मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine Day: व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचा प्लॅन करताय? दक्षिणेतील ही ठिकाणं आहेत बेस्ट

Valentine Day: व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचा प्लॅन करताय? दक्षिणेतील ही ठिकाणं आहेत बेस्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 31, 2024 10:46 PM IST

Travel With Girlfriend: दक्षिण भारतात फिरण्यासारखे अनेक ठिकाणे आहेत. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत फिरायला जायचे असेल तर तुम्ही साऊथमधील या ठिकाणी जायचे प्लॅन करू शकता.

व्हॅलेंटाईन डेला पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी दक्षिण भारतातील ठिकाण
व्हॅलेंटाईन डेला पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी दक्षिण भारतातील ठिकाण (unsplash)

Places To Go On Valentines Day In South India: फ्रेब्रुवारी महिना आला की प्रत्येकाला आपल्या जोडीदारासोबत स्पेशल वेळ घालवायला आवडते. तसं तर आपल्या व्यस्त शेड्युलमध्ये एकमेकांसाठी हवा तसा वेळ काढणे कठीण असते. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये (valentine week एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतात. यानिमित्ताने तुमच्या जोडीदाराला वेळ देण्यासाठी तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. येथे आम्ही अशाच काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत जे दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही तुमच्या पार्टनर किंवा गर्लफ्रेंडसोबत ही ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकता.

दक्षिण भारतात व्हॅलेंटाईन डे दरम्यान जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे (Best Places to Visit in South India for Valentine's Day)

अलेप्पी

शांत बॅकवॉटरमध्ये पोहताना तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे खरोखरच अद्भूत अनुभव असेल. हे दक्षिण भारतातील सर्वोत्तम हनिमून ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण लक्झरी हाउसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे. अलेप्पीचे सर्वात जवळचे विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि रेल्वे स्टेशन अलेप्पी रेल्वे स्टेशन आहे.

कुमारकोम

कुमारकोम हे केरळमधील बॅकवॉटर एरिया आहे. हे शांत आणि रोमांचकारक आहे. हाऊसबोटमध्ये वेळ घालवताना केरळच्या बॅकवॉटर आणि गावांच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. कुमारकोमचे सर्वात जवळचे विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोट्टायम रेल्वे स्टेशन आहे.

कन्याकुमारी

हे दक्षिण भारतातील सर्वात रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. हे बीच डेस्टिनेशन सर्वोत्तम सूर्यास्त/सूर्योदय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिन्ही बाजूंनी लक्षद्वीप समुद्राने वेढलेले आहे. त्रिवेंद्रम विमानतळ हे कन्याकुमारीच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे फक्त १०० किमी अंतरावर आहे. शहराचे स्वतःचे रेल्वे स्टेशन त्रिवेंद्रम रेल्वे स्टेशन आहे, ज्याचा दक्षिण भारतातील विविध शहरे आणि गावांशी चांगला संपर्क आहे.

गोकर्ण

गोकर्ण हे उत्तम ठिकाण आहे. गोव्याप्रमाणेच हे पांढरे वाळूचे किनारे, योगाची ठिकाणे, मंदिरे, हिप्पी कॅफे आणि फ्ली मार्केटसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे म्हणजे ओम बीच, हाफ मून बीच आणि महाबळेश्वर मंदिर, जे भगवान शिवाच्या विशाल मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. येथून जवळचे विमानतळ गोव्यातील दाबोलिम विमानतळ आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अंकोला आहे, जे २० किमी अंतरावर आहे. या ठिकाणांहून गोकर्णापर्यंत जाण्यासाठी तुम्ही बस किंवा टॅक्सी घेऊ शकता.

 

कोट्टाकुप्पम

कोट्टाकुप्पम हे तमिळनाडूमधील एक लपलेले ठिकाण आहे. हे संपूर्ण तामिळनाडूमधील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी काहींचे घर आहे. पार्टनरसोबत दक्षिण भारतात भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ चेन्नई विमानतळ आहे, जे १२४ किमी अंतरावर आहे. तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कटपाडी जंक्शन १५२ किमी अंतरावर आहे. येथून तुम्ही कोट्टाकुप्पमला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसने जाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel