मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heart Attack Prevention: हार्ट अटॅक टाळण्यास मदत करतीय या २ टेस्ट, वेळीच करून घ्या

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक टाळण्यास मदत करतीय या २ टेस्ट, वेळीच करून घ्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 22, 2024 05:38 PM IST

Heart Attack Risk: जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर या दोन प्रकारच्या चाचण्या वेळीच करून घ्यावे, असे हार्ट एक्सपर्ट सांगतात. या टेस्ट केल्याने हृदयविकाराचा धोका टाळता येईल.

हार्ट अटॅक टाळण्यासाठी टेस्ट
हार्ट अटॅक टाळण्यासाठी टेस्ट (freepik)

Preventive Tests For Heart Attack: हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत अनेक लोक हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू सुद्धा होत आहे. अशा परिस्थितीत काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. जीवनशैली आणि आहारातील बदलांव्यतिरिक्त तुमचे हृदय किती चांगले आहे आणि ते कसे कार्य करत आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. या दोन्ही प्रकारच्या चाचण्या योग्य वेळी केल्या गेल्या तर हृदयाच्या आरोग्याचा काहीसा अंदाज बांधता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे योग्य प्रतिबंध आणि उपाय करून हृदयविकाराचा धोका काही प्रमाणात टाळता येतो. या दोन चाचण्या कोणत्याही वयात केल्या जाऊ शकतात. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्या ते जाणून घ्या.

सी टी अँजिओग्राफी टेस्ट

हृदयरोगतज्ज्ञ हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी सी टी अँजिओग्राफी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. इन्स्टाग्रामवर हृदयरोग तज्ञ बिमल चॅटर्जी यांनी या दोन चाचण्या कोणत्याही वयात करून घेण्याची शिफारस केली आहे. त्यापैकी एक सीटी अँजिओग्राफी टेस्ट आहे. या चाचणीच्या मदतीने रक्तवाहिन्यांमधील कोणतीही समस्या ओळखता येते. या टेस्टच्या मदतीने हृदयात किती ब्लॉकेज आले आहे हे शोधले जाऊ शकते. सीटी अँजिओग्रामच्या मदतीने रक्तवाहिन्यांना सूज येणे किंवा बलूनसारखी फुगणे यासारख्या समस्या शोधल्या जाऊ शकतात.

रक्तवाहिन्या कुठेही कमकुवत झाल्या नाहीत किंवा फुटल्या नाहीत हे सीटी अँजिओग्रामद्वारे शोधता येते. रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्लेक किंवा ब्लॉकेज होत नाहीये ना, हे तपासता येते. या चाचणीच्या मदतीने शरीरातील ब्लड फ्लो सुद्धा ओळखता येतो. विशेषतः पायांमध्ये रक्ताभिसरणाची समस्या आढळून येते. सीटी अँजिओग्राफी चाचणीद्वारे स्ट्रोक किंवा सेरेब्रल ब्लीडिंग शोधला जाऊ शकतो.

सीरम लिपिड प्रोफाइल ब्लड टेस्ट

या टेस्टच्या मदतीने रक्तात किती फॅट आहे हे कळू शकते. या चाचणीला कोलेस्टेरॉल चाचणी असेही म्हणतात. याच्या मदतीने रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल शोधले जाते. तसेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन किती आहे, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन किती आहे, ट्रायग्लिसराइड किती आहे या सर्व प्रकारचे फॅट शोधले जाऊ शकते.

याद्वारे भविष्यातील हृदयविकाराच्या झटक्यांबाबत सतर्क राहता येते आणि योग्य उपचार आणि खाण्याच्या सवयींच्या मदतीने हृदयविकाराचा धोका टाळता येतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग