मान्सून हा उन्हाळ्याच्या उकाड्यापासून दिलासा देणारा जरी असला तरी अनेक रोगराई ही याच ऋतूमध्ये पसरते. पावसाळ्यात झिकासारखे अनेक वेक्टर-जनित आजार (डासांमार्फत होणारे आजार) पसरायला सुरुवात होते. सतत पडणारा पाऊसामुळे परिणामी पाणी साचणे आणि त्यामधून डासांची पैदास होण्यास अनुकूल वातावरण ठरते. यामुळे झिका सारख्या विषाणूंचा प्रसार होतो. देशाच्या अनेक भागांमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आठळले आहेत. सरकारने नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. चला जाणून घेऊया झिका व्हायसरची लक्षणे आणि काळजी कशी घ्यावी...
झिका विषाणूने पीडित रूग्णांमध्ये डेंग्यू व चिकनगुनियासारखीच लक्षणे दिसून येतात. विषाणूमुळे गरोदर महिलांना झिकाची लागण झाली तर भीषण परिस्थिती निर्माण होते. जन्माला न आलेल्या बाळामध्ये मेंदूचे अपंगत्व येते किंवा कॉन्जेनिटल झिका सिंड्रोम होऊ शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लागण होऊ नये म्हणून फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील इंटर्नल मेडिसीनच्या संचालक आणि इन्फेक्शिअस डिसीज स्पेशालिस्ट डॉ. अनिता मॅथ्यू यांनी विशेष काळजी कशी घ्यावी हे सांगितले आहे.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
• सौम्य ते उच्च ताप
• कन्जंक्टीव्हायटस (डोळे येणे)
• त्वचेवर पुरळ/ अॅलर्जी
• डोकेदुखी
• स्नायूदुखी व सांधेदुखी
• मळमळ व उलट्या होणे
• कधी-कधी शरीराच्या वरील व खालील भागामध्ये अशक्तपणा जाणवणे
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
झिकाचे निदान झाल्यानंतर व्यक्तींनी घरामध्येच राहावे. शक्यतो आराम करावा आणि भरपूर पाणी प्यावे. गरोदर महिलांनी विशेषत: संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या आसपास जाणे टाळावे. या आजावर कोणतेही वेगळे उपचार घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वत: काळजी घेऊ शकता.
झिका विषाणूपासून संसर्ग होण्याला प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डास चावण्याचा धोका कमी करणे. हे डास सामान्यत: दिवसा चावतात, ज्यामुळे तुमची राहण्याची जागा नेहमी स्वच्छ असण्याची आणि कुठेही पाणी साचणार नाही याची खात्री घ्या.
वाचा: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
• विशेषत: बाहेर जात असताना फुल-स्लीव्ह कपडे परिधान करा, तसेच मुले बाहेर खेळायला जात असतील तर त्यांना देखील फुल-स्लीव्ह कपडे परिधान करा.
• डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात राहत असाल तर दरवाजे व खिडक्या बंद ठेवावेत.
• डास/ किटकांपासून संरक्षण करणाऱ्या प्रतिबंधकांचा वापर करा.
• फक्त उकळलेले / प्युरिफाईड (शुद्ध) पाणी प्या.
• घरामध्ये बनवलेले ताजे अन्न सेवन करा आणि बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा.
• तापावर उपचार करण्यासाठी अॅस्पिरिन गोळ्या घेणे टाळा आणि २ दिवसांहून अधिक लक्षणे राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• तुमचे घर आणि घरातील हवा खेळती ठेवा.
• विशेषत: बाहेरून आल्यानंतर हाताने नाक व तोंडाला स्पर्श करू नका.
• नेहमी मुलभूत स्वच्छता राखा आणि शक्य असल्यास वारंवार हात स्वच्छ धुवा.
• तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, ज्यामुळे व्हायरल संसर्गांचा धोका कमी होईल.
संबंधित बातम्या