Vatican City: विदेशी फिरायला जायचा सध्या ट्रेंड आहे. वेगवेगळे देश (foreign trip) फिरायला कोणाला आवडत नाही. आतापर्यंत तुम्ही जगातील अनेक लहान-मोठ्या देशांबद्दल ऐकले किंवा पाहिले असेल. पण तुम्हाला जगातील सर्वात लहान देशाबद्दल माहिती आहे का? जगात असा एक देश आहे ज्याला तुम्ही अवघ्या ३० ते ४० मिनिटांत भेट देऊ शकता. होय, तुम्ही नीट वाचलं. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पृथ्वीवर असा एक देश आहे ज्याला तुम्ही अवघ्या अर्ध्या तासात भेट देऊ शकता. या देशाचे नाव व्हॅटिकन सिटी आहे.
व्हॅटिकन सिटी हे युरोप खंडात वसलेला हा जगातील सर्वात लहान देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ फक्त ४४ हेक्टर म्हणजे सुमारे १०८ एकर आहे. इथले हे जग स्वप्नापेक्षा कमी नाही. या देशाची लोकसंख्या १००० पेक्षा कमी आहे. रोम शहरात वसलेल्या या देशाची भाषा लॅटिन आहे. चला जाणून घेऊया या देशातील रंजक गोष्टींबद्दल...
ख्रिश्चन समुदायासाठी हा देश अतिशय पवित्र मानला जातो. व्हॅटिकन सिटी हे कॅथोलिक ख्रिश्चन समुदायाच्या लोकांचे धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे, जिथे जगभरातील कॅथोलिक चर्चच्या नेत्याचे अर्थात पोपचे घर आहे. या देशात तुम्हाला एक विशेष शांतता अनुभवता येते.
व्हॅटिकन सिटीमध्ये कॅथोलिक सामाज्याशी रिलेटेड अनेक जागा आहेत. तुम्ही सेंट पीटर बॅसिलिकालाही तुम्ही भेट देऊ शकता. हे इटालियनमध्ये व्हॅटिकनमध्ये बॅसिलिका डी सॅन पिएट्रो म्हणूनही ओळखले जाते. कॅथोलिक परंपरेनुसार, हे मोठे चर्च सेंट पीटरचे दफन केलेले ठिकाण मानले जाते. सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या प्रांगणात सुमारे १०० थडग्या आहेत आणि हे ठिकाण विशेषत: तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता.
ख्रिसमसच्या वेळी या देशाचे दृश्य पाहण्यासारखे आहे. व्हॅटिकन सिटीच्या धार्मिक महत्त्वामुळे ख्रिसमसला येथे लोकांची गर्दी जमते. ख्रिसमसचा देखावा पाहण्यासाठी इतर देशांतूनही लोक या ठिकाणी येतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)