मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 07, 2024 11:48 PM IST

Religious Places of India: मदर्स डे च्या दिवशी मुलांना संपूर्ण दिवस आईसोबत घालवायचा असतो. यंदा हा दिवस १२ मे रोजी साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईला भारतातील काही धार्मिक ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता.

Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस
Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस (unsplash)

Religious Places To Visit With Mom: दरवर्षी मे महिन्यात मदर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस १२ मे रोजी साजरा केला जाणार आहे. जरी प्रत्येक दिवस आईचा असतो, परंतु मदर्स डे हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या आईला स्पेशल फील देऊ शकता. आई सर्व काही सोडते आणि आपल्या मुलांसाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत या मदर्स डे तिला विशेष वाटण्यासाठी तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. येथे आम्ही भारतातील अशा ५ धार्मिक स्थळांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही तुमच्या आईसोबत फिरायला जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही मदर्स डे साजरा करून हा दिवस आणखी खास बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

वाराणसी, उत्तर प्रदेश

पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले, वाराणसी हे एक अद्भूत ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या आईसोबत दशाश्वमेध घाटावरील मंत्रमुग्ध करणारी गंगा आरती पाहू शकता. याशिवाय घाटाच्या किनाऱ्यावरून सकाळी सूर्योदयाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. सकाळच्या वेळी शांत बोट राईड करा. याशिवाय काशी विश्वनाथ आणि संकट मोचन या ऐतिहासिक मंदिरांना भेट द्या.

हरिद्वार, उत्तराखंड

हरिद्वार हे देवतांचे प्रवेश द्वार म्हणून ओळखले जाते. हे ते ठिकाण आहे जेथे पवित्र नदी गंगा पर्वतांवरून मैदानावर उतरते, भक्तांना त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्याची आणि मोक्ष प्राप्त करण्याची संधी देते. तुम्ही तुमच्या आईसोबत हर की पौरी घाटावर संध्याकाळी गंगा आरतीमध्ये सहभागी होऊ शकता. येथे लोक गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. याशिवाय तुम्ही मनसा देवी आणि चंडी देवी या प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता.

ऋषिकेश, उत्तराखंड

हरिद्वारपासून थोड्याच अंतरावर ऋषिकेश हे शांत शहर हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. अध्यात्म आणि आंतरिक शांती शोधणाऱ्यांसाठी ऋषिकेश हे एक उत्तम ठिकाण आहे. भव्य पर्वत आणि हिरवाईने वेढलेल्या गंगेच्या काठावर योग आणि ध्यान सत्रात सहभागी व्हा.

वैष्णो देवी, जम्मू आणि काश्मीर

हे मदर्स डे सेलिब्रेशनसाठी उत्तम ठिकाण आहे. उन्हाळ्यात आईसोबत भेट देण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णो देवी. वैष्णो देवी हे भारतातील सर्वात आदरणीय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. तुम्ही तुमच्या आईसोबत इथे सुद्धा जाऊ शकता.

अमृतसर, पंजाब

सुवर्ण मंदिर श्री हरमंदिर साहिब म्हणूनही ओळखले जाते. जिथे सर्व धर्माचे भक्त एकत्र येऊन आशीर्वाद घेतात आणि श्रद्धांजली देतात. येथे मंत्रमुग्ध करणारा पालकी साहिब सोहळा पहा, जेथे फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेल्या पालखीत गुरु ग्रंथ साहिब नेले जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel