मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Fashion: साडीत जाणवणार नाही थंडी, फक्त या टिप्स करा फॉलो!

Winter Fashion: साडीत जाणवणार नाही थंडी, फक्त या टिप्स करा फॉलो!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 29, 2023 11:24 AM IST

Saree Fashion: हिवाळ्यात महिलांना सर्वात मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे थंडीत साडी कशी नेसायची? आणि स्टायलिश कसं दिसायचं? चला तर मग जाणून घेऊया या समस्येवर उपाय जाणून घेऊयात...

wearing saree tips in winter
wearing saree tips in winter (Instagram )

Winter Saree Fashion: हिवाळ्यात स्वतःला स्टायलिश ठेवणे थोडं मुश्किल असतं. कारण गुलाबी थंडीत गरमीने कपडे घालायचे की स्टायलिश कपडे तेच समजत नाहीत. याचा मोठा पत्रास स्त्रियांना होतो, विशेषत: जेव्हा लग्न किंवा पार्टीला जाण्याची वेळ येते. भारतीय संस्कृतीत साडी ही एक सदाबहार फॅशन आहे. पण हिवाळ्याच्या काळात महिलांना साडीची स्टाईल कशी करावी याबद्दल संभ्रम असतो. साडीत थंड वाजू नये आणि आपण स्टायलिशही दिसावं असं सगळ्यांना वाटतं. तर तुमच्या या समस्येचे समाधानही अगदी सोप्या टिप्समध्ये दडलेले आहे. काही साध्या-छोट्या पण उपयुक्त गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही फॅशनेबल दिसाल आणि प्रसंगानुसार परफेक्ट लुकही मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

वेलवेट फॅब्रिकसह रॉयल लूक

वेलवेट फॅब्रिक देखील हिवाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या हिवाळ्याच्या मोसमात, वेलवेट फॅब्रिकच्या साड्यांना तुमच्या वॉर्डरोबचा एक भाग बनवा. यामुळे तुम्हाला वेडिंग फंक्शन्समध्ये रिच आणि रॉयल लुक मिळेल. याशिवाय तुम्ही काही टिप्स देखील फॉलो करू शकता.

ओपन पदर

जर तुम्हाला हिवाळ्यात साडी घालायची असेल, तर फ्री पल्लू म्हणजे पदर ओपन पिन अप करण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही ती तुमच्या दुसऱ्या खांद्याभोवती सहजपणे गुंडाळू शकता आणि थंडीपासून सुरक्षित राहू शकता.

बनारसी आणि कांजीवरम साड्या

हिवाळ्यात साडी नेसायची असेल तर कांजीवरम किंवा बनारसी सिल्क निवडा. हे दोन्ही फॅब्रिक्स फार हलके नसतात, ज्यामुळे तुम्हाला लग्नाचा परफेक्ट लुक मिळेल आणि थंडीही जाणवणार नाही.

या प्रकारचे ब्लाउज निवडा

हिवाळ्यात तुम्हाला साडी नेसायची असेल तर कट-स्लिप आणि डीप नेक ब्लाउजऐवजी फुल स्लीव्ह आणि कॉलर नेक किंवा टर्टल नेक ब्लाउज निवडा. जर तुम्ही ती व्यवस्थित स्टाईल केली तर तुम्हाला क्लासी लुक मिळू शकेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel