New Year Resolution 2024: या ४ संकल्पांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, शरीर आणि मन राहील तंदुरुस्त-you must take these 4 new year resolutions in 2024 for your fit body and mind ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year Resolution 2024: या ४ संकल्पांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, शरीर आणि मन राहील तंदुरुस्त

New Year Resolution 2024: या ४ संकल्पांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, शरीर आणि मन राहील तंदुरुस्त

Dec 23, 2023 10:00 PM IST

New Year 2024 Resolution: नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक विविध संकल्प करतात. तुम्हालाही नवीन वर्षात तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवायचे असेल तर हे ४ संकल्प करा.

शरीर आणि मन फिट ठेवण्यासाठी नवीन वर्षाचे संकल्प
शरीर आणि मन फिट ठेवण्यासाठी नवीन वर्षाचे संकल्प (Freepik)

New Year Resolution For Fit Body and Mind: सरते वर्ष २०२३ ला निरोप द्यायला आणि २०२४ नवीन वर्षाचे स्वागत करायला अवघे काही दिवस उरले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक आतापासूनच प्लॅनिंग करू लागले आहेत. नवीन वर्ष हे बदलासाठी देखील ओळखले जाते. जर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर ही सर्वोत्तम वेळ असते. तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या तंदुरुस्तीसाठी तुम्ही काही संकल्प करू शकता.

योगा आणि ध्यानाचा सराव करा

योग हा एक असा सराव आहे ज्याचा उद्देश तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला फायदा देणे आहे. हे तुमचा ताण कमी करण्यास, लवचिकता सुधारण्यास, स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि बरेच चांगल्या गोष्टी करण्यास तुम्हाला मदत करते. तुमच्या डेली रुटीनमध्ये ध्यानाचा समावेश करून योगा अधिक फायदेशीर ठरू शकतो. नवीन वर्षात स्वत:ला वचन द्या की तुम्ही तुमच्या दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश कराल.

स्क्रीन टाइम कमी करणे

आपल्या डेली रुटीनमध्ये टेक्नॉलॉजी खूप उपयुक्त आहे. पण त्याचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे झोप कमी होते. स्क्रीन टाइम पूर्णपणे काढून टाकणे कठीण आहे. पण तुम्ही हा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. नवीन वर्षात तुमचा स्क्रीन टाइम मर्यादित करा.

आहार आणि व्यायाम सुधारा

नवीन वर्षात आपल्या फिटनेस प्रती जागरूक व्हा. दररोज जिममध्ये जाणे कठिण वाटत असेल तर छोटे छोटे फिटनेस गोल्स बनवून सुरुवात करा. हे तुम्ही घरी सहज करू शकता. जसे की स्ट्रेच करणे किंवा चालायला जाणे. यासोबतच तुमचा आहार पूर्णपणे बदलणे महागात पडू शकते. त्याऐवजी आठवडाभर आपल्या जेवणात अधिक भाज्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आहारात छोटे छोटे हेल्दी बदल करा. चांगले खाल्ल्याने मन आणि शरीर निरोगी राहते.

 

तुमची झोप सुधारा

झोप तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करते आणि त्याला प्राधान्य दिले पाहिजे. झोपे दरम्यान, तुमचे शरीर दिवसभराच्या कामातून बरे होते आणि तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी तयार करते. दररोज ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग