मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Negativity : नकारात्मक भावनांना कंट्रोल करण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर

Negativity : नकारात्मक भावनांना कंट्रोल करण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 21, 2022 02:55 PM IST

Health Tips : गेल्या काही वर्षांपासून अनेक लोक हे नैराश्य आणि तणावाच्या छायेत आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबातील कलहामुळं अनेक लोक नकारात्मकतेच्या आहारी गेलेले आहेत.

How To Control Negative Emotions In Life
How To Control Negative Emotions In Life (HT)

How To Control Negative Emotions In Life : सध्याच्या काळात अनेक लोकांना त्यांच्या करियर, व्यापार तसेच कौंटुबिक कलहांच्या कारणांमुळं नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागत आहे. एकदा की व्यक्तीला या समस्या जाणवायला लागल्या की त्यांच्या डोक्यात नेहमीच नकारात्मक विचार यायला लागतात. अशा वेळेस त्यांना यातून बाहेर पडण्याची गरज असते. त्यामुळं तुम्हालाही सतत नकारात्मक विचारांनी ग्रासलं असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं, याविषयी जाणून घेऊयात.

नकारात्मक विचार घालवण्यासाठी संगीत ऐका...

तरुणांना नेहमीच संगीत किंवा गाणी ऐकायला फार आवडत असतं. त्यामुळं जेव्हा कधी तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार येतील तेव्हा गाणी ऐकायला पाहिजे. त्यामुळं तुमच्या मनातील आणि डोक्यातील टेन्शन रिलीज होण्यास मदत होईल. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर मनाला आत्मिक शांती मिळते. त्यानंतर तुम्हाला गाणी ऐकल्यानंतर हायसं आणि सकारात्मक वाटेल.

वीक पॉईंटला बनला स्ट्रॉंग पॉईंट...

तणाव किंवा नकारात्मक भावना तुमच्या डोक्यात यायला लागल्यानंतर डोळे बंद करून तुमची काय कमजोरी आहे, त्याचा विचार करा. त्यानंतर त्याला ओळखून त्यावर कशी मात करता येईल, याची योजना बनवा, त्यामुळं तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.

तुमच्यातल्या कलागुणांना आणि स्ट्रॉंग पॉईंट्सला ओळखा...

प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती खासियत असते, अनेकदा काही लोकांना त्यांच्यातील कलागुण माहिती असूनही ते त्याला वाव देत नाहीत. काही लोकांना कविता लिहिण्याचा तर काही लोकांना उत्तम फोटोग्राफी करण्याची आवड असते. परंतु ते कधीही याकडे नोटिस करत नाहीत, अशावेळेस तुम्हाला जर तुम्हाला नकारात्मक विचारांनी घेरलं असेल तर तुम्हाला या तुमच्या कलागुणांना वाव देणं गरजेचं असतं. कारण त्यामुळं तुम्हाला तुम्ही काही तरी करू शकता, असा आत्मविश्वास येईल आणि तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल.

प्रेरणादायी भाषण ऐका किंवा पुस्तकं वाचा...

तणावाच्या काळात एखाद्या यशस्वी व्यक्तीचं प्रेरणादायी भाषक किंवा त्याचं पुस्तक वाचायला हवं, कारण यशस्वी झालेल्या लोकांना त्यांच्या संकटकाळात किंवा संघर्षाच्या काळात अशा परिस्थितीचा कसा सामना केलेला आहे, याबाबत तुम्हाला माहिती मिळेल. याशिवाय यूट्यूबवर अनेक प्रसिद्ध वक्त्यांचे प्रेरणादायी व्याख्यानं किंवा भाषणं आहेत, ते ही ऐकायला हवेत, त्यामुळं तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास बळ मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या