मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Republic Day Travel: प्रजासत्ताक दिनाच्या लाँग वीकेंडला फिरायला जायचंय? या ऑफबीट ठिकाणी जाण्याचा करा प्लॅन

Republic Day Travel: प्रजासत्ताक दिनाच्या लाँग वीकेंडला फिरायला जायचंय? या ऑफबीट ठिकाणी जाण्याचा करा प्लॅन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 25, 2024 10:35 PM IST

National Tourism Day: प्रजासत्ताक दिनाला लागून ३ सुट्ट्या मिळत आहे. या काळात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हे ऑफबीट ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता.

लाँग वीकेंडला फिरण्यासारखे ऑफबीट ठिकाण
लाँग वीकेंडला फिरण्यासारखे ऑफबीट ठिकाण (unsplash)

Offbeat Places to Visit During Republic Day Long Weekend: भारतात २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी २६ जानेवारीला एक लाँग वीकेंड आहे, ज्यावेळी तुम्ही फिरायला जायचे प्लॅन करू शकता. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि २ ते ३ दिवसात परत येऊ शकता. जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाची सुटी घरी बसून घालवायची नसेल आणि काही नवीन ठिकाण शोधण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या ऑफबीट ठिकाणी जाऊ शकता. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्ता जाणून घ्या भारतातील या ठिकाणांबद्दल.

मेचुका

अरुणाचल प्रदेशातील मेचुका व्हॅली समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार फूट उंचीवर आहे. जरी हे एक लहान शहर असले तरी, येथे शांततापूर्ण सुट्टी घालवण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. पर्वत, सियोम नदी आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या या शहरात तुम्हाला सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. येथे तुम्ही ट्रेकिंग, घोडेस्वारी, सिटी टूर आणि फोटोग्राफी करू शकता.

तवांग

तवांग हे जगतील दुसऱ्या क्रमांकाचा बौद्ध मठ तवांग मठासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही साहसप्रेमी असाल आणि जानेवारीमध्ये भारतात एक ऑफबीट डेस्टिनेशन शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. येथे भेट देण्यासारखी काही ठिकाणे देखील आहेत जी तुम्ही एक्सप्लोर करू शकता.

लंबासिंगी

आंध्र प्रदेशातील हे एक अतिशय सुंदर गाव आहे, ज्याला 'आंध्र प्रदेशचे काश्मीर' म्हटले जाते. चहा आणि कॉफीचे हिरवेगार मळ्यांनी वेढलेले, लांबसिंगी हे अशा अद्वितीय ठिकाणांपैकी एक आहे जेथे तुम्ही फॅमिलीसोबत जाऊ शकता.

दावकी

मेघालयच्या उत्तरेकडील राज्यात वसलेले दावकी स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजूबाजूला मुबलक हिरवाईमुळे हे ठिकाण अतिशय आकर्षक बनते. उमंगोट नदी, जाफ्लॉंग झिरो पॉइंट, बुरहिल फॉल्स ही भेट देण्यासाठी चांगली ठिकाणे आहेत.

 

जिभी

जिभी हे हिमाचल प्रदेशातील एक अतिशय सुंदर गाव आहे. वाहत्या नद्या, हिरव्यागार दऱ्या आणि आकर्षक धबधब्यांनी वेढलेल्या जिभीला भेट द्यायला छान आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग, नेचर वॉक आणि फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकता. हे खूप सुंदर ठिकाण आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel