मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Guide: गुरुग्राममधील या ठिकाणी कपल्सला फिरायला आवडते, एकदा नक्की जा

Travel Guide: गुरुग्राममधील या ठिकाणी कपल्सला फिरायला आवडते, एकदा नक्की जा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 01, 2024 10:54 PM IST

Gurugram Best Places: तुम्ही पार्टनरसोबत फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर गुरुग्राममधील या ठिकाणांना अवश्य भेट द्या.

गुरुग्राममध्ये फिरण्यासाठी ठिकाणं
गुरुग्राममध्ये फिरण्यासाठी ठिकाणं

Places in Gurugram to Visit with Partner: तुम्ही सुद्धा या हिवाळ्यात दिल्ली एनसीआरला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर गुरुग्रामला जायला विसरु नका. हे ठिकाण फायनान्स आणि टेक्नॉलॉजीचे केंद्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. असे असूनही गुरुग्राम हे पर्यटन स्थळासाठीही एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर गुरुग्रामला जाण्याचे प्लॅन करु शकता. गुरुग्राममध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक्सप्लोर करू शकता. पाहा ही कोणती ठिकाणं आहेत

लेजर व्हॅली पार्क

जर तुम्ही गुरुग्राममधील कोणत्याही पार्कला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लेझर व्हॅली पार्कमध्ये जाऊ शकता. हे पार्क गुरुग्राम सेक्टर २९ मध्ये आहे. तुमच्या पार्टनरसोबत फिरण्यासाठी हे ठिकाण खूप चांगले आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत गुडगावमध्ये वेळ घालवायचा असेल तर या पार्कमध्ये जा.

दमदमा तलाव

गुरुग्रामपासून २४ किलोमीटर अंतरावर असलेले दमदमा तलाव हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जर तुम्ही शांत ठिकाण शोधत असाल तर दमदमा तलाव हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या तलावात देशी-विदेशी पक्ष्यांचे निवासस्थान आहे.

हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम

गुरुग्राममधील हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम हे भारतातील पहिले वाहतूक संग्रहालय आहे. हे संग्रहालय मानेसरजवळील तौरू येथे आहे. हे संग्रहालय मंगळवार ते रविवार खुले असते. येथे एकदा नक्की भेट द्या.

आइस स्केटिंगचा आनंद

तुम्हाला कोणत्याही अॅक्टिव्हिटीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही गुरुग्राममध्ये आइस स्केटिंगचा आनंद घेऊ शकता. हे गुरुग्राममधील अॅम्बियन्स मॉलमध्ये आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel