World Diabetes Day 2023: यंदा जागतिक मधुमेह दिनासाठी थीम आहे 'अॅक्सेस टू डायबेटिस केअर', जिचा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून मधुमेहाबाबत, तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैयक्तिक व सहयोगाने करावयाच्या कृतींबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचा मनसुबा आहे. या थीममध्ये वाढ करण्याशी आणि मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाबाबत जागरूकतेचा अधिक प्रसार करण्याशी संलग्न राहत इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमधील अग्रणी कंपनीने केलेल्या आरोग्यसेवा तपासण्यांच्या आधारावर रक्तातील शर्करेच्या पातळ्यांशी संबंधित ट्रेण्ड्सचे निरीक्षण केले आहे.
संशोधनाने एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ पर्यंत केलेल्या आरोग्य तपासण्यांचे निरीक्षण केले. यामधून निदर्शनास येते की, ४० वर्षांखालील २६ टक्के व्यक्तींमधील रक्तातील शर्करेच्या पातळ्या बोर्डरलाइनवर किंवा प्रीडायबेटिक रेंजवर आहेत, जेथे पातळ्या १०० ते १२५ mg/d दरम्यान असल्याचे दिसून आले आहे.
या आरोग्य तपासणी डेटाबाबत मत व्यक्त करत इंडस हेल्थ प्लस येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट श्री. अमोल नाईकवडी म्हणाले, ''भारत मधुमेहासाठी जागतिक केंद्र मानले जाते आणि मधुमेहाचा सामना करण्यासाठी इंडस हेल्थ प्लस जागरूकता उपक्रम राबवण्यामध्ये नेहमी अग्रस्थानी आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून आजाराचे लवकर निदान व योग्य उपचाराबाबत माहिती दिली जाते. बैठेकाम करण्याच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढतो, जी जीवनशैली स्थिती आहे. मधुमेहाने पीडित व्यक्ती आरोग्यदायी जीवनशैली, आहार व्यवस्थापन व जीवनशैलीमध्ये बदल अशा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करत या आजारावर नियंत्रण ठेवू शकतात. मधुमेह होण्याचा उच्च धोका असलेल्या, तसेच लठ्ठ, कौटुंबिक हिस्ट्री असलेल्या किंवा बैठेकाम करण्याची जीवनशैली असलेल्या व्यक्तींनी रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर नियमितपणे देखरेख ठेवण्याच्या महत्त्वाबाबत समुपदेशन घेतले पाहिजे. जीवनशैली ट्रिगर्समुळे स्थिती बिकट होणे टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच, मधुमेहाचा उच्च धोका असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी अनुवांशिक चाचणी करणे आवश्यक आहे.''
नमुना आकार: २५,०००
• अॅब्नॉर्मल एचबीए१सी (HbA1c) पातळ्या ६० वर्ष व त्यावरील वयोगटातील व्यक्तींमध्ये (८५ टक्के) सर्वाधिक होत्या, तुलनेत ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील २० टक्के व्यक्ती होते.
• अॅब्नॉर्मल बीएमआय असलेल्या (जास्त वजन व लठ्ठ) व्यक्तींपैकी ३५ टक्के व्यक्तींमध्ये उपाशी असताना रक्तातील शर्करेच्या पातळ्या अॅब्नॉर्मल दिसण्यात आल्या.
• रजोनिवृत्ती हा महिलांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर परिणाम करणारा आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढवणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून निदर्शनास आला.
चाचणीची सूची नॉर्मल बॉर्डर लाइन अॅब्नॉर्मल अर्जंट एकूण
ग्लुकोज (उपाशीपोटी) ४६ टक्के ३४ टक्के १९ टक्के १ टक्का १०० टक्के
बीएमआय ३६ टक्के ३२ टक्के १५ टक्के १८ टक्के १०० टक्के
एचबीए१सी (ऑल) ४६ टक्के ३० टक्के १७ टक्के ६ टक्के १०० टक्के
इंडस हेल्थ प्लस डेटानुसार, ४० वर्षांखालील २६ टक्के व्यक्तींमधील उपाशीपोटी रक्तातील शर्करेच्या पातळ्या बॉर्डर लाइनवर असल्याचे आढळून आले. यासाठी उच्च तणाव पातळ्या, अनारोग्यकारक आहार सवयी, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य झोपेच्या पद्धती कारणीभूत असू शकतात.