Zika Virus : पुण्यात आढळले झिका व्हायरसचे रुग्ण, जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय-zika virus patients found in pune know the symptoms and preventions ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Zika Virus : पुण्यात आढळले झिका व्हायरसचे रुग्ण, जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय

Zika Virus : पुण्यात आढळले झिका व्हायरसचे रुग्ण, जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय

Jun 27, 2024 05:46 PM IST

Zika Virus symptoms and prevention tips : पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. झिका व्हायरस कसा होतो, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

झिका व्हायरसची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
झिका व्हायरसची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय (HT_PRINT)

Symptoms and Prevention of Zika Virus: महाराष्ट्रातील पुण्यात झिका व्हायरसच्या दोन रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एडिस डास चावल्याने झिका व्हायरस पसरतो. तसेच चिकनगुनिया, येलो फिव्हर आणि डेंग्यू सारखा हा आजार पसरतो. आम्ही तुम्हाला झिका व्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो हे सांगत आहोत. तसेच जाणून घ्या त्याची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय.

झिका व्हायरस काय आहे?

झिका व्हायरस हा एडीस एजिप्टी आणि एडीस अल्बोपिक्टस नावाच्या डासांच्या चाव्यांद्वारे पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. मुख्यत: संक्रमित एडिस प्रजातीच्या डास चावल्याने हा पसरतो. हे डास दिवसा आणि रात्री चावतात. झिका गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात जाऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान संसर्गामुळे काही जन्मदोष उद्भवू शकतात. झिकावर कोणतीही लस किंवा औषध नाही. हे डास डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या इतर आजारांचेही वाहक आहेत.

कसा पसरतो झिका व्हायरस

झिका व्हायरस प्रामुख्याने संक्रमित एडिस प्रजातीच्या डास चावल्याने लोकांमध्ये पसरतो. डेंग्यू आणि चिकनगुनियाचे विषाणू पसरवणारे हे तेच डास आहेत. हे डास सहसा साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. चिकनगुनिया, डेंग्यू आणि झिका पसरवणारे डास दिवसा आणि रात्री चावतात. सेक्स आणि रक्त संक्रमणाद्वारे सुद्धा हे पसरते. हे गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात देखील पसरू शकते.

झिका व्हायरसची लक्षणे

अनेक लोकांना झिका व्हायरसचा संसर्ग झाला तरीही त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तर काही लोकांना लक्षणे दिसली तरी ते सहसा सौम्य आणि काही दिवस किंवा आठवडे टिकतात. सामान्य लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, लाल डोळे आणि त्वचेवर पुरळ यांचा समावेश होतो. गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास, त्यांच्या बाळाला जन्मजात दोष होण्याचा धोका जास्त असतो, ज्यात मायक्रोसेफली (लहान डोके) यांचा समावेश होतो.

झिका व्हायरस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

- डासांच्या चावण्यापासून बचाव करणे हा झिका व्हायरस टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

- डासांच्या प्रजननाला प्रतिबंध करण्यासाठी घराभोवतीचे पाणी जमा होणे टाळा.

- डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण कपडे घाला आणि डास रेपेलेंट वापरा.

- गर्भवती महिलांनी डास-बाधित भागात जाणे टाळावे.

- सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी डिटेन्शनचा वापर करा आणि महिला आणि पुरुष दोघांनाही २-३ महिने लैंगिक प्रतिबंध करा.

- ताप, डोकेदुखी किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग