पहिला विजय आहे. आतापर्यंत झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या ८ सामन्यात भारताने विजय मिळवला होता. मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढत बांगलादेशने भारताला पराभूत केले आहे. 

INDvsBAN: रोहितनं धोनी-कोहलीचा विक्रम टाकला मागे

कर्णधार महमदुल्लाने षटकाराने बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला. रहिमने नाबाद ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा (९), लोकेश राहुल (१५), श्रेयस अय्यर (२२), शिखर धवन सर्वाधिक (४१), शिवम दुबे (१) आणि ऋषभ पंत (२७) धावा करुन माघारी फिरल्यानंतर क्रुणाल पांड्या ८ चेंडूत १५ आणि वाशिंग्टन सुंदरने ५ चेंडूत १४ धावांची नाबाद खेळी करत भारताच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ६ बाद १४८ धावा लावल्या होत्या.

Sun, 03 Nov 2019 11:47 PM IST

बांगलादेशने ७ गडी राखून सामना जिंकला

तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे.

Sun, 03 Nov 2019 10:11 PM IST

भारताला तिसरे यश, खलीलने सरकारला धाडले माघारी

खलील अहमदने मोक्याच्या क्षणी सौम्य सरकारला माघारी धाडले, त्याने ३५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३९ धावांचे योगदान दिले.

Sun, 03 Nov 2019 09:39 PM IST

चहलने भारताला मिळवून दिले दुसरे यश

चहलने सेट झालेल्या मोहम्मद नैमला शिखर धवनकरवी झेलबाद करत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. त्याने २८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या.

Sun, 03 Nov 2019 08:52 PM IST

भारताला पहिले यश, लिटन दास माघारी

दीपक चाहरने भारताला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर लिटन दास अवघ्या ७ धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देत माघारी फिरला आहे.

Sun, 03 Nov 2019 08:42 PM IST

निर्धारित २० षटकात भारत ६ बाद १४८ धावा

शिखर धवन ४१ (४२)
क्रुणाल पांड्या १५ (८)*
वाशिंग्टन सुंदर १४ (५)*

----------------------
अमिनुल इस्लाम २२/२
शैफुल इस्लाम ३६/२

Sun, 03 Nov 2019 08:33 PM IST

पंतच्या रुपात भारताला सहावा धक्का!

ऋषभ पंतने २६ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २७ धावांचे योगदान दिले.

Sun, 03 Nov 2019 08:20 PM IST

शिवम दुबेच्या रुपात भारताला पाचवा धक्का!

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या शिवम दुबेला अफिफने अवघ्या १ धावेवर माघारी धाडले.

Sun, 03 Nov 2019 08:10 PM IST

धवन धावबाद, भारताला चौथा धक्का!

शिखर धवनने ४२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४१ धावा केल्या. पंतसोबत ताळमेळ बिघडल्याने त्याला धावबाद होऊन परतावे लागले. 

Sun, 03 Nov 2019 07:53 PM IST

अय्यरच्या रुपात भारताला तिसरा धक्का!

श्रेयस अय्यरने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावांचे योगदान दिले.

Sun, 03 Nov 2019 07:37 PM IST

लोकेश राहुलही माघारी, भारताला दुसरा धक्का

लोकेश राहुलने संघाच्या धावसंख्येत १५ धावा जोडल्य. फिरकीपटू अमिनुल इस्लामने त्याला माघारी धाडले 

Sun, 03 Nov 2019 07:17 PM IST

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

रोहित शर्मा अवघ्या ९ धावांची भर घालून माघारी फिरला. त्याला शैफुल इस्लामने बाद केले.

Sun, 03 Nov 2019 06:48 PM IST

शिवम दुबेला संधी

Sun, 03 Nov 2019 06:46 PM IST

नाणेफेक जिंकून बांगलादेशने स्वीकरली गोलंदाजी

सलामीच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IND vs BAN: भारताचा विक्रम दूषित, बांगलादेशचा ऐतिहासिक विजय