Yoga Mantra: कंबर आणि पाठदुखीने त्रस्त आहात? 'ही' योगासने लगेच देतील आराम-yoga tips what yoga exercises to do for waist and back pain ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: कंबर आणि पाठदुखीने त्रस्त आहात? 'ही' योगासने लगेच देतील आराम

Yoga Mantra: कंबर आणि पाठदुखीने त्रस्त आहात? 'ही' योगासने लगेच देतील आराम

Sep 01, 2024 08:26 AM IST

waist and back pain Yoga: कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी, त्यांना दररोज या ४ प्रकारच्या योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे.

कंबर आणि पाठदुखीसाठी कोणती योगासने करावे
कंबर आणि पाठदुखीसाठी कोणती योगासने करावे (pixabay )

मुलांना अभ्यासासाठी तासनतास बसावे लागते. त्यामुळे त्यांच्या नाजूक कंबरेवर ताण येतो आणि लहान वयातच मुलांना कंबर आणि पाठ दुखण्याची तक्रार सुरू होते. कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी, त्यांना दररोज या ४ प्रकारच्या योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे. योगाभ्यास केल्याने शरीरात लवचिकता वाढते. तसेच दुखण्यापासून आराम मिळतो.

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तज्ज्ञ नियमितपणे व्यायाम करण्याचा देतात. यामुळे वेदनांपासून आराम तर मिळेलच पण स्नायूंना बळकटीसुद्धा येईल. याशिवाय ते आहारात काही प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्याचाही सल्ला देतात. कारण त्यात आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे वेदनापासून आराम मिळवण्यास मदत करतात. पण आज या लेखात आपण पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी योग प्रकार पाहणार आहोत.

बलासन-

पाठदुखी आणि कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी बलासन प्रचंड उपयोगी ठरतो. त्यामुळे दररोज किमान दहा मिनिटे बलासनाचा सराव करा. यासाठी तुम्ही सर्वप्रथम आपल्या गुडघ्यावर बसा आणि आपले डोके पुढे ठेवून जमिनीला स्पर्श करा. हात पुढे करा. अशाप्रकारे तुमच्या शरीराची लवचिकता वाढेल आणि असे केल्याने पाठदुखीपासूनही आराम मिळेल.

मार्जरिआसन (कॅट अँड काऊ पोझ)

पाठदुखीसाठी हे एक प्रभावी योगासन आहे. गुडघे आणि पायाच्या बोटांवर उभे राहा आणि नंतर आपली कंबर आत आणि नंतर बाहेर खेचा. अशा प्रकारे, कंबरेच्या हालचालीमुळे मणक्याला विश्रांती मिळते आणि वेदनापासून आराम मिळतो.

भुजंगासन-

कामाच्या ठिकाणी आणि अभ्यासाला सतत बसल्यामुळे मोठ्यांची आणि मुलांची कंबर आकडते. अशा स्थितीत भुजंगासन अवश्य करावे. यामुळे केवळ खांदेच ताणले जात नाहीत तर कमरेचे हाडही ताणले जाते. ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो.

मेरुदंडासन-

मेरुदांडासन केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही बाजूंनी आपले हात पूर्णपणे पसरवा. आता गुडघ्याजवळ पाय वाकवून पाय वर करा. पाठ न हलवता, प्रथम कंबरेजवळ डावीकडे वळा. यामुळे पाय फिरतील पण पाठ जागेवर स्थिर असावी. हे योग आसन डावीकडे व उजवीकडे फिरवून करा. यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)