मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Zero Oil Cooking: झिरो ऑईल कुकिंगचा ट्रेंड होतोय व्हायरल, ट्राय करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Zero Oil Cooking: झिरो ऑईल कुकिंगचा ट्रेंड होतोय व्हायरल, ट्राय करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 01, 2024 10:55 PM IST

Zero Oil Cooking Tips: फिटनेसच्या बाबतीत जागरुक असलेले लोक आहाराची विशेष काळजी घेतात. सध्या झिरो आईल कुकिंगचा ट्रेंड व्हायरल होत आहे. हे घरी कसे करावे जाणून घ्या.

झिरो ऑईल कुकिंग व्हायरल ट्रेंड
झिरो ऑईल कुकिंग व्हायरल ट्रेंड

Zero Oil Cooking Viral Trend: आजकाल स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी फिटनेस फ्रिक लोक केवळ व्यायामावरच नाही तर आहारात समाविष्ट असलेल्या गोष्टी तयार करण्याच्या पद्धतीकडे देखील विशेष लक्ष देतात. फिटनेसच्या या वाढत्या क्रेझमुळे आजकाल लोकांमध्ये झिरो ऑईल कुकिंगचा ट्रेंड (zero oil cooking trend) वाढू लागला आहे. स्वयंपाक करताना तेलाचा जास्त वापर केल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत निरोगी हृदयासाठी जेवणातील तेलाचा वापर कमी करणे किंवा बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया झिरो ऑइल कुकिंग कसे केले जाते (how to do zero oil cooking)

वरण किंवा भाजी बनवताना त्यात टाकलेले हळद, कांदा किंवा लसूण यांसारखे मसाले भाजण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. असे केले नाही किंवा मसाले वरून घातल्यास जेवणाची चव खराब होऊ शकते. दिवसाला तीन चमचे म्हणजेच १५ ग्रॅम तेल वापरल्याने शरीर निरोगी राहते. परंतु शरीरातील अतिरिक्त तेलामुळे कोलेस्टेरॉल, कर्करोग, फॅटी लिव्हर, मधुमेह आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

झिरो ऑईल कुकिंगसाठी फॉलो करा या स्टेप्स (Steps of Zero oil cooking)

ऑईल फ्री कुकिंग करण्यासाठी प्रथम नॉन-स्टिक पॅन मंद आचेवर ठेवा आणि हलके गरम करा. यानंतर पॅनमध्ये जिरे टाका आणि थोडा वेळ परतून घ्या. यानंतर पॅनमध्ये कांदा घाला. जिरे कांद्याला चिकटतील. आता जिरेआणि कांदा दोन्ही एकत्र भाजून घ्या. कांद्याचे पाणी पूर्णपणे सुकल्यावर पॅनमध्ये अर्धी वाटी पाणी घालून कांदा शिजवून घ्या. पाणी सुकल्यावर पॅनमध्ये हळद, लाल तिखट, मीठ, आले आणि कोथिंबीर घालून कांदा परतून घ्या. मसाले भाजताना पॅनमध्ये गरजेनुसार दोन ते तीन चमचे पाणी देखील वापरू शकता. यानंतर पॅनमध्ये टोमॅटो घाला. हे मसाल्यामध्ये चांगले मिसळा आणि शिजवा.

टोमॅटोचे पाणी पूर्णपणे कोरडे होईपर्यंत मसाले झाकून ठेवा. आता या मसाल्यात भाज्या घाला आणि झाकून शिजवा. अशा प्रकारे झिरो ऑईल कुकिंग करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग