Long Weekend Travel Tips: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला लाँग वीकेंड येत आहे. हा वर्षातील पहिला लॉंग विकेंड आहे. २६ ला सार्वजनिक सुट्टी आहे आणि २७ आणि २८ ला शनिवार रविवार असल्याने अनेकांना सुट्टी असते. या सुट्टीमध्ये जर तुम्ही कुठेतरी प्रवास (place visit in India) करण्याचा विचार करत असाल आणि ही ट्रिप बजेटमध्ये हवी असं वाटतं असेल तर आम्ही काही सजेशन्स घेऊन आलो आहोत.आम्ही तुमच्यासाठी स्वस्त जागा शोधून काढल्या आहे जिथे तुम्ही काही हजार रुपयांमध्ये प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कमी पैशात भेट देऊ शकता.या जागा हिल स्टेशन आहेत.
नैनिताल हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. नैनी लेक, नैना पीक, टिफिन टॉप, स्नो व्ह्यू, इको केव्ह गार्डन, बडा पत्थर, थंडी सडक, बडा बाजार, राजभवन, नैना देवी मंदिर अशा अनेक ठिकाणांना तुम्ही तिकडे भेट देऊ शकता. फक्त ५-६ हजार रुपये खर्चून तुम्ही इथे एन्जॉय करू शकता.
शिमलामध्ये तुम्ही क्राइस्ट चर्च, जाखू हिल, जाखू मंदिर, राष्ट्रपती निवास, काली बारी मंदिर, मॉल रोड, द रिज, टाऊन हॉल, गेटी थिएटर, बॅंटनी कॅसल, द ग्लेन, गॉर्टन कॅसल यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
तुम्ही डोंगरांची राणी मसुरीला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला छान शांती मिळेल. तुम्ही इथे पोहचण्यासाठी डेहराडूनहून रेल्वे स्टेशनवर उतरू शकता. तिकडून तुम्ही टॅक्सी करून साधारण २ तासात मसुरीला सहज पोहचू शकता. तिकडे तुम्ही मसूरी लेक, केम्पटी फॉल्स, देवभूमी वॅक्स म्युझियम, धनौल्टी, जॉर्ज एव्हरेस्ट हाऊस, अॅडव्हेंचर पार्क, क्राइस्ट चर्च, भट्टा फॉल्स, लाल टिब्बा, कॅमल बॅक रोड, जबरखेत नेचर रिझर्व्ह यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)