Winter Care Tips: सध्या हवामानात बदल होत आहेत. हवामान बदलले की शरीराला सर्दी खोकल्याचा धोका निर्माण होतो. लहान मुले आणि वृद्ध लोकांना सर्दीचा सर्वात आधी त्रास होतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीत नाक, घसा आणि छातीत कफ झाल्यामुळे आठवडाभर त्रास होतो. अनेक लोक ते बरे करण्यासाठी औषधे घेतात. पण आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची सर्दी काही दिवसात बरी करू शकता. कसं ते जाणून घेऊयात.
> पहिला मार्ग आणि सोप्पा मार्ग म्हणजे वाफ घेणे. नाक आणि छातीत रक्तसंचय होत असेल तर वाफ घ्या. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. वाफ घेतल्याने श्वसनमार्गात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात.
> तुळशीचा काढाही उत्तम पर्याय आहे. याचे सेवन केल्याने सर्दीपासून आराम मिळतो. जर तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात याने केली तर तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळेल.
> हळदीचे दूधही उत्तम काम करेल. त्यात आले आणि हळद घालून तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे थंडीपासून लगेच आराम मिळतो. तुम्ही काळी मिरी चहा देखील घेऊ शकता.
> तुम्ही आले आणि मध घालून चहा देखील पिऊ शकता. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात, जे एका दिवसात सर्दी आणि खोकला बरे करण्यास मदत करतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचेही सेवन करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)