पुढील बातमी

INDvsAUS: कांगारुंची जबराट सलामी, दहा जणांनी केलेल्या धावा दोघांनीच कुटल्या

INDvsAUS: कांगारुंची जबराट सलामी, दहा जणांनी केलेल्या धावा दोघांनीच कुटल्या

मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला १० गडी आणि ७४ चेंडू राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१२८) आणि कर्णधार फिंचने (११०) धावांच्या नाबाद खेळीने ऑस्ट्रेलिया संघाला एकहाती विजय मिळवून दिला. क्रिकेटच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियन संघाचा हा मोठा विजय आहे. २५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान असताना १० गडी राखून विजय मिळवण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलियन संघाने करुन दाखवली आहे. या जोडीसमोर भारतीय गोलंदाज हतबल दिसले. हा सामना संघर्षमय होईल, असे वाटले होते. मात्र वॉर्नर-फिंच यांच्या खेळीने एकहाती विजय मिळवत पुढील दोन सामने भारतीय संघासाठी आव्हानात्मक असल्याचे संकेत दिले आहेत.  

INDvsAUS: तुझं रक्त कधी उसळणार? पंत पुन्हा ट्रोल  

मिचेल स्टार्कचा भेदक मारा आणि पेट कंमिन्सनसह इतर गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला २५५ धावांत आटोपले. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने भारताच्या डावाला सुरुवात केली. भारताच्या धावफलकावर १३ धावा असताना मिचेल स्टार्कने सलामीवीर रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवत भारताला पहिला धक्का दिला. रोहित माघारी फिरल्यानंतर शिखर धवनने लोकेश राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला. या जोडीने शतकी भागीदारी केली. धावफलकावर १३४ धावा असताना लोकेश राहुलच्या रुपात कंमिन्सने भारताला दुसरा झटका दिला. लोकेश राहुलने ४७ धावा केल्या. त्यापाठोपाठ शिखर धवन ७४ धावांवर बाद झाला. 

INDvsAUS : सचिन-विराटला मागे टाकत रोहितची विश्वविक्रमाला गवसणी

ही जोडी परतल्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांनी निराश केले. स्टार्कने श्रेयस अय्यरला (४) तर कर्णधार विराट कोहली (१६) अ‍ॅडम झम्पाच्या जाळ्यात अडकला. रविंद्र जडेजा (२५) आणि ऋषभ पंत यांनी २८ धावा करुन माघारी फिरले. शार्दुल ठाकूरला १३ धावांवर क्लिन बोल्ड करत स्टार्कने भारताला आठवा धक्का दिला.  अखेरच्या षटकात फटकेबाजी करणाऱ्या कुलदीपला स्मिथने चोरटी धाव घेताना धावबाद केले. अखेरच्या षटकातील रिचर्डसनच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात शमी झेलबाद झाला कॅरीने त्याचा झेल टिपला. ४९.१ षटकात भारतीय संघ २५५ धावांपर्यंत मजल मारू शकला. 

Tue, 14 Jan 2020 08:32 PM IST

ऑस्ट्रेलियाचा एकहाती विजय!

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि फिंचच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Tue, 14 Jan 2020 08:31 PM IST

वॉर्नरचे शतक! ऑस्ट्रेलिया दोनशेपार...

कर्णधार फिंच आणि डेव्हीड वॉर्नर जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले आहे. वॉर्नरने चौकार खेचत आपले शतक पूर्ण केले. या दोघांनी द्विशतकी भागीदारीही पूर्ण केली.

Tue, 14 Jan 2020 06:47 PM IST

ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची दमदार सुरुवात

वार्नर-फिंच यांनी शतकी भागीदारीसह संघाला मजबूत सुरुवात करुन दिली आहे.

Tue, 14 Jan 2020 06:11 PM IST

ऋषभ पंत जायबंदी, लोकेश राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी

ऋषभ पंतला दुखापत झाल्याने मनिष पांडे क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला असून लोकेश राहुल यष्टीमागे क्षेत्ररक्षण करत आहे.

Tue, 14 Jan 2020 06:09 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात

वॉर्नर-फिंच जोडीने केली ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात

Tue, 14 Jan 2020 05:19 PM IST

भारतीय संघाचा ऑल आउट!

४९. १ षटकात भारताने २५५ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.

Tue, 14 Jan 2020 04:48 PM IST

भारताला सातवा धक्का, ऋषभ पंत माघारी

पेट कमिन्सनं एका अप्रतिम बाऊन्सरवर ऋषभ पंतला टर्नरकरवी झेलबाद केले. पंतने ३३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावा केल्या.

Tue, 14 Jan 2020 04:41 PM IST

रविंद्र जडेजाच्या रुपात भारताला सहावा धक्का!

रविंद्र जडेजाने ३२ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २५ धावा केल्या.

Tue, 14 Jan 2020 04:11 PM IST

श्रेयस अय्यरही माघारी, भारताचा अर्धा संघ तंबूत

मिचेल स्टार्कने ४ धावांवर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला कॅरीकरवी झेलबाद करत भारताला पाचवा धक्का दिला. स्टार्कचा सामन्यातील हे दुसरे यश आहे.

Tue, 14 Jan 2020 04:10 PM IST

विराट माघारी, भारताला चौथा धक्का!

अ‍ॅडम झम्पाने आपल्याच षटकात विराट कोहलीचा १६ धावांवर झेल टिपत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

Tue, 14 Jan 2020 03:48 PM IST

शिखर धवनच्या रुपात भारताला तिसरा धक्का!

पेट कमिन्सनं शिखर धवनला अँगरकरवी झेलबाद केलं. धवनने ९१ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली.

Tue, 14 Jan 2020 03:38 PM IST

भारताला दुसरा धक्का!

लोकेश राहुलला तंबूचा रस्ता दाखवत अँगरने ऑस्ट्रेलियाला मिळवून दिल दुसरे यश. राहुलने ६१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.

Tue, 14 Jan 2020 03:21 PM IST लोकेश राहुल आणि शिखर धवन

धनन-लोकेश राहुल यांच्यात शतकी भागीदारी

शिखर धवन आणि लोकेश राहुल या जोडीने रोहितच्या रुपात अवघ्या १३ धावांवर पहिला धक्का बसलेल्या भारतीय संघाचा डाव सावरला असून या जोडीने शतकी भागीदारी पूर्ण केली आहे.

Tue, 14 Jan 2020 03:06 PM IST

शिखर धवनचे अर्धशतक!

शिखर धनवनने ६६ चेंडूत एकदिवसीयमधील २८ वे शतक साजरे केले.  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मागील तीन सामन्यात धनवने अनुक्रमे १४३, १२, ११७ अशी कामगिरी नोंदवली होती.

Tue, 14 Jan 2020 02:30 PM IST

धनव-केएल राहुल जोडी स्थिरावण्याच्या दिशेने

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धवन आणि केएल राहुल यांच्यावर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी आहे. या जोडीने संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या आहेत.  

Tue, 14 Jan 2020 02:18 PM IST

मिचेल स्टार्कने भारतीय सलामीवीर रोहित शर्माला धाडले माघारी

रोहित शर्मा १५ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १० धावांची खेळी करुन माघारी फिरला आहे. स्टार्कने त्याला वॉर्नरकरवी झेलबाद केले. 

Tue, 14 Jan 2020 02:17 PM IST

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियन संघ : अ‍ॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅरी , टर्नर, अँगर, कमिन्स, स्टार्क, रिचर्डसन, झम्पा

Tue, 14 Jan 2020 02:10 PM IST

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील वानखेडेच्या मैदानावरील सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INDvsAUS: कांगारुंची जबराट सलामी, दहा जणांनी केलेल्या धावा दोघांनीच कुटल्या