Roti Making Mistakes: बहुतांश लोकांना पोळी खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटत नाही. निरोगी राहण्यासाठी पोळीची विशेष भूमिका असते. पोट भरण्यासाठी भाज्या, डाळी खाल्ल्या तरी मनाला समाधान तेव्हाच मिळते जेव्हा भाज्यांसोबत पोळी असते. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ गव्हाऐवजी इतर धान्यांपासून बनवलेली पोळी किंवा भाकरी खाण्याचा सल्ला देतात. पोळी कोणत्याही धान्यापासून बनवलेली असो पण ती बनवताना या चुका कधीही करू नका. अशा प्रकारे पोळी किंवा रोटी बनवली तर त्यातील पोषक तत्वे कमी होतात आणि शरीराला पूर्ण लाभ मिळत नाही. जाणून घ्या पोळी बनवताना कोणत्या चुका करू नये.
पोळी कोणत्याही धान्याची असली तरी नॉन-स्टिक तव्याचा वापर हे बनवण्यासाठी करू नये. पोळी नेहमी लोखंडी तव्यावर बनवावी. यापेक्षाही जास्त फायदेशीर असतो मातीचा तवा. यावर बनवलेली पोळी रोटी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
जर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी पोळी खायची असेल तर नेहमी एकाच धान्यापासून पोळी बनवा आणि खा. अनेक धान्ये मिसळून कधीही पोळी बनवू नका. यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होते. पोळी ज्वारी, बाजरी, नाचणी, मका किंवा गव्हाच्या पिठापासून बनवून खावी.
गरम पोळी कधीही अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळू नये. असे केल्याने फॉइलचे बारीक कण पोळीला चिकटतात. आणि ते सहजपणे शरीरात प्रवेश करू शकतात. पोळी ठेवण्यासाठी आणि गुंडाळण्यासाठी नेहमी कापडाचा वापर करा.
जेव्हा तुम्हाला पोळी बनवायची असेल तेव्हा पीठ मळून घ्या आणि सुमारे ५-१० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे पीठ थोडेसे आंबते आणि त्यात गुड बॅक्टेरिया चांगले वाढतात. यानंतर तयार केलेली पोळी मऊ आणि फुगलेली तर बनतेच पण सोबतच ती आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)