Skin Care to Increase Glow: मार्च महिन्यापासून गरमी वाढू लागते आणि उन्हाळा सुरू होतो. या काळात दिवसा कडक ऊन आणि सकाळ-संध्याकाळ सौम्य थंडी असते. हा बदलत्या ऋतूंचा काळ आहे. त्यामुळे स्किन केअरमध्येही काही बदल करणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी तुम्ही स्किन केअरमध्ये काही सवयींचा समावेश करू शकता. हिवाळ्याच्या दिवसात बहुतेक लोक उन्हात बसतात, ज्यामुळे टॅनिंग आणि सन बर्नची समस्या उद्भवू शकते. बदलत्या ऋतूत त्वचेची काळजी कशी घ्यायची ते जाणून घ्या.
- उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेची अंतर्गत काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेवर कोरडेपणा येऊ नये म्हणून पुरेसे पाणी प्यावे.
- उन्हाळ्यात पाण्याव्यतिरिक्त ज्यूस, नारळ पाणी आणि भाज्यांचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते.
- या काळात शक्यतो गोड पदार्थ खाणे टाळावे याची काळजी घ्या.
- या ऋतूत तुम्ही घराबाहेर पडत असाल किंवा नसाल तरीही रोज सनस्क्रीनचा अवश्य वापर करा. सनस्क्रीन लावून तुम्ही तुमच्या त्वचेला सूर्याच्या तीव्र अतिनील किरणांपासून वाचवू शकता.
- तुम्ही घरी असाल तर कमी एसपीएफ सनस्क्रीन वापरू शकता. पण जर तुम्ही बाहेर जात असाल तर किमान एसपीएफ ५० असलेले सनस्क्रीन वापरा.
- या ऋतूत नाइट केअर करणे सुरू करा. तुमच्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
- नाइट स्किन केअरमध्ये तुम्ही एलोवेरा जेल आणि बदामाचे तेल वापरू शकता.
- या ऋतूमध्ये चेहऱ्यावरील धूळ दूर करण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील घाण दूर होण्यास मदत होईल.
- उन्हाळ्यात निस्तेज चेहऱ्याचे पोषण करायचे असेल तर तांदूळ आणि दह्यापासून बनवलेला फेस पॅक वापरा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या