Insulin Sensitivity: इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारू शकतात या सवयी, फॉलो करणे आहे सोपे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Insulin Sensitivity: इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारू शकतात या सवयी, फॉलो करणे आहे सोपे

Insulin Sensitivity: इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारू शकतात या सवयी, फॉलो करणे आहे सोपे

Jun 26, 2024 09:04 PM IST

Diabetes Care Tips: रोजच्या रुटीनमध्ये काही सवयींचा अवलंब केल्यास इन्सुलिन सेंसेटिव्हिटीसारख्या समस्या टाळता येतात. जाणून घ्या काय आहेत त्या सवयी

इंसुलिन सेंसेटिव्ह सुधारण्यासाठी सवयी
इंसुलिन सेंसेटिव्ह सुधारण्यासाठी सवयी

Habits to Improve Insulin Sensitivity: इन्सुलिन सेंसेटिव्हिटी तेव्हा उद्भवते जेव्हा शरीराच्या पेशी इन्सुलिनसाठी योग्यरित्या कार्य करण्यास असमर्थ असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ही स्थिती बऱ्याचदा लठ्ठपणा, खराब जीवनशैली आणि खराब आहाराशी संबंधित असते. स्किन टॅन, काळी त्वचा, खाल्ल्यानंतर साखर खाण्याची इच्छा आणि पोटातील चरबी जास्त असणे ही त्याची लक्षणे आहेत. इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवायची असेल तर काही सवयींचा अवलंब करा.

इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारण्यासाठी फॉलो करा या सवयी

जेवल्यानंतर चालावे

जेवल्यानंतर १०-१५ मिनिटे थोडे फिरावे. या हलक्या व्यायामामुळे पचनक्रिया होण्यास मदत होते. खाल्ल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुपारी आणि रात्री जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका.

दुपारच्या जेवणाच्या वेळेकडे लक्ष द्या

दिवसातील सर्वात मोठे जेवण म्हणजेच दुपारचे जेवण १२ ते २ च्या दरम्यान करा. या काळात पचनक्रियेचा वेग वाढतो. हा काळ पचनास मदत करतो आणि स्थिर रक्तातील साखरेची पातळी वाढवतो.

ग्रीन टीमध्ये दालचिनी मिसळा

संध्याकाळी चिमूटभर दालचिनीसोबत एक कप ग्रीन टीचा आनंद घ्या. हे पेय पचन आणि पोषक द्रव्यांचे शोषण वाढवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित होण्यास मदत होते.

व्यायाम करा

आठवड्यातून ३-५ दिवस अर्धा तास व्यायाम केल्यास इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर तात्काळ परिणाम दिसून येतो. कमीत कमी आठ आठवडे चालणाऱ्या एक्सरसाइज रुटीननंतर हे अधिक स्थायी होऊ शकते.

हेल्दी खा

संतुलित आहार घेण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारण्यासाठी आपल्या आहारात बाजरीचा समावेश करा. या धान्यांमध्ये फायबर समृद्ध असते, जे ग्लूकोज शोषण कमी करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner